Site icon InMarathi

‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य!

lady army

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याच्या युगातील स्त्री कोठेही मागे नाही. कोणतेही क्षेत्र घ्या त्यात त्यांच्या हिरहिरीने असलेला सहभाग स्पष्टपणे दिसून येतो.

गेली कित्येक वर्षे पुरुषांच्या वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रियांना आता कुठे मोकळा श्वास मिळतोय आणि त्या आपले कर्तुत्व सिद्ध करतायत.

आता तर त्यांनी थेट संरक्षण क्षेत्रात हि गवसणी घातली आहे. जिथे जीव कधी जाईल ह्याची खात्री नसते त्या क्षेत्रात त्या पाय रोवून खंबीरपणे उभ्या आहेत आणि आपण देखील आपल्या देशाची सेवा करण्यास समर्थ आहोत हे दाखवत आहेत.

भारतीय संरक्षण क्षेत्राकडेच पहा, गेल्या ७-८ वर्षांमध्ये भारतीय सैन्याने कित्येक रणरागिणी देशाच्या रक्षणार्थ उभ्या केला आहेत, ज्याचा आपल्याला अभिमान आहेच.

असाच एक देश आहे इस्त्रायल.

 

 

हा देश आपल्या संरक्षण खात्यावर किती मेहनत घेतो हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

आपल्या प्रत्येक नागरिकाने वेळेप्रसंगी देशासाठी प्राण द्यायला देखील तयार राहिले पाहिजे अशी शिकवणच येथे लहानपणापासून दिली जाते.

अश्या राष्ट्रभक्तीने भारलेल्या ह्या देशातील महिला देखील देश प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात.

इस्त्रायलच्या संरक्षण खात्यातील ह्या महिला सैनिक जगातील सर्वात सुंदर पण क्रूर आणि धाडसी महिला म्हणून ओळखल्या जातात.

तुम्हाला माहित असेलच की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मागील ७० वर्षापासून शत्रूत्व आहे. इस्त्रायलने आतापर्यंत इराण, इराक, सीरिया, येमेन, सौदी अरेबिया, जॉर्डन यासारख्या आखाती देशांशी युद्धे केली व दिमाखात जिंकली सुद्धा.

इस्त्रायल जगातील असा पहिला देश आहे जेथे प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला आर्मी जॉईन करावीच लागते. मग तो पुरुष असो अथवा महिला.

 

presstv.ir

 

इस्त्रायलची एकून लोकंसख्या सुमारे ८६ लाखांच्या घरात आहे. ह्या देशात सैनिकांची संख्या ३१ लाखांच्या घरात आहे. ज्यात पुरुषांची संख्या १५,५४,१८६ इतकी आहे तर, महिला सैनिकांची संख्या १५,१४,०६३ इतकी आहे.

म्हणूनच इस्त्रायल जगातील एकमेव असा देश आहे, जेथे लष्करात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीही संख्या आहे.

लष्करी ट्रेनिंगमध्ये महिला किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही. जितके हार्ड ट्रेनिंग पुरुषांना दिले जाते तेवढेच ते महिलांनाही दिले जाते.

महिलांना आर्मीत भरती करण्याची प्रक्रिया १९४८ च्या अरब कंट्रीज विरुद्ध इस्त्रायल ह्या युद्धानंतर सुरु झाली.

 

haaretz.com

 

पुरुषांची संख्या कमी असल्याने सुमारे २० हजार महिलांना आर्मीत भरती केले गेले. या युद्धात इस्त्रायल एकटा होता तर दुस-या बाजूने जॉर्डन, लेबनान, इजिप्त, सीरिया, येमेन आणि सौदी अरब असे देश होते.

या भयानक युद्धात इस्त्रायल लष्कराला सैनिकांचा तुटवडा जाणवू लागताच सरकारने महिलांसाठीही दारे उघडली. दुसरीकडे, तेथील ज्यू महिलांनीही अशी काही हिंमत दाखवली जगात इस्त्रायलीचे कौतूक झाले.

यानंतर टप्प्याटप्प्याने इस्त्रायली लष्करात महिलांची संख्या वाढत गेली, जी आता पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे १५ लाखांच्या वर महिला सैनिक आहेत.  

शेजारील शत्रू राष्ट्र पॅलेस्टिनी दहशतवादी कारवाया कायम करत असल्याने महिला सैनिकांसाठी एवढ्या कठिण व कडक नियम, पद्धती आहेत की, इस्त्रायली महिलाही या दहशतवाद्यांना पुरुन उरतात.

 

haaretz.com

 

इस्त्रायच्या क्लास १६ ए नुसार लष्‍करी सेवेत महिला कॉम्बेट सोल्जर्ससाठी ३ वर्ष सेवा देणे सक्तीचे आहे.

३८ वर्षापर्यंत रिझर्व्ह सर्व्हिस सुरु ठेवावी लागते. प्रत्येक वर्षी १५०० महिला कॉम्बेट सोल्जर्स आयडीएफमध्‍ये येतात. २००० सालापूर्वी पूर्वी महिलांना कॉम्बेट रोलसाठी निवडले जात नव्हते.

२०१४ मध्‍ये आयडीएफने ओशरत बचरला इस्रायलची पहिली महिला कॉम्बेट बटालियनचा कमांडर निवडले.

 

israelstreet.org

 

आजवर इस्त्रायच्या महिला सैन्याने अनेक ऑपरेशन्स मधून देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांना जगातील सर्वात सुंदर पण तितक्याच धाडसी, क्रूर म्हणूनही ओळखल्या जातात.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version