आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जेव्हा केव्हा जगातील महान शासकांबद्दल चर्चा होते तेव्हा केवळ पुरुष शासकांचीच वाहवाही केली जाते. तर महिला शासकांबद्दल कुणी जास्त बोलत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कुणाला तेव्हढी माहिती नाही. क्लियोपेट्रा, रजिया सुल्तान, क्वीन विक्टोरिया या एक-दोन सोडल्या की इतर महिला शासकांबद्दल आपल्याला काहीही माहित नसतं. पण इतिहासात जगातील वेगवेगळ्या भागांवर काही महिला शासकांनी आपलं अधिपत्य गाजवलं आहे. या महिला शासकांनी पुरुष शासकाप्रमाणे कट-कारस्थानांचा सामना केला आहे. काही महिला शासकांनी तर मोठमोठी साम्राज्ये सांभाळीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महिला शासकांची ओळख करवून देणार आहोत.
मलिका ए हिंदुस्तान नूरजहां (Nur Jahan)
नुरजहाने भारतावर राज्य केले. जेव्हा की १६२० च्या दशकात शहेनशहा तिचा पती जहांगीर होता, पण राज्य नुरजहाचं चालायचं. तिच्याच नावाने कुठलाही शाही आदेश जाहीर व्हायचा, तसेच ती शाही सील-मोहर देखील ठेवायची.
तुर्कीच्या सुल्तान कोसेम (Kosem Sultan)
कोसेम सुलतान यांना १७व्या शतकातील सर्वात शक्तिशाली महिला मानली जाते. पण तुर्कीची राजधानी इंस्ताम्बुल येथे त्यांचे आगमन हे एका दासीच्या स्वरुपात झाले होते. त्या मुळात ग्रीक वंशाच्या होत्या. त्या ऑटोमन सुलतान अहमद पहिला यांची मुख्य प्रेयसी आणि नंतर मालिका बनल्या. अहमद यांच्या मृत्यू नंतर कोसेम यांनी त्यांच्या मतीबंद भावाला राजगादीवर बसविले आणि स्वतः वास्तविकरीत्या शासक बनल्या.
तुर्कीच्या तुरहान सुल्तान (Turhan)
तुरहान आणि तिची सासू कोसेम या तुर्कीच्या आटोमन साम्राज्याच्या महाराण्या होत्या. तुरहान ही पती सुलतान इब्राहीम यांची मुख्य पत्नी होती. तिचा मुलगा महमूद चौथा याच्या शासनकाळा दरम्यान १६५१ ते १६५६ त्या मुख्य शासक होत्या, त्यानंतर तुरहान हिनी तिच्या सासू म्हणजेच कोसेम यांची हत्या करवून आपल्या मुलाला राजगादीवर बसवले. असेही सांगण्यात येते की कोसेम महमूद ला मारून आपल्या दुसऱ्या नातवाला सुलतान बनविण्याची योजना आखत होती.
मिस्रची राणी आर्सिनोए सेकंड (Arsinoe)
आर्सिनोए दुसरी ही एक ग्रीक राजकुमारी होती. जिने प्राचीन मिस्र (इजिप्त) वर अधिराज्य गाजवलं. पहिले तिने राजा लीसिमेकस सोबत विवाह करून थ्रास, एशिया माईणर आणि मेसिडोनियाची राणी बनली. त्यानंतर तिने तिचा भाऊ टोलेमी दुसरा फिलाडेल्फस सोबत विवाह केला आणि मिस्रवर शासन केलं.
चीनची एम्प्रेस वेई (Empress Wei)
एम्प्रेस वेई चीनच्या टेंग राजवंशाची राणी होती. ती राजा झांगझोंगची दुसरी राणी होती. झांगझोंगने दोनवेळा राज्य केले. त्याच्या दुसऱ्या शासनकाळात वेईने त्याच्यासोबत शासन केले. ई.स. ७१० मध्ये झांगझोंगच्या मृत्युनंतर वेईने राज्यकारभाराची जबाबदारी आपल्या हातात घेतली. तिनेच तिच्या पतीला विष दिल्याचे मानले जाते. पण काही काळानंतर झांग यांचा भाचा लोन्ग्जी याने वेईची हत्या करून राजगादी मिळविली.
मिस्रची राणी एहोतेप पहिली (Ahhotep)
एहोतेपचा जीवनकाळ ईस.पूर्व १५६०-१५३० दरम्यान असल्याचं मानलं जातं. ती राणी तेतीशेरी आणि राजा फराओ शेनाख्तेरने यांची कन्या होती. ती फराओ सेक्वेनेनरे टाओची मुख्य राणी होती. ते दोघे भाऊ-बहिण असल्याचेही सांगितलं जाते.
मंगोल राणी सोरघाघतानी (Sorghaghtani)
सोरघाघतानी ही चंगेज खानचा लहान मुलगा तोलुई याची पत्नी होती. तोलुई याच्या मृत्यू नंतर सोरघाघतानीला तिच्या क्षेत्राची संरक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. १३ व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध महिलांपैकी ती एक आहे. पर्शियन इतिहासकार रशीद अल दिन यांनी लिहिलंय की, श्रीमंत आणि सैनिक कुठलाही विचार न करता तिच्या आज्ञेचं पालन करायचे.
मंगोलियाची शासक तोरेगेन (Toregene)
चंगेजखान याच्या मृत्यू नंतर त्याचा तिसरा मुलगा ओगेदेई याला सत्ता मिळाली. ओगेदेई हा व्यसनी होता तरी त्याचा चुनाव करण्यात आला कारण त्याचे इतर भावंड एकमेकांचे वैरी होते. जर त्यांच्यापैकी कोणाला राजा बनविण्यात आलं असत तर मंगोलियात गृहयुद्ध उद्भवले असते. म्हणूनच ओगेदेईला राजा बनविण्यासाठी सर्वांनी संमती दिली. पण तो व्यसनी असल्या कारणाने त्याची पत्नी तोरेगन हीच राज्याचं शासन सांभाळायची. ओगेदेईच्या मृत्यू नंतर ती वास्तविकरीत्या शासक बनली. १२४६ साली तिचा मृत्यू झाला.
बायजेंटाइन एम्पायरची राणी ‘जोए’ (Zoe)
जोए हिने बाल्कन ते एशिया पर्यंत पसरलेल्या बायजेंटाइन साम्राज्यावर आपले अधिपत्य गाजवले. दरम्यान तिचे अनेक विवाह झाले तसेच सत्तेसाठी तिला तिच्याच बहिणीसोबत स्पर्धा करावी लागली. जोए आणि तिची लहान बहिण थियोडोरा या कॉन्स्टेंटाइन आठवा याच्या मुली होत्या. त्याला मुलगा नसल्याने जोए हिने ताकदवर रोमानोजशी विवाह केला. कॉन्स्टेंटाइनच्या मृत्यू नंतर रोमानोज राजा बनला. काही काळानंतर जोएने थियोडोरा हिला राज्यातून निश्कासीत केले आणि आपल्या पतीला विष देऊन त्याचीही हत्या केली. त्यानंतर जोएने आपल्या महालातील एका अधिकाऱ्याशी विवाह केला.
तर अशा या महिला शासक ज्यांनी आपल्या बुद्धी, बळ आणि षडयंत्रांच्या मोठमोठ्या साम्राज्यांवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले.
यावरून हेच दिसून येत की पूर्वीच्या काळातही महिला या पुरुषांपेक्षा कुठेही कमी नव्हत्या…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.