Site icon InMarathi

हे कोणतेही स्पेसशिप नाही, हे आहे स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क’ !

apple park inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

स्टार्ट अप सुरु करणा-या प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःच ऑफिस असावं.

अर्थात ते ऑफिस सुसज्ज, देखणं असावं अशीही प्रत्येकाची इच्छा असते. सध्या तर इंटरनेटवर कलात्मक ऑफिसच्या इतक्या आयडिया दिसून येतात,

त्यामुळे त्या कल्पना पाहिल्यानंतर आपल्याही ऑफिसची रचना अशीच असावी असं तुम्हालाही कधीतरी वाटलं असेल.

तसं तर प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं की आपण जे काम करतो, जी कंपनी चालवतो तिचे स्वतंत्र, नीटनेटके ऑफिस असावे, पण स्टीव्ह जॉब्सचे मात्र आपल्या स्वप्नातील ऑफिसबद्दल इतरांपेक्षा काहीसे वेगळे विचार होते.

 

iphonehacks.com

 

अॅप्पलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स ह्याचे एक  स्वप्न होतंं की आपण ज्या कंपनीला जन्म घातला त्याचे एक शानदार, भन्नाट आपल्या स्वप्नातील ऑफिस असावे.

जिथे आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट असावी, तिथे येणारा प्रत्येक जण त्या ऑफिसच्या प्रेमात पडला पाहिजे. कर्मचारी तर ऑफिस सोडून कुठे जाण्याचा विचारही करणार नाहीत इतके दिमाखदार, सर्वाना हवेहवेसे वाटणारे प्रचंड मोठे ऑफिस निर्माण निर्माण करण्याची त्याची इच्छा होती.

दुर्दैवाने अगदीच कमी वयात स्टीव्ह जॉब्सचा मृत्यू झाला, पण त्याच्या सहकाऱ्यांनी मात्र त्याची इच्छा अपूर्ण ठेवली नाही. उलट त्यांनी शक्य तितक्या लवकर स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क उभे करण्याचे प्रयत्न केले आणि त्यांच्या त्या प्रयत्नांचे मूर्त रूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे.

हो खरंच स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘ते’ ऑफिस आता तयार झाले आहे.

 

content.newsinc.com

 

कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत वरील चित्रात दाखवलेली अलिशान बिल्डींग स्थित आहे.

तब्बल १३ हजारांहून अधिक कर्मचारी ह्या बिल्डींगमध्ये सामावले जाऊ शकतात इतकी प्रचंड मोठी ही बिल्डींग आहे.

या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे.  सुमारे १७५ एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे.

 

cdn.vox-cdn.com

 

ऑफिसच्या बाहेरच नाही, तर कॅम्पस एरियात इतकी हिरवळ आहे की, कर्मचा-यांना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटेल.

किंबहुना हेच या ऑफिसचे सगळ्यात मोठे वैशिष्ठ्य आहे.

बहुतांश ऑफिस ही केवळ सिमेंटची जंगले वाटतात, मात्र अॅपल पार्कमध्ये दिसणारी हिरवाई काही औरचं.

ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी असते.

 

wikimapia.org

 

या बिल्डिंगची खास बाब ही की, याच्या पायाभरणीत ७०० ‘बेस आयसोलेशन’ जोडले गेले आहेत,

ज्यात भूकंप आला तरी इमारतीला नुकसान होणार नाही. आत्पकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कॅम्पसमध्ये रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

येथे एक हजार लोक बसू शकतील या क्षमतेचे एक ऑडिटोरियम सुद्धा बनवले गेले आहे, ज्यात कंपनीचे अधिकारी कंपनी संबंधित माहिती मीडिया आणि अन्य इतर लोकांशी देऊ शकतील.

 

idownloadblog.com

 

या बिल्डिंगसाठी एकूण ३३ हजार ४१२ कोटी रूपये इतका खर्च आला आहे.

चार मजली इमारतीत सर्वात मोठे ३६० डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत.

या ऑफिसचे पूर्ण डिझाईन अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सने २०११ मध्ये केले होते.

हे ऑफिस जॉब्सचे स्वप्न मानले जाते. मात्र,५ ऑक्टोबर २०११ मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थच तेथे एक थिएटर बनवले गेले आहे.

 

i2.cdn.turner.com

 

कर्मचा-यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या तर ते शंभर टक्के प्रयत्नांसह काम करतील या विचारानुसार हे ऑफिस सजविण्यात आलं आहे.

अॅपलशी संलग्न असलेल्या प्रत्येक कर्मचा-याला इथे सर्व सुविधा मिळतात. यामध्ये ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असो वा जगभरातील नामवंत शेफ्सनी तयार केलेले चविष्ठ खाद्य असो.

त्यामुळे अॅपलशी जोडली जाणारी व्यक्ती सहसा हे ऑफिस सोडण्याचा विचार करच नाही असंही म्हटलं जातं.

अर्थात या ऑफिसमधील केवळ सुविधाच नव्हे तर एकंदरित कामाबाबत असलेलं हलकफुलकं वातावरण, वरिष्ठांकडून मिळणारं सहकार्य, कामात येणारी मजा यांचंही कौतुक कर्मचा-यांकडबन केलं जातं.

ह्या ऑफिसमध्ये काम करताना नेहमी कर्मचाऱ्यांना स्टीव्ह जॉब्स आणि त्याचे प्रेरणादायी विचार आठवतात, जे त्यांना अगदी चिकाटीने आणि ध्येयाने काम पूर्ण करण्यास मदत करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version