Site icon InMarathi

वाचा वर्ल्ड फेमस “पटियाला पैग” च्या जन्माची रंजक कहाणी!!

patiala peg inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

व्हिस्की ही गेलिक शब्द ‘युसीज बिथे (uisge beathe)’ यांपासून बनला आहे. ज्याचा अर्थ आहे पाण्याचं जीवन. नंतर याला उसकी म्हणून संबोधण्यात आलं आणि हळूहळू ते व्हिस्की म्हणून नावारूपास आलं.

तशी तर दारू ही शरीरासाठी हानिकारकच पण काही प्रमाणात व्हिस्की पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही कॅन्सर सारख्या रोगापासून स्वतःचा बचाव करू शकता.

तर हृदया संबंधित रोगांवरही व्हिस्की उपायकारक आहे. व्हिस्की आपल्या शरीरात ताजे आणि ऑक्सीजन युक्त रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करते. त्यामुळे आपली स्मरणशक्तीही वाढते.

व्हिस्कीत लो कॅलेरी आणि लो शुगर अल्कोहोल असते त्यामुळे तुम्ही लठ्ठपणाचा विचार न करता व्हिस्की घेऊ शकता.

 

आता तुम्ही म्हणाल आज ही व्हिस्कीची एवढी स्तुती का..? तर आजची आपली गोष्टच व्हीस्कीशी संबंधित आहे. मला सांगा तुम्हाला ‘पटियाला पैग’ बद्दल माहित आहे..?

हो ना.. कुठलही फंक्शन असू देत नाहीतर ऑफिशियल मीटिंग तेव्हा दारू घेत असताना ‘पटियाला पैग’ तर असतोच…आणि पंजाबींची तर ही खासियत..!

पण तुम्हाला माहितीये का की या वर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’ ची सुरवात कुठनं झाली? जर नसेल माहिती तर जाणून घ्या या ‘पटियाला पैग’ ची कहाणी.

 

homegrown.co.in

‘पटियाला पैग’ हा १९२० साली जन्माला आला.

पटियालाचे महाराज भूपिंदर सिंह हे याचे जन्मदाते ठरले. ब्रिटीश टीम सोबत झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात महाराज भूपिंदर सिंह यांनी इंग्रजांना क्लीन बोल्ड केले. याच सामन्याच्या पार्टीत ‘पटियाला पैग’ चा जन्म झाला.

महाराजा राजिंदर सिंह यांच्यामुळे भारतात क्रिकेटची सुरवात झाली, हे खूप कमी लोकांना माहित आहे. महाराजा राजिंदर सिंह यांची क्रिकेटची खूप आवड होती.

म्हणूनच ते पटियाला येथे जगातील प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंना बोलवायचे. ज्यामुळे लोकांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाईल त्यासोबत नवनवीन टेक्निक शिकायला मिळतील.

त्यांच्या नंतर या प्रथेला महाराजा भूपिंदर सिंह यांनी संभाळल. त्यांनी इंग्लंडमध्ये भारतीय टीमकडून १९११-१२ साली अनाधीकारिक टेस्ट मॅच खेळल्या. तेथून परतल्यानंतर क्रिकेट हा त्यांचा शौक बनला.

त्यांनी रोड्स, न्यूमॅन रॉबिन्स सारख्या महान खेळाडूंना देखील पटियाला येथे आमंत्रित केले.

 

१९२० साली अंबालाच्या छावणीमध्ये डग्लस इलेव्हन यांच्या विरुद्ध मॅच खेळत असताना महाराजा भूपिंदर सिंह यांनी २४२ धावांची मोठी खेळी खेळली. या खेळीत त्यांनी १४ चौके आणि १६ षटकार मारले.

या मॅच नंतर त्याच मैदानावर दोन्ही टीमसाठी स्वादिष्ट डिनरची व्यवस्था करण्यात आली.

असं म्हणतात की,

आपल्या या मोठ्या खेळीने महाराजा एवढे खुश झाले की त्यांनी स्वतः ग्लासमध्ये व्हिस्की ओतून पार्टीची सुरवात केली. यावेळी त्यांनी ग्लासमध्ये ओतलेल्या व्हिस्कीची मात्र जवळजवळ दुप्पट होती.

जेव्हा कर्नल डग्लस यांना महाराजा यांनी चियर्स करण्यासाठी ग्लास त्यांच्या हाती दिला तेव्हा त्यांनी उत्सुकतेने या पैग बद्दल विचारणा केली.

 

eazydiner.com

यावेळी महाराजा भूपिंदर सिंह हसून म्हणाले की,

‘पाहुणे तुम्ही पटियालामध्ये आहात, टोस्ट सोबत ‘पटियाला पैग’ व्यतिरिक्त कमी काही चालणार नाही’…

मग दोघांनी हसत हसत एकाच सिपमध्ये आपला आपला ग्लास खाली केला.

तेव्हा पासून कुठल्याही समारोहात शाही पाहुण्याला हा ‘पटियाला पैग’ अनिवार्यपणे सर्व्ह करण्याची परंपरा सुरु झाली. त्यानंतर या ‘पटियाला पैग’ ला खूप प्रसिद्धी मिळाली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version