' नोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असेल, तर ‘या’ गोष्टी नक्की करून पहा! – InMarathi

नोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असेल, तर ‘या’ गोष्टी नक्की करून पहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शाळेची परिक्षा आणि नोकरीसाठी मुलाखत यांचं टेन्शन आलं नाही तरच नवल…

नोकरीच्या मुलाखतीसाठी वारंवार जात आहात. पहिल्या-दुसऱ्या फेरीत उत्तीर्णही होत आहात, पण अंतिम फेरीत कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर केले जात आहे. नोकरीच्या शोधात वणवण फिरल्यानंतर मुलाखतीचा कॉल आला की जग जिंकल्याचा आनंद होतो, मात्र उत्साहाच्या भरात मुलाखतीची तयारी करण्याची बाब विसरली जाते.

अपय़श ही यशाची पहिली पायरी मानली जात असली, तरी हा सुविचार प्रत्यक्षात अनुभविल्यानंतर निराश होणा-यांची संख्याही मोठी असते.

पहिल्याच मुलाखतीत अथवा त्यानंतरच्या काही संधींमध्ये नकार पचविल्यानंतर डिप्रेशन आल्याचा अनुभव तुम्ही घेतलाय? मग हा लेख तुम्हाला निश्चितच पुढच्या मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करेल.

 

interview-marathipizza01
blog.hackertrail.com

 

काहींच्या मते मुलाखतीचा दिवस ही सुरवात असते, तुम्हालाही असंच वाटत असेल, तर तुम्ही चुकताय.

नोकरीची संधी असल्याचे कळल्यानंतर सुरवातीला उत्साह वाटतो, मात्र मुलाखतीला जाण्यापुर्वीच मनात अनेक प्रश्न घोंगावतात ?

या नोकरीसाठी पात्र आहोत की नाही, माझ्यासाठी ही संधी योग्य आहे का ? चुकीच्या नोकरीसाठी अर्ज केला की काय, असा संशय स्वत:बद्दल निर्माण होतो. या प्रश्नांची उत्तर शोधल्याखेरीज मुलाखतीला न जाणं हा चांगला पर्याय आहे

अनेकदा मागील मुलाखतीचे अपय़श हा त्यातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. मागच्या मुलाखतीत झालेला गोंधळ, भिती, उत्तर देताना झालेल्या चुका आणि त्यामुळे पचवावा लागलेला नकार या आठवणी केवळ पुसून टाकण्याऐवजी त्यापासून बोध घेणं सर्वोत्तम.

 

india today

सर्वात आधी एक वही घ्या आणि मुलाखतीचा संपूर्ण अनुभव त्यात लिहा. आठवणीतील प्रत्येक गोष्ट आणि अनुभव लिहा. मुलाखतीच्या प्रक्रियेपासून ते ज्या लोकांना तुम्ही भेटलात त्या सर्वांबद्दल लिहू शकता.

प्रत्येक मुलाखतीत काहीतरी धडा मिळतोच. लिहिण्याने तो समोर येऊ शकतो.

ज्या नोकरीसाठी गेलो होतो त्यासाठी आपण आदर्श व्यक्ती नव्हतो असेही तुम्हाला कळू शकते. या एका विचाराने तुमचे पुढील अनेक प्रश्न सुटतील. मुलाखतीच्या वेळी वातावरण थोडे वेगळे होते, असे लिहिताना तुम्हाला समजू शकते.

या सर्वांचे आकलन केल्यानंतर, पुढच्या वेळी मुलाखतीला जाण्यासाठी काय तयारी करावी लागेल याचा धडा मिळेल.

 

 

interview-marathipizza02
au.hudson.com

 

नोकरीच्या अनेक मुलाखतीत अपयश पचविलेल्यांनी हे उपाय केले, तर पुढच्या मुलाखतीत तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत नोकरी पटकाविणार यात शंकाच नाही,

अपयश आलं, तरी त्यातून शिकणं सर्वाधिक महत्वाचं आहे, हे कधीही विसरु नका.

तर तुम्ही प्रथम उमेदवार असाल, किंवा अनेक वर्ष प्रयत्न करणारे अनुभवी उमेदवार, कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीला जाण्यापुर्वीची तयारी सर्वांसाठीच महत्वाची आहे. मुलाखतीत नकार पचविल्यानंतर स्वतःला दोष देण्यापेक्षा, स्वतः मेहनत घेऊन यश कमाविणं कधीही चांगलंच.

कंपनीची माहिती

तुम्हाला ज्या कंपनीत मुलाखतीसाठी जायचं आहे, त्या कंपनीची सर्व माहिती ही या प्रक्रियेची पहिली पायरी आहे.

तुम्हाला नोकरी मिळु वा न मिळो, मुलाखतीच्या वेळी, तुम्हाला त्या कंपनीबाबत सर्व माहिती असणं गरजेचं आहे.

यामध्ये कंपनीचा इतिहास, कार्यक्षेत्र,  सध्या सुरु असलेले प्रकल्प, तेथिल वरिष्ठांची नावं ही माहिती असणं अपेक्षित आहे, याव्यतिरिक्त तुम्ही ज्या पदासाठी नोकरी स्विकारु इच्छिता, त्या पदासह संबंधित विभाग, त्या विभागाच्या जबाबदा-या यांचीही माहिती मिळविणं गरजेचं आहे.

 

pintrest.com

 

इंटरनेटच्या या युगात प्रत्येक कंपनीविषयीची माहिती एका क्लिकवर घरबसल्या उपलब्ध होत असल्याने, ही माहिती अगदी सहज मिळु शकेल.

सरावाला पर्याय नाही

कंपनीची माहिती मिळविल्यानंतर, तुमच्या क्षेत्रातील ज्ञान मिळविणं आणि ते मुलाखतकारांसमोर मांडणं याचा सराव करा.

भलेही, तुम्हाला तुमच्या पदवी परिक्षेत डिस्टिंग्शन असेल, मात्र तुमचं ज्ञान तुम्ही मुलाखतीत कसं मांडता यावर तुमची नोकरी अवलंबून आहे. तुमच्या क्षेत्रातील सखोल माहिती, त्यात सध्या होणारे बदल, तुम्ही यापुर्वी केलेल्या कामाचा अनुभव यांची माहिती नीट मांडणं आवश्यक आहे, त्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे.

 

ncarb.org

 

याखेरीज पुस्तकी ज्ञानासह तुमचं व्यावहारिक ज्ञान, वागण्या-बोलण्यातील सहजता, विचारलेल्या प्रश्नांना उदाहरणं देत दिलेली उत्तरं हे मुद्दे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवितात, आणि हेचं तुमचं यश आहे.

चुका टाळा

तुम्ही पहिल्यांदा मुलाखत देणार असाल, तर आत्मविश्वास आणि वागण्याची रिती यांचे भान राखा.

मात्र तुम्ही यापुर्वीच्या मुलाखतींमध्ये नकार पचविला असेल, तर तुम्हाला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

जसं, मुलाखतीला येण्यापुर्वी तुम्ही झालेल्या चुकांची उजळणी केली, त्या चुकांची पुनरावृत्ती होवु नये, याकडे प्रत्यक्ष लक्ष देण्याची ही वेळ आहे.

 

hindi spot

 

उदाहरण द्यायचं असेल तर, मागील मुलाखतीत आत्मविश्वास कमी पडल्याने तुम्ही गोंधळले असाल, तर यावेळी सर्वात आधी आत्मविश्वास वाढवा. मागच्या वेळी जो गोंधळ झाला,  मुलाखत घेणा-याला तुमच्या ज्या चुका खटकल्या त्या पुन्हा होणार नाहीत, याकडे लक्ष द्या.

अर्थात स्वतःच्या वागण्याबाबत सतर्कता बाळगताना, तुम्ही कॉशियस दिसु नये याची काळजीही तुम्हालाच घ्यावी लागले.

नोकरी मिळणे, न मिळणे वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक मुलाखतीत तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नव्या मान्यवरांशी ओळख करुन घेता, ही संधी न दवडण्यातचं तुमचं हित आहे.

मुलाखतीच्या निमित्ताने निर्माण झालेले संबंध दीर्घ काळ टिकविता येतात. त्यामुळे भलेही तुम्हाला नोकरी मिळाली नाही तरी, तुम्ही हायरिंग मॅनेजरला एक आभारपत्र पाठवू शकता.

 

 

त्यात संपूर्ण अनुभवासाठी त्यांचे आभार मानू शकता. ज्या व्यक्तीला त्यांनी घेतले आहे ती काही कारणांमुळे त्यांना पात्र वाटत नाही, असेही होऊ शकते किंवा मग पुढील आठवड्यात पुन्हा नवी नोकरीही निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत हे संबंध नंतर उपयुक्त ठरू शकतात.

प्रत्येक मुलाखत आणि लोकांशी गाठभेट तुम्हाला सर्वार्थाने मजबूत बनवते हे लक्षात ठेवा. योग्य संधीसाठी तयार राहण्याची ही प्रक्रिया आहे.

नोकरी शोधण्याचंं काम वाढवणं. तुमच्यासाठी कुठे संधी आहे हे तेथे गेल्यानंतर कळेल; पण त्यापेक्षाही तुम्ही पात्र आहात आणि जो तुम्हाला नियुक्त करेल तो नशीबवान असेल हे लक्षात ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे.

नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही त्यात अधिक प्रगती नक्कीच करु शकता, मात्र ती मिळविण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, हे विसरु नका.

तुमचं ज्ञान, आत्मविश्वास आणि वागण्याची आदब या सर्वांचं निरिक्षण केल्यानंतर जर तुमचं वेगळेपण सिद्ध झालं, तरच तुम्हाला त्या नोकरीचं दार खुलं होणार आहे.

तर मग मंडळी जमल्यास ह्या गोष्टी नक्की करून पहा यश तुमचेच आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?