Site icon InMarathi

या गावात “फोटोग्राफीवर” आहे बंदी…पण का? कारण ऐकून तुम्हाला हसू येईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. कधी ही गोष्ट बंद तर कधी ती गोष्ट बंद. पण काय हो, तुम्हाला असा प्रश्न केला की बंदी नेमकी कशासाठी घातली जाते?

तर तुमच्यापैकी बहुतेकांचे उत्तर हेच असेल की त्या गोष्टीमुळे काही नुकसान होत असेल, समाजात तेढ निर्माण होत असेल वा एकंदरीत त्याचे वाईट परिणाम होत असतील तर त्या गोष्टीवर बंदी घातली जाते.

आणि तुमचं हे उत्तर बरोबरच आहे म्हणा, पण जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांवर घातलेल्या बंदीला अगदीच हास्यास्पद कारणं कारणीभूत आहेत, जी पाहून तुम्ही देखील चक्रावाल.

अशीच एक गोष्ट म्हणजे एक गाव! ह्या गावामध्ये चक्क फोटोग्राफीवर बंदी घालण्यात आलीये.

आता ही बंदी जर योग्य कारणे डोळ्यासमोर ठेवून घातली असती तर प्रश्न वेगळा होता. पण ह्या गावाच्या बंदीमागचे कारण ऐकून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा :

 

 

ह्या गावामध्ये छायाचित्रणाला अर्थात फोटोग्राफीला बंदी घालण्यात आली आहे. 

एखाद्या मंदिरात वगैरे फोटोग्राफीला बंदी असल्याचे आपल्याकडे देखील आढळून येते, पण त्यामागे सुरक्षेचे कारण असते. पण ह्या गावामधील फोटोग्राफी बंदी मागचे कारण फारच विचित्र आहे.

गावातील फोटोग्राफीवरील बंदीला कारणीभूत आहे येथील सौंदर्य! हे गाव आहे स्विर्त्झलँडमध्ये, आणि गावाचे नाव आहे- बर्गुन!

 

 

हे गाव इतके सुंदर आहे की, तेथे फोटोग्राफीवर पूर्णपणे बंदी आहे आणि तसे केल्यास तेथे ९ न्यूझीलंड डॉलर म्हणजे जवळपास ४१३ रुपयांचा दंड भरावा लागतो.

खरं तर, गावातील लोकांनीच या भागात फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. गावात जागोजागी नोटिस बोर्ड लावले गेले आहेत आणि त्यावर लिहले आहे की, गावात फोटोग्राफीला बंदी आहे.

नोटीस बोर्डावर हे लिहले आहे की, येथील सुंदरता आपल्या डोळ्यांनी पाहा आणि त्याचा आनंद लुटा. फोटोग्राफीद्वारे नाही.

 

 

जेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांनी याचे कारण  जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा येथील महापौर पीटर निकोले यांनी सांगितले की,

आम्हाला नाही वाटत की येथे आलेल्या लोकांनी गावातील सुंदर फोटो फोटोज सेाशल मीडियात शेयर करावेत. कारण यामुळे असे लोक निराश होतात जे येथे येऊ शकत नाहीत.

निकोले यांनी हेसुद्धा सांगितले की, शास्त्रीयदृष्ट्या हे ही स्पष्ट झाले आहे की, सुट्टीतील सुंदर फोटो अशा लोकांना नाराज करतात जे फिरायला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे येथे कायदा करून फोटोग्राफी करण्यावर बंदी घातली आहे.

हे ही वाचा :

 

 

गावातील पर्यटन संचालक मार्क एंड्रिया बारांडनच्या माहितीनुसार, नगर परिषद निवडणूकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर हा नवा कायदा बनवला गेला आहे. अनेक लोकांनी असेही म्हटले आहे की हे गाव म्हणजे उत्तर कोरिया झाले आहे, कारण उत्तर कोरिया देशामध्ये देखील फोटोग्राफीसाठी बंदी आहे.

पण बरेच जण असेही आहेत ज्यांनी ह्या बंदीचे समर्थन केले असून, अशी ठिकाणे म्हणजे डोळ्यांनी अनुभवला जावा असा प्रसंग असतो, तो कृत्रिम डोळ्यांच्या सहाय्याने पाहून का वाया घालावा?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version