Site icon InMarathi

जपानवर अमेरिकेने अणुबॉम्बने हल्ला करण्यामागचे खरे कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भांडणं ही जशी दोन व्यक्तींमध्ये असतात तशीच ती दोन राज्यांत तसेच दोन देशांमध्ये सुद्धा असतात, पण फरक फक्त इतकाच २ माणसांच्या भांडणात तोटा हा त्या २ माणसांचाच होतो!

पण २ देशांच्या भांडणात सर्वात जास्त तोटा किंवा नुकसान हे सामान्य जनतेचे होते, यामध्ये सर्वात जास्त भरडली जाते ती सामान्य जनताच!

 

jollyreaders

 

पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ही तर अत्यंत सपक उदाहरणे आहेत, तसेच विविध देशांच्या आपापसात चालणाऱ्या अणू चाचण्या ह्या सुद्धा एका युद्धाचाच भाग आहेत!

हिरोशिमा नगासाकी चा हल्ला सगळ्यांनाच आठवत असेल, तो हल्ला करतानाचे व्हीडियोज सुद्धा उपलब्ध आहेत, पण त्यांनंतर त्या दोन्ही शहरांची जी अवस्था झाली ती अजिबात बघणीय नव्हती!

आज आपण त्याच हल्ल्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत! नेमका हा हल्ला का झाला आणि अमेरिकेने या हल्ल्यामागे नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

हे ही वाचा –

===

 

 

RPP

 

जागतिक इतिहासातील सर्वात भयानक हल्ल्यांपैकी एक म्हणून ‘पर्ल हार्बर’चा हल्ला ओळखला जातो.

आपल्यापैकी बरेच जण जे जगाच्या इतिहासाची माहिती ठेवतात त्यांना ह्या हल्ल्याबद्दल नक्कीच माहिती असेल आणि हा हल्ला किती भयानक असेल ह्याची देखील कल्पना असेल!

पण बरेच जण असेही आहेत ज्यांना अजूनही ह्या ऐतिहासिक दुर्घटनेबद्दल फारशी माहिती नाही. चला तर जाणून घेऊया काय होती ही पर्ल हार्बरची घटना…!

 

britannica.com

 

७ डिसेंबर १९४१ रोजी जपानी वायुदलाने हवाईच्या पर्ल हर्बर या अमेरिकेतील नौदल तटावर हल्ला केला होता. या बॉम्ब हल्ल्यानंतर जपानने अमेरिका ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले.

जपानने दोन टप्प्यांत आपल्या ३५३ युद्ध विमान, बॉम्ब वर्षाव करणारी विमाने, तॉरपीडो क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. पहिल्या टप्प्यात १८३ युद्ध विमाने उडवण्यात आली.

ओहायोच्या उत्तरेकडील युद्धतटावरून हे हल्ले करण्यात आले होते.

दुसऱ्या हल्ल्यात १७१ युद्ध विमानांचा वापर झाला. यात २४०० पेक्षा अधिक अमेरिकन सैनिक ठार झाले. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर रोजी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतला.

जपानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. पुढे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करून अमेरिकेने अखेर सूड घेतला.

 

wikimedia.org

हे ही वाचा –

===

 

जपानने पर्ल हार्बर हल्ला करण्यापूर्वी दोन महिने तयारी केली होती. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाविरूद्ध हल्ला करताना क्षुल्लक चूकही महागात पडू शकते म्हणून जपानने नेटकी तयारी केली होती.

विमानाच्या पायलटला हे सुद्धा शिकवले होते की पर्ल हार्बरवर किती उंचावरून विमाने उडवायची व हल्ला करायचा जेणेकरून रडारच्या नियंत्रणात जपानी विमाने येऊ नयेत.

जपानने हा हल्ला रविवारी केला होता. यामागे हे कारण होते की, अमेरिकन लोक रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागतात व मजा करतात.

त्यामुळे रविवारी पहाटे हल्ला करण्याचे ठरले. मात्र, दाट धुक्यामुळे व अंधारामुळे पहाटे हल्ला करू शकले नाहीत. मग सकाळी साडेसात वाजता हल्ला करण्यात आला.

 

history.com

 

यूएसएस एरिजोनातून ४ लाख गॅलन इंधन त्याच्या ९ पॉईंटमधून वाहून गेले. आणखी ५० ते ७० वर्षांपर्यंत हे इंधन वाहत राहील, असा अंदाज आहे. त्यास ‘ब्लॅक टियर्स ऑफ एरिजोना’ असेही म्हटले जाते.

पर्ल हार्बर हल्ल्यामध्ये अमेरिकेचे एक महत्त्वपूर्ण जहाज ‘यूएसएस एरिजोना’ पूर्णपणे नष्ट होऊन बुडाले होते.

१२०० नाविक आणि १२०० सैनिक त्यात मारले गेले. त्यानंतर त्याच जहाजाच्या अवशेषांना पांढरा रंग देऊन ‘स्मारक’ बनवण्यात आले.

या स्मारकाला भेट देण्यासाठी १८ लाख लोक वर्षभरात नौकेने येथे येतात. हवाई बेटावरील मुख्य स्थळांपैकी ते एक आहे.

 

educationviews.org

 

हवाई बेटावर असलेल्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्या काही मिनिटे अगोदर अमेरिकी सेनेला रडारवर सूचना मिळाली होती, मात्र तो अंदाज चुकीचा ठरवण्यात आला होता.

कारण जपानी बॉम्बवर्षक विमाने पर्ल हार्बरकडे येतील असे वाटणे देखील शक्य नव्हते.

७ डिसेंबर १९४१ रोजी जपानी हल्ल्यामध्ये अमेरिकेची ३०० पेक्षाही अधिक विमाने आणि १८ पेक्षाही अधिक मोठी जहाजे नष्ट झाली होती.

 

jackson jambalaya

 

या हल्ल्यामुळेच अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धात अधिक सक्रिय झाली आणि परिणामी १९४५ मध्ये जपानला आण्विक हल्ला सहन करावा लागला.

२०१६ च्या अमेरिका दौऱ्यामध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे ह्यांनी पर्ल हार्बरमध्ये फक्त युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

‘अॅबे यांच्या या दौऱ्याचा मुख्य हेतू युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे, माफी मागणे हा नाही.’ असे जपानने म्हटले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version