' ६४ किलो सोन्याच्या अंगठीचा मालक आहे – दुबईतील भारतीय व्यावसायिक! – InMarathi

६४ किलो सोन्याच्या अंगठीचा मालक आहे – दुबईतील भारतीय व्यावसायिक!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गुजरातींबाबत एक बोलले जाते की, त्यांच्या रक्तात बिझनेस असतो. त्याचमुळे गुजराती लोक जेथे जेथे जातील तेथे तेथे आपली स्थान बळकट करतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आहे गुजरातच्या अनिल धाणक यांची, जे ज्वेलरी बिजनेसमध्ये दुबईतील चर्चेतील नाव आहे.

kenz-jwells-marathipizza01
kanzjewels.com

अनिल धाणक यांचा जन्म गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील बगसरा येथे झाला. अनिलभाईचे शालेय शिक्षण बगसरा येथेच झाले. त्यानंतर त्यांनी राजकोटमधील राजकुमार कॉलेजमधून पदवी घेतली. याचदरम्यान त्यांनी बिजनेस करण्याचे मन बनवले होते. कारण त्यांचे कुटुंबिय ज्वेलरी बिजनेसमध्ये होते. कुटुंबियांचा बिजनेस दुबईत सुद्धा होता. त्यामुळे अनिलभाईंनी भारतात बिझनेस करण्यापेक्षा दुबईत जाणे पसंत केले.

kenz-jwells-marathipizza02
kanzjewels.com

अनिलभाईने सुरूवातीला १० वर्षापर्यंत ज्वेलरी बिजनेसचा अनुभव घेतला. यानंतर १९९१ मध्ये ‘कान्ज’ ज्वेलरी नावाची कंपनी स्थापन केली. ‘कान्ज‘ एक अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘खजाना’ होतो. काही वर्षातच त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट, डिझाईन्स, क्वालिटी यामुळे दुबईत फेमस झाले.

kenz-jwells-marathipizza03
4.bp.blogspot.com

आज अनिलभाईची दुबईत कान्ज ज्वेलर्स नावाची डझनावरी शो-रूम आहेत. आकर्षणाचे केंद्र आहे ६४ किलो सोन्याची अंगठी! दुबईतील मीना बाजारात अनिलभाईचे एक शो-रूम आहे जेथे ६४ किलो वजनाची सोन्याने बनवलेली अंगठी ठेवली आहे, जी संपूर्ण दुबईत फेमस आहे.

kenz-jwells-marathipizza04
divyamarathi.bhaskar.com

डायमंडने मढवलेल्या या अंगठीला ‘तायबा’ नाव दिले आहे. ही गेल्या वर्षीपर्यंत जगातील सर्वात मोठी सोन्याची अंगठी होती. तसेच याची नोंद गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली होती.

अनिलभाई सांगतात की,

अंगठीच्या निर्मितीसाठी ५५ कारागीर काम करत होते. त्यासाठी त्यांनी ४५ दिवस १० तास कष्ट घेतले.

हे शो-रूम पर्यटकांसाठी आता केवळ आकर्षणाचे केंद्र राहिले नाही, तर अनेक बॉलिवूड मूवीजचे शूटिंग सुद्धा झाले आहे. दुबईत जाणारे बिजनेसमॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीजपासून क्रिकेटर्सपर्यंत सर्व जण येथे आवर्जून भेट देतात.

kenz-jwells-marathipizza05
dubaiprnetwork.com

अर्थात ह्या सर्वाचे श्रेय जाते अनिल भाईंच्या आजवरच्या मेहनतीला आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कष्टाला!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?