Site icon InMarathi

अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’!

cave im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपली पृथ्वी इतकी विविध रंगरूप आणि चमत्कारांनी नटलेली आहे की ते बघून तोंडात बोटे घालायला होते. त्यापैकीच एक चमत्कार मेक्सिकोतील सॅन लुईस पोटोसी प्रांतात आहे.

xtremespots.com

अ‍ॅक्विसमॉन या शहराजवळील जमिनीत एक प्रचंड आकाराचा खड्डा आहे. मुखाशी ४९ बाय ६५ मीटर आकाराचा असलेला हा खड्डा खाली जाताना ३०३ बाय १३५ मीटर आकाराचा होतो.

हा खड्डा १२१४ फूट खोल आहे. म्हणजेच न्यूयॉर्क शहरातील गगनचुंबी ७२ मजली क्रेसलर ही इमारत यात आरामात बसू शकते. या ठिकाणाला ‘केव्ह ऑफ स्वॅलोज्’ (गिळकृंत करणारी गुहा) असे म्हटले जाते.

tripfreakz.com

ही जागा जगातील ११ व्या क्रमांकाची सर्वात खोल अशी जागा आहे. चुनखडीच्या दगडापासून ही शंकाकृती गुहा तयार झाली आहे. अतिप्राचीन काळापासून येथील मानवाला ही गुहा माहीत होती.

आधुनिक काळात या गुहेचे सविस्तर वर्णन २७ डिसेंबर १९६६ रोजी प्रकाशित केले गेले. टी. आर. इव्हान, चार्ल्स बॉर्लंड आणि रॅन्डी स्टर्नस् यांनी या गुहेची माहिती जगासमोर आणली.

cf.broadsheet.ie

पक्षांचा थवा पाहण्‍यासाठी पर्यटक करतात गर्दी रोज सकाळी या गुहेतून पक्ष्यांचा भला मोठा वर्तुळाकार थवा बाहेर पडतो आणि संध्याकाळी पुन्हा आत जातो. हे दृश्य बघण्यासाठी शेकडो पर्यटक मुद्दाम या ठिकाणाला भेट देतात.

या गुहेचे आतील तापमान बरेच कमी असते. तसेच गुहेच्या मुखाशी भरपूर जंगली वनस्पती वाढलेल्या आहेत. पावसाळ्यात या गुहेला धबधब्याचे रूप येते. येथे पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात विष्ठा साचत असल्यामुळे अनेक कीटक, साप, विंचू अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत.

wondermondo.com

या गुहेच्या तळाशी आणखी एक छिद्र आहे ज्याची खोली किमान ५१२ मीटर असावी. ही गुहा ‘हॅंग एन‘ या नावाने ओळखली जाते. ‘हॅंग‘ हा व्हितनामी भाषेतील शब्द. याचा अर्थ आहे ‘गिळणे‘ आणि ‘एन‘ म्हणजे गुहा. ‘गिळंकृत करणारी गुहा‘ अशी याची ओळख आहे.

गुहेत थोडे पुढे गेल्यावर गुडघ्याएवढे पाणी लागते. त्याला पार केल्यानंतर ५०-६० फुटांची एक टेकडी चढावी लागते. त्यानंतर तुम्‍ही कल्‍पनाही करू शकणार असे जग तुम्‍हाला दिसेल.

आत टेकडीच्या उंचावरून खाली पाहिल्यास गुहेचा मुख्य भाग दिसतो. त्यांच्यासमोरच दोन नद्या वाहतात. त्यांच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे.

i.pinimg.com

काय म्हणता? आहे की नाही भन्नाट?? एकदा तरी भेट द्यायलाच हवी असे आहे हे ठिकाण!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version