Site icon InMarathi

क्रांतिकारी शोध लावूनही प्रसिद्धी पासून दूर राहिलेला – फादर ऑफ SMS : मॅटी मॅक्नन

sms-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोबाईल हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. आजच्या काळात मोबाईल हा मानवाच्या मुलभूत सुविधांमध्ये धरला जातो. त्यामागे कारणही तसचं आहे, आज मोबाईल फोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता मोबाईल हा केवळ एखाद्याशी संवाद साधायचं साधन राहिलेलं नाही तर ते एक सर्व सुविधा युक्त ऑल इन वन पॅकेज आहे.

dailysmscollection.in

यासर्वांत सगळ्यात जास्त सोयीस्कर काही असेल तर ते म्हणजे SMS… एका एसएमएस वरून आज आपण न बोलता एखाद्यापर्यंत हवा तो संदेश पाठवू शकतो. आज त्या एसएमएस सर्विसमध्ये क्रांतिकारी बदल घडून आलाय… व्हॉटस्अप सारख्या मॅसेजिंग अॅपने तर आपलं जीवन सुखकर केलयं… पण काय तुम्हाला या SMS ची कन्सेप्ट कशी अस्तित्वात आली आणि ती कोणी अस्तित्वात आणली माहित आहे… आज आपण याच मॅसेजिंग सर्विसेसच्या जन्मदात्या बद्दल जाणून घेणार आहोत…

business-standard.com

१६ एप्रिल १९५२  साली फिनलंड येथे मॅटी मॅक्नन यांचा जन्म झाला. मॅटी मॅक्नन हे फिनलंड येथील सिविल सेवेचे अधिकारी होते. १९८४ साली ते डेनमार्कची राजधानी कोपेनहेगन येथील एका टेलिकॉम कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. तेव्हा लंच दरम्यान त्यांनी टेलिकॉम एक्सपर्ट समोर एक प्रश्न उपस्थित केला की, जर मोबाईल बंद असेल तर एखाद्याशी कशारीतीने संपर्क साधता येईल? मॅटी यांच्या या प्रश्नाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. तेथे उपस्थित सर्व यावर विचार करत होते तेव्हा मॅटी यांनी ही मॅसेज सर्विसची कन्सेप्ट त्यांच्या समोर ठेवली.

mtv.fi

पण त्यावेळी तेथे उपस्थित एक्सपर्ट आणि इतरांनी त्यांची ही कन्सेप्ट रद्द केली. १९८५ साली शोधकर्ता फ्रीडहॅम हिलब्राण्ड आणि त्यांची टीम मॅटी यांच्या या कन्सेप्टवर गुप्तरीत्या काम करत राहिले. यानंतर १९९२ साली पहिला-वहिला एसएमएस पाठविण्यात आला. तर १९९४ साली नोकिया कंपनीने त्यांचा टायपिंग वाला मोबाईल फोन लॉन्च केला ज्यानंतर ही सर्विस जगभरात अतिशय लोकप्रिय झाली.

ही मॅसेज पाठविण्याची सर्विस आज भलेही ‘शॉर्ट मॅसेजिंग सर्विस’ म्हणून प्रसिद्ध झाली पण मॅटी यांनी या कन्सेप्टचं नाव मॅसेज हॅण्डलिंग सर्विस ठेवले होते. ते या सर्विसला कमी शब्दांत संदेश पाठविण्याचा स्त्रोत मानत होते. त्यांचा मते ही सेवा भाषेच्या विकासाची नवीन पद्धत होती. पण मॅटी यांनी त्यांच्या या टेक्नोलॉजीच्या जोरावर पैसे नाही कमावले. आज जे एसएमएस सामन्यापासून ते मोठमोठ्या लोकांच्या जीवनातील गरज आणि सुविधेचे एक साधन बनले आहे अशा या सर्विसचा जन्मदाता मॅटी मॅक्नन यांनी आपल्या कन्सेप्टचं पेटेंटचं नाही केलं. एवढचं काय तर त्यांना स्वतःला ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हणवून घेणही पटायचं नाही. जर कोणी त्यांना ‘फादर ऑफ एसएमएस’ म्हटले तर ते अक्षरशः चिडायचे.

engadget.com

फादर ऑफ एसएमएस म्हणून ख्याती असणारे मॅटी मॅक्नन यांनी कित्येक वर्ष गुमनामित काढले. हेलसिंकीच्या एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने कित्येक दिवसांच्या तपासानंतर मोबाईलच्या दुनियेला एक नवं वळण देणाऱ्या मॅटी मॅक्नन यांचा शोध लावला. खूप विंनती नंतर अखेर त्यांनी मॅसेजिंग सर्विसेसच्या शोध आणि त्यांची सुरवात यामागील कहाणी सांगण्यास होकार दिला होता. तेव्हा कुठे या जगाला एसएमएसच्या जन्मदात्याची माहिती झाली. फिनलंडची सर्वात मोठी  मोबाईल कंपनी फिननेटचे सीईओ देखील राहिले आहेत. ते ‘ग्रांड ओल्ड मॅन ऑफ मोबाईल इंडस्ट्री म्हणून देखील खूप प्रसिद्ध होते.

एका टेलिकॉम कॉन्फरन्समध्ये पिज्जा खाता खाता मोबाईल जगताला एक नवे वळण देणाऱ्या मॅसेजिंग सर्विसेसची पहिली कन्सेप्ट ठेवणाऱ्या या मॅटी मॅक्नन यांचे २६ जुन २०१५ साली निधन झाले.

मोबाईल जगताचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या मॅसेजिंग सर्विसेसचा जन्मदाता याने खरच आपल्या कल्पकतेने या जगाच्या विकासात खूप मोलाची कारगिरी बजावली...

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version