Site icon InMarathi

मेड इन चायना, डुप्लिकेट वस्तूपासून जरा जपून… समजून घ्या!

iPhone copycat Feature Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बऱ्याचदा आपण स्वस्त म्हणून मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट डोळे झाकून खरेदी करतो, पण मग आपल्या लक्षात येते की ती वस्तू ओरिजिनल ब्रँडची कॉपी आहे. तर अशी उत्पादने खरेदी करत असाल तर सावधान रहा.

उत्पादन बनावटी असू शकते. तसे पाहिले तर हँडबॅग आणि परफ्यूमपासून ब्रँडेड स्ट्रॉबेरी ते केळीपर्यंत बनावटी निघू शकते. पण सर्वात जास्त बनावटी चप्पला तयार होतात. त्यानंतर कपडे, कातडी वस्तू आणि गॅजेट्स. चला जाणून घेऊया कुठे तयार होते बनावटी उत्पादन!

 

 

मोठ्या ब्रँड्सची नक्कल सर्वात जास्त चीनमध्‍ये होते. एका अहवालानुसार ६३.२ टक्के बनावटी वस्तू बनवल्या जातात. याबाबत भारत १.२ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. २०१६  देशांमध्‍ये बनावटी वस्तूंची आयात करण्‍यात आली. हे एकूण जागतिक आयातीतील २.५ टक्के आहे. २०१६ मध्‍ये जगात एकूण १७.९ लाख कोटी डॉलरची आयात झाली होती.

 

indiatv news

 

सर्वाधिक नक्कल अमेरिका, इटली आणि फ्रान्सच्या ब्रँड्सची होते. युरोपियन युनियनमध्‍ये ५ टक्के आयात वस्तूंमध्‍ये नकली माल असतो. सर्वाधिक ६२ टक्के नकली वस्तू पोस्टाच्या पार्सलमधून मिळतात. २००८ मध्‍ये १.९ टक्के आयात उत्पादनात नकली होते, २०१६ मध्‍ये ३.५ टक्क्यावर पोहोचले.

बनावटऑटो पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात. बनावटी औषधांमुळे लोक जास्त आजारी पडतात. बनावट खेळण्‍यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तपासणी यंत्र चुकीची माहिती देऊ शकते.

 

the financial express

 

बनावट वस्तू बनवणारे देश :

चीन – ६३.२% , तुर्कस्तान – ३.३% , सिंगापुर – १.९% , थायलँड – १.६% , भारत – १.२ , मोरोक्को – ०.६%, यूएई – ०.५%, पाकिस्तान – ०.४%, इजिप्त – ०.४%

कोणत्या देशातील कंपन्यांच्या वस्तूंची नक्कल केली जाते?

अमेरिका २०% , इटली १५% , फ्रान्स १२% , स्वित्झलंड १२% , जपान ८% , जर्मनी ८% , इंग्लंड ४% , स्पेन २% , बेल्जियम २%

 

dazedgroup.netdna-cdn.com

 

चला आता पाहूया कोणकोणत्या ब्रँड्सची चीनमध्ये नक्कल होते.

१)जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणा-या सोनी कंपनीचे नकली उत्पादन. 

 

bhaskar.com

 

२) नाईकी कंपनीचे बनावटी चप्पल. 

 

china mike

 

३) अदिदासशी मिळतेजुळते नाव तयार करुन बनवलेले स्पोर्ट्स शूज अशा पध्‍दतीने विकले जाते.

dmcdn.net

 

४) नोकिया कंपनीचे नकली मोबाइल

 

complex.com

 

५) प्रसिध्‍द अमेरिकन ब्रँड केएफसीचे चिनी रुप.

 

cloudfront.net

 

६) पिझ्झा हटचे चिनी व्हर्जन

 

photobucket.com

 

७) अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा विंडोज ओएस चीनमध्‍ये त्यात झाला असा बदल.

 

quoracdn.net

 

८) कॉफीसाठी प्रसिध्‍द अशा स्टारबक्स कंपनीचे चीनमध्‍ये नाव बदलून नकली उत्पादन विकले जात आहे.

 

i.ytimg.com

 

९) अदिदास कंपनीत काही असे बदल झाले.

 

dmcdn.net

 

१०) पॅनॉसॉनिकचे नकली उत्पादन

 

itsnotforgirls.com

 

११) बर्गरसाठी प्रसिध्‍द मॅक्डोनाल्ड चीनमध्‍ये अशा पध्‍दतीने विकले जाते.

 

 

 

तर मंडळी अशी आहे ही बनवाबनवी!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version