Site icon InMarathi

या ‘लेडी डॉन’ च्या इशाऱ्यावर “दाऊद आणि हाजी मस्तान” सुद्धा नाचायचे…

lady Don Feature 2 Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

९० च्या दशकामध्ये मुंबईवर पूर्णपणे अंडरवर्ल्डचे राज्य होते. अंडरवर्ल्ड माफिया आणि गुन्हेगारांनी मुंबईमध्ये थैमान घातले होते. मुंबई ही या अंडरवर्ल्डच्या माफियांनी आपल्या अधिपत्याखाली घेतली होती.कुणालाही न घाबरता येथे खून, स्मगलिंग दिवसाढवळ्या चालत असे.

सगळे कायदे यांनी धाब्यावर बसवले होते. यातूनच हाजी मस्तान, दाऊद यांच्यासारखे अंडरवर्ल्ड डॉन तयार झाले.

पण तुम्हाला माहित आहे का? हे अंडरवर्ल्डचे मोठे डॉन एका महिलेच्या आदेशावर वागत असत.

 

DNA india

 

आज आम्ही तुम्हाला मुंबईची माफिया क्वीन जेनाबाई दारूवालाविषयी सांगणार आहोत, जिचा प्रत्येक आदेश हा दाऊदसाठी खूप महत्त्वाचा होता आणि तिचा निर्णय हा शेवटचा निर्णय, असे दाऊद मानत असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक हुसैन जैदी यांचे पुस्तक “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” नुसार, १९२० च्या सुरुवातीला मुसलमान मेमन हलाई कुटुंबामध्ये जैनाब उर्फ जेनाबाई हिचा जन्म झाला होता, ती मिळून एकूण सहा भावंडे होती.

हे कुटुंब मुंबईच्या डोंगरी भागामधील एका चाळीमध्ये राहत होते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचे वडील गाड्या धुण्याचे काम करत असत.

 

alldatmatterz.com

 

स्वातंत्र्य लढ्यामध्ये ती सामील होती.

असे म्हटले जाते की, विसाव्या शतकापासून ते तिसरे दशक येईपर्यंत ती डोंगरीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामधील महात्मा गांधीजींच्या आंदोलनामध्ये समाविष्ट होती. जेनाबाई १४ वर्षांची असताना तिचे लग्न झाले होते. लग्नानंतरदेखील ती स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात राहिली.

त्यादरम्यान एखाद्या हिंदूला जर तिने पोलिसांपासून वाचवले तर तिच्या पतीला ते मुळीच आवडत नसे, तो तिला मारझोड करत असे.

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी जेनाबाईने मुंबई सोडून जाण्यास नकार दिला आणि याच गोष्टीने नाराज होऊन तिचा पती तिला आणि तिच्या ५ मुलांना सोडून पाकिस्तानला निघून गेला.

 

patrika.com

 

ती दारूच्या व्यवसायाशी जोडली गेली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईमध्ये धान्याची कमतरता भासली आणि महाराष्ट्र सरकारने गरिबांना कमी किमतीमध्ये रेशन देण्याचे काम सुरु केले.

आपले आणि आपल्या ५ मुलांचे पोट भरण्यासाठी जेनाबाई तांदूळ विकण्याच्या धंद्यामध्ये उतरली आणि येथूनच जेनाबाईने तस्करीचे तांदूळ विकण्याचे काम सुरु केले.

स्मगलरांच्या संपर्कात आल्यानंतर आणि तांदळाच्या धंद्यामध्ये नुकसान झाल्यानंतर ती दारूच्या धंद्यामध्ये आली.

डोंगरीमध्ये ती दारू बनवण्याचा आणि विकण्याचा धंदा करत असे. संपूर्ण भागामध्ये तिची हुकुमत चालत असे आणि म्हणूनच जेनाबाईच्या नावाला दारूवाला हा शब्द जोडला गेला आणि  ती बनली जेनाबाई दारूवाला.

ती पोलिसांची खबरी बनली.

दारूच्या धंद्यामध्ये असताना जेनाबाईचे पोलिसांबरोबर चांगले संबंध निर्माण झाले होते. १९६२ मध्ये पोलिसांनी तिला बेकायदेशीर दारू विकताना पकडले होते आणि त्यानंतर त्या काळातील सर्वात मोठा नकली दारू बनवण्याचा व्यवसाय समोर आला.

सूत्रांनुसार, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्यापर्यंत तिची पोच असल्यामुळे तिला सोडण्यात आले आणि ती तेव्हापासून पोलिसांची खबरी बनली.

पोलीस तिने दिलेल्या माहितीवरून स्मगलरांच्या ठिकाणांवर छापा मारत असे आणि पकडण्यात आलेल्या मालाचा १० टक्के जेनाबाईला दिला जात असे.

 

patrika.com

 

दाऊद आणि हाजी मस्तान घेत असत तिचा सल्ला.

दाऊद जेव्हा २० वर्षाचा होता, तेव्हा पहिल्यांदा तो जेनाबाई दारूवाला हिला भेटला होता. जेनाबाई दाऊदच्या वडिलांना पहिल्यापासून ओळखत होती आणि ती त्याच्या घरी येत-जात असे.

दाऊदचा गॉडफादर म्हणजेच मिर्झा हाजी मस्तान पण जेनाबाईला आपली बहिण मानत असे आणि कुठल्याही समस्येवेळी नेहमी तिचा सल्ला घेण्यासाठी जात असे.

 

prabhat khabar

 

गुरूच्या पावलांवर चालत दाऊददेखील जेनाबाईचा मुरीद बनला आणि प्रत्येक मोठे काम तिला विचारल्यानंतरच करू लागला.

डोंगरी गुन्हेगारांचा अड्डा बनला होता.

१९९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत डोंगरी हा भाग वाईट कामांसाठी ओळखला जाऊ लागला. येथे रक्ताचे पाट वाहू लागले. तस्करी डोंगरीमधील मुख्य धंदा बनला होता. हाच तो काळ होता, जेव्हा दाऊद खूप ताकदवान बनत चालला होता.

जनाबाई जसजशी वृद्ध होत चालली होती, तसतसा तिच्या सल्ल्यावर काम करणारा दाऊद देखील तिच्यापासून दूर होत गेला.

 

nuttyfeed

 

शेवटच्या काळात तिने धर्माचा मार्ग निवडला.

जेनाबाईचा मोठा मुलगा एका गँगवॉरमध्ये मारला गेला. आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात जेनाबाईने सर्व काही सोडून धर्माचा मार्ग  अवलंबला. त्यामुळे आपल्या मुलाच्या हत्याऱ्यांबद्दल कळाल्यानंतर देखील तिने त्यांना सोडून दिले.

तिने नेहमी हिंदू आणि मुसलमानांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. १९९३ ला मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोची गोष्ट तिच्या जिव्हारी लागली, त्यानंतर ती आजारी पडली आणि याचदरम्यान तिचा मृत्यू झाला.

अशी आहे मुंबईच्या अंडरवर्ल्ड क्वीन जेनाबाईची गोष्ट !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version