ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं रहस्य….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वर्षानुवर्षे तपस्या आणि मेहनत करून ऑलम्पिकमध्ये जाऊन शानदार कामगिरी करत मेडल मिळवणाऱ्यांचा काय अभिमान असतो ना आपल्याला!
खरं तर सुवर्ण-पदक हे फक्त चिन्ह आहे, तुम्ही ‘सर्वश्रेष्ठ’ असल्याचं. पण ते जाडजूड, भलंमोठं पदक “सोन्याचं” असतं, हे त्या पदकाबद्द्ल वाटणाऱ्या कुतुहला मागचं मोठं कारण असतंच.
पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल – ज्या गोल्ड मेडलसाठी जीवाचा इतका आटापिटा केला जातो ते गोल्ड मेडल “pure” नसतं, मिश्रित (भेसळ केलेलं) असतं! म्हणजेच ते शुद्ध सोन्याचं नसतं.
१९६८ च्या मॅक्सिकन ऑलम्पिक गेम्सच्या प्रत्येक मेडलचा आकार ६.५ मिली मीटर इतका मोठा असून रुंदी ६५.८ मिली मीटर होता. तर त्यांचे वजन १७६.५ ग्राम होते.
२०१२ च्या लंडन ऑलम्पिक गेम्सच्या मेडलचे वजन ३७५ ते ४०० ग्राम इतके होते.
ऑलम्पिकमध्ये विजयी स्पर्धकास देण्यात येणाऱ्या गोल्ड मेडलचा विचार केल्यास त्यामध्ये कमीत कमी ६ ग्राम (२४ कॅरेट) सोन्याचं प्रमाण असावं तर ९२.५ ग्राम चांदी आणि तांब्याचे मिश्रण असावे – असे संकेत आहेत.
रिओ ऑलिम्पिक पदकांचं एक वैशिष्ट्य असं होतं, की सर्व पदकांमध्ये काही प्रमाणात इलेक्ट्रिक वस्तूंचा कचरा recycle करून वापरला गेला होता.
forbs.com वेबसाईटने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची अशी माहिती देणारं एक छानसं info-graphic बनवलंय.
त्यावरून आणखी चांगली कल्पना येईल –
अर्थात, मेडल शुध्द सोन्याचं नसलं तरी काय झालं, गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कारकीर्दीमधील त्या विजयी सोनेरी क्षणाची किंमत मात्र काही केल्या कमी होत नाही.
त्या खेळाडूला गोल्ड मेडल मिळालेलं पाहून एक देशवासीय म्हणून आपल्याला होणारा अभिमान आणि वाटणारा आनंद, त्या खेळाडूसाठी लाखमोलाचा असतो…!
जाताजाता…
गोल्ड मेडल खरोखरंच पूर्णत: शुद्ध सोन्याचं असतं तर त्याची किंमत काय असती?
आजच्या बाजारभावानुसार?
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.