या आलिशान ट्रेनचं तिकीट आहे सात लाख – काय विशेष आहे या ट्रेनमध्ये?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सहसा ट्रेनकडे आपण एक प्रवासाचं साधन म्हणूनच पाहतो. पण तो प्रवास सुखकर, आरामदायी असावा अशी देखील आपली अपेक्षा असते. सध्याची आपल्या देशातील रेल्वेची अवस्था पाहता अगदी फारच कमी रेल्वे प्रवासांमध्ये आपल्या मनाप्रमाणे प्रवास घडतो.
मुंबईकरांसाठी तर ट्रेन चा प्रवास काही नवीन नाही, कित्येक मुंबईकर रोज धक्के खात लोकल ने त्यांच्या कामावर जातात आणि त्याच जीवघेण्या गर्दीतून घरी परततात! सुखाचा लोकल प्रवास हा मुंबईकरांच्या नशिबातच नाहीये जणू!
आणि सध्या तर मुंबईत येणारे प्रचंड परप्रांतीयांचे लोंढे तर याचं प्रमुख कारण आहे, तरीही लोकं आजही रेल्वेचा प्रवास सुकर मानतात आणि प्रत्येकाच्या खिशाला त्याचा खर्च परवडतो!
आपल्या इथे तर राजधानी किंवा दुरंतो सारख्या लांब पल्ल्याच्या आणि Luxury गाड्या सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहेत, राजधानीचा वेग आणि त्यात दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा ह्या सगळ्यांनाच मोहात टाकणाऱ्या आहेत!
या काही ट्रेन मुळे लोकं थाटात प्रवास करू लागले आणि हळू हळू ती गोष्ट अगदी नॉर्मल वाटू लागली!
असो, पण रेल्वेने लक्झरी प्रवास करण्याची मजाच काही और असते.
तुमच्यापैकी देखिल अनेक जणांच स्वप्न असेल लक्झरी रेल्वेने प्रवास करण्याचं, जसं कि भारतात महाराजा एक्सप्रेस म्हणून आहे, आशिया खंडातील सर्वात महागडी आणि लक्झरीयस रेल्वे म्हणून तिचा नावलौकिक आहे.
तुम्ही देखील ह्या ट्रेनबद्दल ऐकून असाल आणि विचार करत असाल कि एकदा तरी ह्याने प्रवास करायचा.
–
- जगातली पहिली ‘हॉस्पिटल ट्रेन’ आहे आपल्या देशात! वाचा, लाईफ लाईन एक्सप्रेसची कहाणी
- एक असे विमानतळ जेथे ट्रेन निघून गेल्यावरच विमान उड्डाण घेतं!
–
सध्या तर आपल्या देशात एकाच गोष्टीवरून प्रचंड वादंग पसरला आहे तो म्हणजे ‘बुलेट ट्रेन’! पण त्या वादात न पडता आज आपण अशाच जपान मधल्या एका आलिशान ट्रेन बद्दल जाणून घेणार आहोत!
तर मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी अश्याच एका ट्रेनबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत, हि ट्रेन पाहिल्यावर तुम्ही म्हणाल महाराजा एक्सप्रेस बरोबर स्वप्नांच्या यादीमध्ये ह्या ट्रेनचंही नाव जोडावं.
जेव्हा कधी हाय स्पीड ट्रेनची चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम जपानचे नाव समोर येते.
काही वर्षांपूर्वी जपान ईस्ट रेल्वेची पहिली लग्झरी बुलेट ट्रेन ट्रॅकवर उतरवली गेली. या ट्रेनमध्ये इतक्या फॅसिलिटीज आहेत की, त्यातून प्रवास करणा-या पॅंसेंजर्सला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसल्याचे फिलिंग देते.
२ मजली इमारतीच्या या ट्रेनमधील अलिशान सुएटमधून यात्रा करण्यासाठी तिकीट दर २००० डॉलर्स ते १०,००० डॉलर असे आहेत, म्हणजे आजच्या डॉलरच्या रेट मध्ये बघायला गेलं तर ७३०००० भारतीय रुपया पर्यंत या ट्रेनचं तिकीट आहे!
शिकी-शिमा नावाची ही दोन मजली ट्रेन टोकियोतून रवाना होऊन होक्काइदो आयलँडवर पोहचते. ह्या दरम्यान ट्रेन सुमारे ३ हजार किमी अंतर कापते.
ट्रेन पहिल्या दिवशी टोकियातून हकीनोह, दुस-या दिवशी नारु ते ऑनसेन, तिस-या दिवशी इकिनोसेकी आणि चौथ्या दिवशी होक्काइदो आयलँडवर पोहचते.
ट्रायल दरम्यान तिचा वेग हळू हळू वाढविण्यात आला होता. त्यामुळे टोकिया ते यूजावा पर्यंत येण्या-जाण्याला दोन दिवस व दोन रात्री लागल्या. त्या वेळेस ट्रेनच्या प्रवासासाठी मार्चपासूनच बुकिंग सुरु झाले होते आणि संपूर्ण ट्रेन पुढील ८ महिन्यांसाठी बुक झाली होती हे विशेष!
–
- अजब ट्रेनची गजब गोष्ट : इथे प्रवाशांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं!
- रेल्वेच्या डब्यांवरच्या या खास क्रमांकाचे गुपित तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल!
–
ह्या ट्रेनमध्ये १७ गेस्ट कंपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फक्त दोन प्रवासी बसू शकतात.
प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बेडरूमसह दोन एयरकंडीशन्ड बाथरूम सुद्धा आहेत. दोन मजली ट्रेनमध्ये हॉटेल, रेस्टांरंट, स्पा, डान्स क्लब आणि जीम फॅसिलिटी सुद्धा आहे.
पॅसेंजर्ससाठी त्यांच्या मनपसंतीचे जेवण खाण्यापासून ते महागडी दारूची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पॅसेंजर्सचा खाण्या-पिण्याचा आणि सर्व फॅसिलिटीचा चार्ज ट्रेनच्या तिकीटातच सामील केला आहे. यासोबतच या ट्रेनमध्ये पॅंसेंजर्सच्या एंटरटेनमेंटसाठी खास व्यवस्था केली गेली आहे.
ट्रेनमध्ये पॅंसेंजर्ससाठी एक हायटेक हॉस्पिटलची फॅसिलिटी आहे. ट्रेनमध्ये ऑटोमोबाइल एक्सपर्ट्सने पोर्शे, फेरासी, मेसेराटी कारच्या मॉडेलच्या धर्तीवर डिझाईन केले आहे.
तर अशा या आलिशान ट्रेन मधून तुम्हाला प्रवास करायची इच्छा झाली असेलच, आणि हो इतक्या सगळ्या सोयी सुविधा बघून कुणालाही इच्छा होऊच शकते!
ह्यातून प्रवास करायला कोणाला नाही आवडणार…फक्त तिकीट परवडले पाहिजे…नाही का?
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.