Site icon InMarathi

पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही कंपनीच्या यशामध्ये कंपनीच्या ब्रँन्ड नेमचा खूप मोठा वाटा असतो.

ब्रँन्ड ही त्या कंपनीची ओळख तर असतेच त्यासोबतच तो ग्राहकांना त्या प्रोडक्टचं अश्युरन्स देखील देतं. म्हणून लोक ब्रँन्डला खूप मानतात, त्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच आपल्या ब्रँन्ड ला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ती कंपनी जमेल ते करते.

आपला ब्रँन्ड लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात.

नावीन्यपूर्ण ब्रँड नेम साठी विविध युक्त्या लढवल्या जात असतात. त्यातच ब्रँन्डचे असे नाव ठेवणे जे विदेशी वाटेल ही तर सर्वात कॉमन स्ट्रॅटेजी…!

 

blog.verticalresponse.com

एखाद्या ब्रँन्डचे विदेशी नाव ठेवले तर त्या ब्रँन्डला लोक विदेशी ब्रँड मानतात. स्वदेशी ब्रँड पेक्षा विदेशी ब्रँन्डवर आपण भारतीय जास्त विश्वास ठेवतो हे एक कटू सत्य आहे.

विदेशी ब्रँन्ड हे स्वदेशीपेक्षा जास्त चांगले आहे असे आपण मानतो…जे नेहेमीच खरे असेलच असे नाही…!

विदेशी प्रमाणेच आपले स्वदेशी ब्रँन्ड देखील तेवढेच विश्वासार्ह असतात. पण लोकांचा समज आहे तो आहे…!

म्हणूनच अनेक भारतीय ब्रँड्स विदेशी वाटेल अशी नावं पसंत करतात!

तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत तुम्ही ज्या ब्रँन्ड्सना विदेशी समजून त्यांच्या वस्तू खरेदी करत होते, त्यांपैकी अनेक ब्रँन्ड विदेशी नसून स्वदेशी आहेत…! काय, बसला ना धक्का?!

“मी फक्त अमुक अमुक ब्रान्डचं वापरतो”, “आपल्याकडील ब्रँन्ड्स मला जमत नाही” असं म्हणून तुम्ही ज्या ब्रँन्ड्सच्या वस्तू वापरता त्यापैकी अर्ध्याधिक या मूळच्या स्वदेशी आहेत…!

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या अश्या १५ ब्रँन्ड्स ची लिस्ट घेऊन आलो आहोत – जे वाटतात विदेशी पण आहेत पक्के स्वदेशी…!

 १. पीटर इंग्लंड (Peter England) :

 

indiaretailing.com

 

हे ब्रँड आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे. पीटर इंग्लंड हे आयर्लंडमध्ये स्थापन झालं.

१९९७ साली मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल यांनी mid-price shirt विभागात या ब्रँडला भारतात लॉन्च केले. तर  २००२ साली या कंपनीने ब्रँडसाठी जागतिक अधिकार प्राप्त केले.

पीटर इंग्लंड भारतातील खूप मोठे मेन्सविअर ब्रँड असून दरवर्षी या ब्रँडचे ५ मिलिअन कपडे विकले जातात.

२. दी रेमंड ग्रुप (The Raymond Group) :

 

raymond.in

दी रेमंड ग्रुप हे एक भारतीय ब्रँडेड फॅब्रिक आणि फॅशन रिटेलर आहे. १९२५ मध्ये ही कंपनी स्थापन करण्यात आली. हे ब्रँड सूट फॅब्रिकचे उत्पादन करते. हे ब्रँड जी. के. ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या मालकीचे आहे.

३. अमेरिकन स्वॅन (American Swan) :

 

indiadesire.com

 

अमेरिकन स्वॅन हा एक परिपूर्ण ब्रँड आहे, तो एक जागतिक लाइफस्टाइल ब्रँड असून ते क्लासिक अमेरिकन शैलीला युरोपियन फॅशन असलेल्या युरोपियन फॅशनशी जोडते.

येथे तुम्हाला अस्सल स्मार्ट कॅज्युअल कपडे मिळतील.

सध्या दी अमेरिकन स्वॅन लाइफस्टाइल कंपनीचे CEO अनुराग राजपाल यांची या ब्रँडवर मालकी आहे. पण हा ब्रांड एक इंडियन बेस्ड ब्रान्ड आहे.

४. हायडिजाईन (HiDesign) :

 

thehindubusinessline.com

 

हायडिजाईन हा ब्रँड चामड्याच्या वस्तू बनवतो. हा ब्रँड Entrepreneur दिलीप कपूर यांच्या मालकीचा आहे. ह्या ब्रान्डची सुरवात १९७८ साली पाँडिचेरी येथे  होती.

५. अॅलेन सॉली (Allen Solly) :

 

mumbaisplash.blogspot.in

 

हे देखील एक भारतीय ब्रँड असून ते आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे. जगभरात १,२०,००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ३५ देशांत हे कार्यरत आहे.

१८५७ मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी या ग्रुपची स्थापना केली होती.

६. नॉटी डर्बी आणि आर्डेन शूज (Knotty Derby and Arden Shoes) :

 

 

हा ब्रँड Sumanglam Impex प्राइवेट लिमिटेड यांच्या मालकीचा आहे.

७. लुई फिलीप (Louis Philippe) :

 

mallsride.com

लुई फिलिप हा पुरुषांच्या कपड्यांचा प्रमुख भारतीय ब्रँड आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या मदुरा फॅशन अँड लाइफस्टाईलचा हा एक ब्रँड आहे. हा ब्रँड १९८९ साली लॉन्च झाला.

२०१३ पर्यंत भारतातील हा सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड होता.

८. दी कलेक्टिव्ह (The Collective) : 

 

raymondvellore.com

 

हा एक भारतीय ब्रँड असून तो आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचे आहे. ही कंपनी वॉल्व्हरिन वर्ल्डवाइड, ब्लुम कॅपिटल आणि गोल्डन गेट कॅपिटलद्वारे २०१२ मध्ये विकत घेतली होती.

९. वेस्टसाईड (Westside) : 

 

retail4growth.com

 

भारतात वेस्टसाईड हा ब्रँड ट्रेंट चालवते, ट्रेंट ही टाटा ग्रुपची रिटेल शाखा आहे. ट्रेंट हे १९९८ साली सुरु झाले. ह्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही ३५७.६ कोटी एवढी असून, सध्या भारतात १० महानगरांमध्ये  एकूण ९० दुकाने चालतात.

१०. फ्लाइंग मशीन (Flying Machine) : 

 

twitter.com

 

फ्लाइंग मशीन हा ब्रँड अरविंद ग्रुपचे सीईओ आणि एमडी संजय लालभाई यांच्या मालकीचे आहे. त्यांच्याकडे Chicco नावाचा एक इटालियन डिझायनर जरी असला तरी पण फ्लाइंग मशीन हा ब्रांड संपूर्ण भारतीय ब्रांड आहे.

खरेतर, हा भारताचा पहिला डेनिम ब्रँड होता आणि १९८० मध्ये अरविंद लाइफस्टाइल ब्रँड लि.

११. पार्क एव्हेन्यू, पार्क्स आणि कलर प्लस (Park Avenue, Parx and ColorPlus) :

 

 

पार्क एव्हेन्यू, पार्क्स आणि कलर प्लस हे ब्रँड्स रेमंड या कंपनीच्या मालकीचे आहेत. आज भारतातील २०० शहरांत ह्यांची ७०० दुकाने आहेत.

१२. स्पायकर (Spykar) :

 

asklaila.com

 

१९९२ साली स्पायकर ची सुरवात झाली. खासकरून युवा पिढीसाठी हा ब्रँड काम करतो. प्रसाद पाब्रेकर स्पायकर लाईफस्टाईल प्रायवेट लिमिटेडचे फाउंडर आहेत. तर हा ब्रँड COO संजय वखारिया यांच्या मालकीचेआहे.

१३. दा मिलानो (Da Milano) :

 

franchisezing.com

 

उद्योजक साहिल मलिक यांच्या मालकीचा असलेला दा मिलानो हा विदेशी वाटणारा ब्रँड स्वदेशी आहे. हा ब्रँड बॅग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

ह्या ब्रान्डचे नाव जरी इटालियन वाटत असले तरीही हा पूर्णपणे एक भारतीय ब्रान्ड आहे.

हा ब्रान्ड भारत आणि परदेशात उच्च प्रतीचे लेदर अॅक्सेसरीज आणि होम फर्निचरिंग पुरवतात.

१४. प्लॅनेट फॅशन (Planet Fashion) :

 

justdial.com

 

हा देखील एक भारतीय ब्रँड असून तो आदित्य बिर्ला ग्रुपच्या फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल आर्म मदुरा गारमेंट्सच्या मालकीचा आहे.

१५. मॉन्टे कार्लो (Monte Carlo) :

 

retail4growth.com

 

मॉन्टे कार्लो हा ब्रँड विदेशी नसून भारतीय आहे. तो ओसवाल वूलेन मिल्स लिमिटेडचे सीईओ जवाहरलाल ओसवाल यांच्या मालकीचा आहे. १९८४ साली या ब्रँडची स्थापना झाली.

हे सर्व वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच झाले असेल. शिवाय यावरून तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की आपले स्वदेशी ब्रँड्स हे विदेशी ब्रँड्सपेक्षा कमी अजिबातच नाहीत…!

स्रोत : menxp.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version