Site icon InMarathi

हात नाहीत, पाय ही नाहीत – पण जीवन असं जगतोय की अख्ख्या जगाने तोंडांत बोटं घालावीत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मनुष्याच्या मनात इच्छाशक्ती हवी, मग तो त्याच्या मनातील सर्व इच्छा कितीही संकटे आली, वादळे आली तरी लीलया पूर्ण करू शकतो असे म्हणतात आणि ही गोष्ट खरी देखील आहे म्हणा. इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय काय करू शकतो याची आपल्याला साधी कल्पना सुद्धा नाही!

आणि खासकरून जेंव्हा प्रश्न त्या माणसाच्या सरव्हायवल वर येतो तेंव्हा तो मनुष्य अशक्य गोष्टी सुद्धा करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे! 

काही सेकंद असा विचार करा की जर तुम्हाला हात किंवा पाय किंवा दोन्हीपैकी काहीच नसते तर तुम्ही काय केल असतं? आपल्याला हा असा विचार करून सुद्धा मनात असंख्य प्रश्नांच काहूर माजत तर ज्याच्यावर ही परिस्थिति आली असेल त्याने कशाप्रकारे या गोष्टीचा सामना केला असेल?

 

goal cast

 

संपूर्ण जगात तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील, ज्यात कित्येक व्यक्तींनी अगदी शून्यातून स्वत:ला घडवले आणि यशाचे शिखर गाठले.

पण ही सर्व मंडळी सामान्य होती आणि त्यांची कहाणी असामान्य, परंतु काही प्रेरणादायी कहाण्या अश्या असतात ज्यात कहाणीचा नायकच असामान्य असतो, त्यामुळे ती कहाणीच आपसूक अतिअसामान्य होऊन जाते.

अशीच कहाणी आहे निक व्युजिसिक ह्यांची, त्याने सुद्धा त्याच्या आयुष्याच्या वळणावर आलेल्या या संकटाचा सामना केलं आणि परिस्थितीवर मात करून त्याने स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवले आज या लेखात याविषयीच जाणून घेणार आहोत!

 

speakingtree.in

 

निक व्यूजिसिक ह्यांच्या वरील छायाचित्राकडे पाहून तुमचेही डोळे आश्चर्याने विस्फारले असतील. पण विश्वास ठेवा हा व्यक्ती असाच आहे. जन्मतःच त्यांना हात पाय नव्हते.

अतिशय दुर्मिळ जन्मजात विकार समजल्या जाणाऱ्या मेडिकल कंडिशन टेट्रा-एमेली सिंड्रोमसह त्यांचा जन्म झाला.

पण लहानपणापासूनच त्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती ठासून भरली होती, त्यांही त्या देखील अस्वस्थेत स्वत:ला तयार केले, हाता पाया विना जगणे शिकून घेतले. त्यांच्या डाव्या मांडीच्या खाली छोटा पाय आहे, त्याच्या सहाय्याने ते शरीराचे संतुलन ठेवतात.

 

त्यांचा जन्म झाल्यावर त्यांच्या वडिलांना जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्यांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही.

असे म्हणतात की त्यांनी अश्या परिस्थितीत नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलाला पाहताच रूमच्या बाहेर येऊन थेट उलटीच केली. त्यांच्या आईची तर त्यांच्याकडे पाहण्याची हिंमतच होत नव्हती.

तब्बल चार महिने ती मानसिक धक्क्यात होती. पण दोन्ही पालकांनी लवकरच वास्तव मान्य केले आणि आपल्या मुलाचे योग्य ते संगोपन केले.  त्यांनी त्याला मानसिक आधार दिला, कधीही त्याला स्वत:च्या अपंगत्वाचा न्यूनगंड येऊ दिला नाही.

 

rehabcenternearme.com

 

निक जेव्हा १८ महिन्यांचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला सर्वच रित्या सक्षम करण्याचे ठरविले. त्यांनी त्याला पाण्यात उतरविले. त्यांची आई देखील आपल्या मुलाच्या सक्षमीकरणासाठी कोणत्याही बाबतीत मागे नव्हती.

तिने एक प्लास्टिक उपकरण बनविले, ज्याच्या माध्यमातून निक ह्यांना छोट्या पायाने पेन आणि पेन्सिल पकडता येई.

पुढे जेव्हा निक ह्यांना शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा आपला मुलगा सामान्य  शाळेत कसा शिकेल हि चिंता त्यांच्या आईवडिलांना सतावत होती.

नक्की त्याला शाळेत घातले तर तो शिकू शकेल का, त्याचे सहकारी त्याच्याशी कसे वागतील अशा शंका होत्या. तरीही स्वत: शाळेने पुढाकार घेऊन निकला आपल्या शाळेत प्रवेश दिला.

हि घटना निक ह्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. पुढे त्यांनी आपले शिक्षाण अविरत सुरु ठेवले आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि रिअल इस्टेटमध्ये डिग्री घेतली.

 

IKOT.PH

 

निक आपल्याविषयी सांगताना म्हणतात की,

जेव्हा मी आठ वर्षांचा होतो तेव्हा मला माझे जीवन निरर्थक वाटत होते. मी आईला म्हणायचो, माझ्यात जगण्याची इच्छाच उरलेली नाही. मी माझ्या अश्या स्थितीसाठी देवाला दोष देत होतो आणि असा विचार करत होतो की,

जेव्हा माझे आईवडील नसतील, तेव्हा त्यांच्या मदतीशिवाय मी कसा जीवन व्यतीत करेन, कारण मला प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत घ्यावीच लागत असेल.

“भिंतीवर अडकवलेल्या एका ब्रशने मी ब्रश करीत असे. पण त्याशिवाय रोजची बहुतेक कामे पार पाडणे म्हणजे माझ्या दृष्टीने एक कसरत होती. मी जेव्हा दहा वर्षाचा झालो, तेव्हा कंटाळून मी ही आत्महत्येचा देखील प्रयत्न केला.

आपण निरर्थक आहोत हा न्यूनगंड माझ्या मनात घट्ट बसला होता.”

पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. जेव्हा मी १३ वर्षांचा झालो तेव्हा अपंग लोकांसंदर्भातील एक लेख माझ्या वाचनात आला आणि त्यातून मला मार्गदर्शन मिळाले की शरीराच्या अपंगत्वावर मात करून पुढे कसे जाता येईल.

माझ्या मनात असे  आले की, काहीतरी प्रेरणादायी करून लोकांपुढे मी माझा आदर्श निर्माण करावा, कदाचित हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.

 

i.ytimg.com

निक व्यूजिसिक गोल्फ आणि फुटबॉल खेळतात. ते उत्तम पाेहतात आणि सर्फिंगही करतात हे विशेष! १९९० साली त्यांनिक यांना ऑस्ट्रेलियन यंग सिटिझन पुरस्कार मिळाला.

२००८ पासून त्यांनी जगाचा प्रवास सुरु केला आणि लोकांना प्रेरणा देण्याचे कार्य सुरु केले.

nld.com.vn

पाहिलं? ध्येय स्पष्ट हवं आणि त्यासाठीही मेहनत घेण्याची तयारी हवी, निक यांनी अतिअसामान्य स्थितीमध्ये स्वत:च्या जगण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले, तुम्ही आम्ही तर चांगले हात-पाय धड असलेली माणसे आहोत, विचार करा आपण जर मनात आणलं तर काय काय करू शकतो!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version