' सारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका! – InMarathi

सारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हॉलीवूड ही जगातील सर्वात प्रतिष्ठीत फ्लिम इंडस्ट्री मानली जाते. हॉलीवूडचे कितीतरी चित्रपट तुम्ही बघितले असतील. हॉलीवूडमधील चित्रपटांच्या स्टोरी काही वेगळ्याच असतात, हे आपल्याला माहित आहेच. हॉलीवूडचे चित्रपट पाहताना मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. कधी – कधी आपण विचार करत असलेल्या गोष्टीपेक्षा काही वेगळेच घडते आणि आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण आपल्याला असे घडेल हे अपेक्षितच नसते. अश्या विचार करायला लावणारे हॉलीवूडमध्ये कितीतरी चित्रपट आहेत. त्यामुळे बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांची आपण तुलना देखील करतो. अशी तुलना होणे देखील साहजिकच आहे, कारण आपल्याला बॉलीवूड चित्रपट पाहिल्यानंतर तेवढी संतुष्टी मिळत नाही, जेवढी हॉलीवूडचे चित्रपट पाहिल्यानंतर मिळते.
ह्या वर्षात काही अप्रतिम हॉलीवूड चित्रपट येत आहेत. ज्यांच्या स्टोरी थरार वाढवणाऱ्या आहेत, तसेच त्यांच्यामधील एक्शन हे खूपच भारी आहे. चला तर मग जाणून घेऊयात, हे चित्रपट नेमके कोणते आहेत आणि त्यांच्यामध्ये पाहण्यासारखे काय आहे…

१. बॅटल ऑफ द सेक्सेस

Hollywood new movies.marathipizza
accessoriesmagazine.com

हा चित्रपट पाहून असे वाटते की, इमा स्टोन अजून एक ऑस्कर घेण्याची तयारी करत आहे. १९७३ मध्ये बिली जीन किंग आणि बॉबी रीग्स यांच्यामध्ये झालेली शत्रूता ही टेनिस खेळाच्या इतिहासातील एक निराशाजनक गोष्ट होती. हीच गोष्ट जोनाथन डेटन आणि व्हॅलेरी फरिस यानी या चित्रपटामध्ये मांडली आहे.

२. ब्लेड रनर २०४९

Hollywood new movies.marathipizza1
tumblr.com

रियान गोस्लिंग याचे वेगळे रूप तुम्हाला या चित्रपटामध्ये दिसून येईल, जे तुम्ही यापूर्वी कोणत्याही त्याच्या चित्रपटामध्ये पाहिले नसेल. रियान गोस्लिंगने या  चित्रपटामध्ये उत्तम अभिनय केल्याचे ट्रेलरवरून दिसून येते. रिडले स्कॉटने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट पाहून भविष्यामध्ये तुम्ही निश्चितपणे असे काहीतरी घडेल याची अपेक्षा करू शकता. ब्लेड रनर हा येत्या ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

३. द माउंटन बिटवीन अस

 

Hollywood new movies.marathipizza2
ytimg.com


केट विन्सलेट आणि इड्रस एल्बा हे अभिनय करत असलेला हा चित्रपट चार्ल्स मार्टिन यांच्या विक्रमी विक्री झालेल्या कादंबरीवर आधारित आहे. या स्टोरीमध्ये बेन बास म्हणजेच इड्रस एल्बाहा एक सर्जन दाखवलेला आहे, तर अॅलेक्स मार्टीन म्हणजेच केट विन्सलेटही एक फोटो जर्नालिस्ट दाखवलेली आहे. एक चार्टर विमान क्रॅश होतं आणि हे दोघे बर्फाच्या वाळवंटामध्ये हरवतात, यावर हा चित्रपट आहे. हा चित्रपट अबू-असद याने दिग्दर्शित केला आहे आणि ख्रिस वीट्झ आणि जे मिल्स गुड्लो यांनी लिहिलेला आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे.

४. मदर !

Hollywood new movies.marathipizza4
ytimg.com

डॅरेन अॅरोफोन्स्की यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये जेनेफर लॉरेंस, जावियर बार्डेम, मिशेल पीफेफर आणि एड हॅरीस यांनी अभिनय केलेला आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आहे. या कथेला अतिशय अनपेक्षितरित्या फिरवण्यात आल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला त्याची प्रचीती येईलच.

५. द किलिंग ऑफ अ डीर

Hollywood new movies.marathipizza5
screeneye.net

द लॉबस्टर या चित्रपटाचा दिग्दर्शक योरगोस लांथिमोस याने या चित्रपटामध्ये सायकोलॉजीकल थ्रीलर दाखवलेला आहे. निकोल किडमन आणि कॉलिन फॅरेल यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. अलिसिया सिल्व्हरस्टोन हिने यामध्ये लहान पण खूप महत्त्वाचा रोल केला आहे.

६. थॉर : रंगरोक

Hollywood new movies.marathipizza6
gifyu.com

ख्रिस हॅम्सवर्थ, टॉम हिडलस्टोन, केट ब्लॅंचेट, टेसा थॉम्पसन, जेफ गोल्डब्लम, आणि मार्क रफ्लो हे आपल्याला या चित्रपटामध्ये वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. Taika Waititi यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि मनोरंजनाचा मसाला आहे.

७. मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस

Hollywood new movies.marathipizza7
cinedogs.gr


या चित्रपटाची कथा गूढ आणि आकर्षक असण्याची शक्यता आहे. केनेथ ब्रनाघने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जुडी डेंच, मिशेल पीफेफर, ओलिविया कॉलमन, पेनेलोप क्रूझ, विलियम डेफे आणि जॉनी डेप यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटात ओरिएंट एक्सप्रेसमध्ये झालेल्या खूनाचा तपास कसा केला जातो, हे दाखवले आहे.

८. वंडर

Hollywood new movies.marathipizza8
movies.uk.com

स्टीफन चिबोस्की याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये ज्युलिया रॉबर्ट्स आणि ओवेन विल्सन यांनी अभिनय केले आहे. या दोघांचा मुलगा जेकब ट्रेंबला याचा चेहरा थोडा विचित्र असतो. त्याला ते दोघे आई – वडील जीवनात पुढे जाण्यासाठी त्याच्यामधील गेलेला आत्मविश्वास त्याला परत कसे मिळवून देतात, हे यामध्ये सांगितले आहे.

९. जस्टीस लीग

Hollywood new movies.marathipizza3
dccomics.com

वंडर वूमन गल गॅडोट परत एकदा आपल्याला या चित्रपटामधून बघायला भेटणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर बॅटमॅन (बेन ऍफ्लेक), एक्वामॅन (जेसन मोमो), सायबोर्ग (रे फिशर) आणि द फ्लॅश (एजरा मिलर) यांची युनियन आहे. यामध्ये आपल्याला खूप अॅक्शन पाहण्यास मिळेल.

१०. द ग्रेटेस्ट शोमॅन

Hollywood new movies.marathipizza9
justjared.com

ह्यूज जॅकमॅनच्या या चित्रपटाबद्दल आताच सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. याचा ट्रेलर देखील खूप छान आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मायकेल ग्रेसने केले आहे. यामध्ये ह्यूज जॅकमॅन बरोबर झॅक एफ्रॉन, झेंडया हे देखील आहेत. हा चित्रपट ह्या डिसेंबरला रिलीज होणार आहे.

असे हे मनोरंजक हॉलीवूड चित्रपट संधी मिळाली तर पाहायला अजिबात विसरू नका…

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?