आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्वामी विवेकानंद यांनी त्यांचं जीवन एक संन्यासी म्हणून व्यतीत केलं. त्यांनी नेहमी आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी काम केलं. ते एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याचं अनुसरण आजही लोक करतात.
आपल्या ज्ञानाच्या जोरावर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला आपल्या पुढे नमवले होते.
ते एक असे संन्यासी आहेत ज्यांच्या विचारांचं अनुसरण आजही लोक करतात. एवढंच नाही, तर आजच्या युवा पिढीचेही एक आदर्श आहेत. म्हणूनच त्यांच्या नावाने ‘युवा दिन’ साजरा केला जातो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
स्वामी विवेकानंद एक असे संन्यासी होते ज्यांचे अनुयायी आज केवळ भारतातच नाही जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आढळतात. पण तुम्हाला हे माहित आहे का, की स्वामी विवेकांदांना ते एक संन्यासी असल्याची अनुभूती एका गणिकेने म्हणजेच वेश्येने करवून दिली होती.
–
हे ही वाचा – विवेकानंदांचं ओढूनताणून ‘पुरोगामीकरण’ करण्याच्या प्रयत्नांना चोख उत्तर देणारा सणसणीत लेख
–
एकदा स्वामी विवेकानंद जयपूर जवळ असणाऱ्या एका छोट्या रयतेचे पाहुणे म्हणून गेले होते.
काही दिवस तेथे घालविल्यानंतर जेव्हा विवेकानंद परतणार होते, तेव्हा या रयतेच्या राजाने त्यांच्यासाठी एक स्वागत समारंभ आयोजित केला. त्या समारंभासाठी त्याने बनारसच्या एका प्रसिद्ध वेश्येला बोलावलं होतं.
जेव्हा स्वामी विवेकानंदांना याची माहिती मिळाली, की त्यांच्या स्वागत समारंभात राजाने एका वेश्येला बोलावले आहे, तेव्हा ते संभ्रमात पडले. त्यांचा कळेच ना की एका वेश्येच्या समारंभात संन्याश्याचं काय काम?
अखेर त्यांनी या समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांच्या खोलीतच बसून राहिले.
मात्र, त्या वेश्येला याबद्दल कळलं, की ज्या महान व्यक्तीच्या स्वागत समारंभासाठी तिला बोलविण्यात आलं होतं, तिच्याचमुळे ते समारंभात सहभागी होण्यास तयार होत नाही आहेत.
यामुळे ती खूप दुखी झाली आणि तिने सुरदासाचं ‘प्रभुजी मेरे अवगुण चित न धरो…’ हे भजन गाण्यास सुरवात केली.
वेश्येने जे भजन गायिले त्याचा अर्थ असा होता की :
एक परीस तर लोखंडाच्या प्रत्येक तुकड्याला स्वतःच्या स्पर्शाने सोनं बनवतो – मग तो तुकडा देवघरात असो किंवा कसायाच्या दरवाज्यात असो.
जर तो परीस देवघरातील आणि कसायाच्या दरवाज्यातील दगडांत फरक करत असेल, म्हणजेच तो देवळातील दगडाला स्पर्श करून सोनं बनवत असेल, पण कसायाच्या दरवाज्यातील दगडाला नाही; तर तो परीस खरा नाही.
–
हे ही वाचा – नरेंद्रचा विवेकानंद करण्याची महान प्रक्रिया घडवून आणणारा हा खडक भारताचा ऐतिहासिक वारसा आहे!
–
विवेकानंदांनी ते भजन ऐकलं आणि ते वेश्या उभी असलेल्या ठिकाणी गेले.
त्यांनी बघितलं की त्या वेश्येच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामी विवेकानंदांनी आपल्या संस्मरणमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, त्यांनी त्यादिवशी पहिल्यांदा कुण्या वेश्येला बघितलं होतं.
पण तिला बघून त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं आकर्षण निर्माण झालं नाही. त्यादिवशी त्यांना पहिल्यांदा ही अनुभूती झाली होती की, ते पूर्णपणे संन्यासी झाले आहेत.
आपल्या संस्मारणात त्यांनी हे देखील लिहिले आहे की, याआधी जेव्हा ते त्यांच्या घरून निघायचे किंवा त्यांना कुठून त्यांच्या घरी परत यायचं असायचं तेव्हा त्यांना २ मैलाची चक्कर मारून यावं लागायचं.
कारण त्यांच्या घराच्या रस्त्यामध्ये एक वेश्यांचा भाग होता आणि संन्यासी असल्या कारणाने तिथून जाणं, हे त्यांना त्यांच्या संन्यासी धर्माच्या विरुद्ध वाटायचं.
पण त्या दिवशी राजाकडील स्वागत समारंभात त्यांना अनुभव आला, की एक खरा संन्यासी तोच आहे जो वेश्यांच्या भागातून गेला तरी त्याला कुठलाही फरक पडणार नाही.
अशा या अनुभवावरून विवेकनंदांना त्यांच्यातील संन्यासी वृत्तीची खात्री पटली. एका गणिकेने खऱ्या अर्थाने एका संन्याशाला जन्म दिला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.