Site icon InMarathi

इंग्रजांसमोर कधीही शस्त्र न टाकणारा एक ‘पराक्रमी’ योद्धा : यशवंतराव होळकर

holkar featured inmarathi

post card news

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले.

अश्याच शूर क्रांतीकारकांपैकी एक होते यशवंतराव होळकर.

 

post card news

 

यशवंतराव होळकर एका अश्या शूर योद्ध्याचं नाव आहे ज्यांची तुलना प्रसिद्ध इतिहासशास्त्री एन.एस. इनामदार यांनी ‘नेपोलियन’ सोबत केली आहे. ते मध्यप्रदेशातील मालवा रयतेचे महाराज होते.

यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला. त्यांच्या पित्याचं नाव तुकोजीराव होळकर होते. त्यावेळी होळकर समाजाचा प्रभाव खूप होता.

पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. त्यांच्यापैकीच एक ग्वालियरचे शासक दौलतराव सिंधिया हे देखील होते.

होळकर साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती म्हणून त्यांनी यशवंत रावांच्या मोठ्या भावाचा म्हणजेच मल्हारराव यांच्या हत्येचा कट रचून त्यांना ठार केले.

मोठ्या भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूने यशवंतराव हळहळले, पण त्यांनी लवकरच स्वतःला सावरले.

 

wikimedia.org

 

१८०२ मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी पुण्याच्या पेशवा बाजीराव द्वितीय आणि सिंधिया यांच्या संयुक्त सेनेला नमवले. तेथे खरी यांच्या शौर्याची पताका फडकली.

या दरम्यान इंग्रजांनी देखील भारतात आपले पाय पसरविण्यास सुरवात केली होती. तेव्हा यशवंतरावांसमोर आणखी एक मोठी आपत्ती येऊन ठेपली. ती म्हणजे भारताला या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे.

पण त्या करिता त्यांना इतर भारतीय शासकांच्या मदतीची गरज होती.

यासाठी यशवंतराव यांनी नागपूरचे भोसले आणि ग्वालियर येथील सिंधिया या राजपरीवारांसोबत हात मिळविला. त्यांनी या धोकेबाज इंग्रजांना देशातून बाहेर फेकण्याचा निश्चय केला.

पण यशवंतरावांच्या जीवनात संकटांची कमी नव्हती. जुन्या वैरापायी भोसले आणि सिंधिया यांनी ऐनवेळी त्यांची साथ सोडली आणि ते एकटेच राहिले.

 

amazon.com

 

त्यानंतर त्यांनी इतर शासकांनाही इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याची विनंती केली परंतु कोणीही त्यांचे ऐकले नाही.

अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. ८ जुन १८०४ ला त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले. त्यानंतर ८ जुलै १८०४ साली त्यांनी कोटा येथून इंग्रजांना हद्दपार केले.

यानंतर ते निरंतर त्यांच्या कार्यात सफल होत गेले.

अखेर ११ सप्टेंबर १८०४ ला ब्रिटीश जनरल वेलेस यांने लार्ड ल्युक यांना पत्र लिहीले की,

जर यशवंतरावांना लवकर थांबविल्या नाही गेले तर इतर शासकांसोबत मिळून इंग्रजांनी भारतातून हकालपट्टी करतील..!

 

sikhstudies.co.uk

 

यशवंतराव आता इंग्रजांसाठी त्यांच्या मार्गाचा काटा बनले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला करविला. या युद्धात यशवंतरावांनी भरतपूरच्या महाराज रणजीत सिंह यांची सोबत घेत एकदा परत इंग्रजांना पराभूत केले.

पण महाराज रणजीत सिंह यांनी लोभापायी यशवंतरावांची साथ सोडून इंग्रजांची साथ देण्याचे ठरवले.

तेव्हा यशवंतराव हतबल झाले, त्यांना कळेच ना की असे का होत आहे, का कोणी शासक त्यांचा साथ देत नाही?

यशवंतरावांच्या शौर्याची कहाणी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरायला लागली होती.

लोक त्यांच्या पराक्रमी आणि धाडसी व्यक्तिमत्वामुळे खूप प्रभावित झाले. त्यामुळे त्याचं सन्मानही वाढला.

कदाचित याच कारणामुळे त्यांचे जुने वैरी सिंधिया राजघराणे ज्यांची त्यांची साथ सोडली होती, ते पुन्हा त्यांची साथ देण्यास समोर सरसावले.

पण आता यामुळे इंग्रजांची झोपचं उडाली. त्यांना काळजी वाटू लागली की जर यशवंतराव यांच्या सोबत सर्व शासकांनी हात मिळवणी केली तर आपलं काही खरं नाही.

म्हणून त्यांनी एक डाव खेळला!

त्यांनी यशवंतरावांशी संधी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून यामुळे त्यांचा फायदा होईल.

 

bbci.co.uk

 

यावेळी इंग्रजांनी पहिल्यांदा विना अट संधी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी यशवंतराव यांच्याशी संधी करताना त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की,

त्यांना जे हवं ते देऊ, त्याचं जेवढ साम्राज्य आहे तेही त्यांना परत करू. फक्त या बदल्यात ते इंग्रजांशी लढणार नाहीत.

पण यशवंतराव हे भारत मातेचे खरे सुपुत्र होते. त्यांनी इंग्रजांची ही संधी  लाथाडली. त्यांचं केवळ एकच ध्येय होतं.

इंग्रजांना भारतातून बाहेर काढणे.

त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी देशातील सर्व शासकांना एकजूट करण्यास सुरवात केली. पण ते या कार्यात असफल ठरले.

दुसरीकडे त्यांचे एकमेव साथीदार सिंथिया यांनी देखील इंग्रजांची संधी केली. त्यामुळे यशवंतराव आता एकटे पडले.

अशा परिस्थितीत आता त्यांना काही मार्ग दिसत नव्हता. म्हणून त्यांनी स्वतःच इंग्रजांवर हल्ला चढवला.

इंग्रजांना स्वतःच्या बळावर पराभूत करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली. त्यासाठी त्यांनी भानपूर येथे दारू-गोळाचा कारखाना उघडला आणि त्यात ते दिवसरात्र झटत राहिले. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावू लागली.

 

TFIPOST

 

पण देशभक्तीच्या धुंदीत हरवलेले यशवंतराव यांना त्यांच्या ध्येयापुढे काहीही दिसत नव्हते.

अखेर २८ ऑक्टोबर १८११ साली इंग्रजांशी लढताना यशवंतरावांना वीरमरण आले, तेव्हा ते केवळ ३५ वर्षांचे होते.

ते एक असे शासक होते ज्यांच्यावर इंग्रज आपलं अभिपत्य नाही मिळवून शकले, ज्यांनी इंग्रजांच्य नाकीनऊ आणून सोडले.

आपले जीवन त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले.

जर त्यांच्याप्रमाणेच भारतातील इतर शासकांनीही भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याच्या संघर्षात त्यांची साथ दिली असती तर इंग्रज भारतावर एवढे वर्ष राज्य करू शकले नसते.

भारतातील जनतेला त्यांची गुलामगिरी करावी लागली नसती. त्यांचे अत्याचार सहन करावे लागले नसते.

जर यशवंतराव त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल झाले असते तर आज देशाची चित्र काही औरच असते. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या त्या कटू आठवणी आपल्या इतिहासात नसत्या, तर केवळ या शूरांची वीरगाथा असती.

पण यशवंतरावांसारख्या शूर आणि पराक्रमी विरांमुळेच आज आपण या स्वतंत्र भारतात सुखाने जगत आहोत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version