राज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
पन्नासच्या दशकामधील बॉलीवूड इंडस्ट्री हे आताच्या बॉलीवूड इंडस्ट्रीपेक्षा खूप वेगळी होती. तेव्हाच्या चित्रपटातील गाणी आजही आपण वयोवृद्धांच्या मुखामधून ऐकत असतो. त्यांच्याकडून नेहमीच त्या काळातील चित्रपटांची स्तुती होताना दिसते, तसेच ते लोक आताच्या आणि त्या काळातील चित्रपटांची तुलना करतात आणि आपल्याला त्या काळातील चित्रपट कसे चांगले होते, हे पटवून देत असतात. अर्थातच, आता बॉलीवूड इंडस्ट्री खूप प्रगत झाल्यामुळे आताच चित्रपटांमध्ये नवीन फरक नक्कीच दिसून येतात. ५० च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन, राजकुमार, राज कपूर, धर्मेंद्र हे कलाकार खूप प्रसिद्ध होते. त्यातलाच एक राज कपूर यांचा आवारा हा चित्रपट खूप गाजला होता.
भारतातच नव्हे, तर भारताबाहेर देखील या चित्रपटाने आणि त्याच्या गाण्याने एकाच धूम उडवली होती. तुर्कीमध्ये तर हा चित्रपट इतका गाजला होता की, आजही तेथील लोक या चित्रपटातील गाणी गुणगुणताना दिसतात. आवारा हा चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये राज कपूर आणि नर्गिस या कलाकारांनी काम केले होते. त्यांच्या या चित्रपटातील आवारा या गाण्याचे तुर्कीमध्ये वेगवेगळे रिमेक देखील बनवण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊया की, या भारतीय चित्रपटाला तुर्कीमध्ये एवढी प्रसिद्धी कशी मिळाली..
२०१३ मध्ये राज कपूर यांची नात प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने रशियाला भेट दिली होती. त्यावेळी तिच्या लक्षात आले की, आजही तेथील लोक राज कपूरच्या नावाचा जप करतात. तिथे तिला अभिनेत्री करीना कपूर नाहीतर राज कपूर यांची नात म्हणून ओळखले जात होते. राज कपूर यांच्या त्या चित्रपटाचे पोस्टर इंटरनेटवर सारखे प्रसारित होताना दिसते. तरीही हा प्रश्न निर्माण होतोच की राज कपूरने प्रमोशन न करता देखील तुर्कीमधील लोकांना वेड कसे काय लावले? राज कपूर यांनी या चित्रपटामध्ये एका चोराची भूमिका साकारली आहे.
आवारा हा चित्रपट तुर्कीमध्ये १९५५ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट येथे ब्लॉकबस्टर ठरला होता. राज कपूर आणि नर्गिस यांच्यातील केमिस्ट्री आणि शंकर – जय किशन यांचे सुंदर संगीत यांनी तुर्कीमधील श्रोत्यांवर जादुचे काम केले. तिथे या चित्रपटाने नुसती प्रसिद्धी मिळवली नाही, तर हा चित्रपट १९५५ ते १९६२ या काळाच्या दरम्यान वारंवार प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचे शीर्षक गीत ‘आवारा हुं’ हे गाणे भारतामध्ये जेवढे हिट झाले, त्याच्यापेक्षा जास्त तुर्कीमध्ये हिट झाले होते. या गाण्याचा ताल आणि स्ट्रिंग तुर्कीच्या संगीत शैलीच्या इतक्या जवळचा होता की, तुर्कीच्या सर्वात महत्त्वाच्या दिवसांमधील एक अतूतुर्क नॅशनल स्पोर्ट्स डे च्या दिवशी रेडीओवर हे गाणे वाजवण्यात आले. हा प्रभाव इतका दीर्घकाळ टिकला की, ९० च्या दशकामध्ये येथील अनेक बँडनी शंकर-जय किशनच्या या गोड संगीताचे अजून नवनवीन वर्जन बनवले होते.
‘आवारा हुं’ ह्या गाण्याच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे सर्वसाधारणपणे भारतीय चित्रपटांमध्ये गाणे चांगल्या प्रकारे सादर करण्याची गुणवत्ता आहे. ‘आवारा हुं’ हे गाणे रशियन कवी आणि ‘पुश्किन’ म्हणून ओळखले जाणारे शैलेंद्र यांनी लिहिले आहे. हे गाणे एक उदासीनतेने भरलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील राज कपूर यांनी केले आहे. हा चित्रपट भारतातच नाही तर जगभरामध्ये गाजला होता.
अश्याप्रकारे हा चित्रपट तुर्कीमध्ये एवढा प्रसिद्ध आहे की, आजही त्या चित्रपटाची आणि गाण्यांची भुरळ त्या लोकांवर पडलेली दिसते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.