Site icon InMarathi

कुणीही सहज ओळखू शकेल इतका सोपा होता अमेरिकेच्या अणु हत्यारांचा लॉन्च कोड, वाचा त्यामागचं कारण!

code-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली होती. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या अगणित होती. संपूर्ण जगावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर झालेले शीतयुद्ध हे देखील खूप भयानक होते.

जेव्हा संपूर्ण जग धोक्यात आणि अंधारात जगत होते, त्याचवेळी काही घटना येणाऱ्या आपत्तीचे संकेत देत होत्या.

शीत युद्धाच्या दरम्यान, अमेरिका आणि सोव्हीयत संघ अणु शस्त्रांसह एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते आणि कोट्यावधी जीव धोक्यात होते.

त्या निर्णायक कालावधीत जगात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. युएसए पूर्णपणे या युद्धामध्ये आघाडीवर आले होते आणि प्रत्येकवेळी अधिक आक्रमक पद्धतीने व पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्याने अणुशस्त्रांचा भडिमार करण्यास तयार होते.

 

पण ही अणु क्षेपणास्त्रे पटकन प्रक्षेपित कशी झाली, हाच मोठा प्रश्न आहे. या क्षेपणास्त्रांना प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा कोड आणि तेथे प्रवेश करण्याची मुभा फक्त काही अधिकाऱ्यांनाच होती.

जवळपास २० वर्ष प्रत्येक सिलोमध्ये या क्षेपणास्त्रांचा कोड आठ शून्य (००००००००) ठेवण्यात आला होता. हे समजल्यानंतर ते सर्वांसाठीच धक्कादायक आणि त्रासदायक होते.

परंतु जेकेएफ यांनी १९६२ मध्ये जेव्हा नॅशनल सिक्युरिटी अॅक्शन मेमोरॅन्ड १६० वर स्वाक्षरी केली, त्यानंतर यावर कारवाई करण्यात आली.

प्रत्येक अणुशस्त्र जे अमेरिकेने सोडले, ते परमिसीव अॅक्शन लिंक (PAL). हे एक छोटे डिव्हाइस असते, जे मिसाईलला प्रक्षेपित करण्यासाठी सुनिश्चित करते आणि त्याचा हक्क फक्त अधिकार असलेल्या व्यक्तीला आहे, ते पण योग्य कोडद्वारेच चालू करता येते.

हे असे झाले, कारण अमेरिकेने इतर देशांमध्ये देखील आपली अणु हत्यारे स्थापित केलेली होती आणि अश्यावेळी अमेरिकचे सरकार त्यांच्या अस्थिर नेतृत्वाचा लाभ घेऊ शकतात आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात.

 

Dailymail.co.uk

विदेशी आक्रमणकर्त्यांपेक्षा जास्त, सैनिक किंवा कमांडर आपल्या यांनी आपल्या डोक्यावरील ताबा सुटल्यास ते क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करून तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात करतील, असा धोका निर्माण झाला होता.

अमेरिकेचे जनरल हॉरस एम. वेड यांनी जनरल थॉमस पॉवर, कमांडर इन चीफ ऑफ द स्ट्रॅटेजिक एयर कमांड यांच्याबद्दल म्हटले आहे की, मला जनरल पॉवरबद्दल नेहमी काळजी वाटत असे, कारण ते मानसिकरित्या संतुलित नव्हते.

तसेच, त्यांना खूप शास्त्रांवर आणि शास्त्रांच्या प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिकार होता. वास्तविक खरे नियंत्रण म्हणजेच पल लॉक आणि एसएसी त्यांच्या हातामध्ये आहे, हे मला ठाऊक होते.

जेणेकरून सैनिक अध्यक्षाची परवानगी मागण्यासाठी वेळ न घालवता, क्षेपणास्त्र सहजपणे प्रक्षेपित करू शकतात. ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी लागणार कोड ०००००००० हा होता.

एका चेक लिस्टवर लिहिण्यात आले होते की, शून्याशिवाय इतर कोणताही अंक ठेवू नये, कारण शून्य अंक कधीही लगेच समजण्यात येतो आणि त्याचा तेवढा प्रभाव देखील पडतो.

१९७० ते १९७४ या दरम्यान मिनिटमन लाँच ऑफिसर म्हणून काम करणारे डॉ, ब्रूस जी. ब्लेअर यांनी अणु कमांड आणि कंट्रोल सिस्टमवर अनेक लेख लिहिले आहेत.

आपल्या लेखात त्यांनी अमेरिकेच्या निर्वाचित नेत्यांमध्ये आणि कमांड ऑफिसर्स यांच्यात अणु हत्यारांविषयी किती विरोधाभास जाणवतो, यावर भर दिला आहे.

 

‘द टुडे आय फाऊंड आउट‘च्या म्हणण्यानुसार, ब्लेअरने १९७७ मध्ये ‘द टेररिस्ट थ्रेट टू वर्ल्ड न्यूक्लियर प्रोग्राम्स’ नावाचा एक लेख लिहिला होता. यामध्ये त्याने दावा केला होता की,

फक्त चार जण एकत्रित येऊन ते काम करत असलेल्या सिलोसमधील अणु क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करू शकतात. पण हे निर्णय भावनिक आणि विचार न करता घेतलेले असू शकतात, त्यामुळे ते इतरांच्या जीवाशी खेळतात.

हा त्यांचा लेख ज्या वर्षी प्रदर्शित झाला, त्याचवर्षी अणु क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करणारा कोड बदलण्यात आला. आशा आहे की, तो कोड ०००००००० याच्यापेक्षा गुंतागुंतीचा असेल. जो लगेच लक्षात येणार नाही.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version