कहाणी विक्की रॉयची, रस्त्यावर कचरा वेचणारा मुलगा ते सुप्रसिद्ध छायाचित्रकार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – विशाल दळवी
===
“जीवनातील सर्वोत्तम दिवस जगायचे असतील तर तुम्हाला अनेक वाईट दिवसांचा सामना करावाच लागतो, आणि तेव्हाच कळते ‘यशाची किंमत’”
एका धाब्यावर भांडी घासणाऱ्या गरीब मुलाला पाहून कोणीतरी विचारले, “बेटा, जिंदगीभर यही करना है क्या?” तर त्यावर लहान मुलाने दिलेले उत्तर त्याची अचाट महत्वकांक्षा सिद्ध करण्यास पुरेसे होते.
साहेब ये काम मेरा शौक नही है | मुझे जो शौक है, वो मुझे एक दिन बहोत बड़ा आदमी बनाएगा इतना जरूर जानता हूँ!
आणि आज त्याच मुलाने आपले शब्द खरे करून दाखवलेत. तो मुलगा म्हणजे प्रसिध्द छायाचित्रकार विक्की रॉय.
खिशात केवळ ८०० रुपये आणि डोळ्यात साठवलेली भावी आयुष्याची स्वप्ने, एवढ्या पुंजीवर पश्चिम बंगालमधील आपले घर सोडून आलेला विक्की दिल्लीला उतरला आणि त्याच्या खडतर प्रवासाची सुरुवात झाली.
कधी कचरा वेचण्याचे काम तर कधी भांडी घासण्याचे काम करणाऱ्या विक्कीला एक महिलेने ‘सलाम बालक ट्रस्ट’ मध्ये आश्रय दिला. इथूनच त्याच्या आयुष्याला आकार मिळत गेला.
२००४ मध्ये त्याला एका ब्रिटीश छायाचित्रकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून कॅमेरा आणि लेन्सशी त्याची नाळ जोडली गेली ती कायमचीच.
विक्कीने लहानपणात जे गरीबीचे जीवन अनुभवले होते त्यालाच आपली ‘फोटोग्राफी थीम’ मानून त्याने आपल्या छायाचित्रकारतेच्या प्रवासाचा शुभारंभ केला.
त्याने टिपलेली, त्याची स्वतःची आवडती छायाचित्र :
त्याच्या या ‘थीम’वर आधारलेल्या २५ छायाचित्रांचे ‘द इंडिया हॅबिटॅट गॅलरी’ मध्ये ‘स्ट्रीट ड्रीम्स’ या शीर्षकाखाली प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला साथ लाभली होती, ब्रिटीश हाय कमिशन आणि यु.के. डिपार्टमेंट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ यांची.
विक्कीच्या ७ छायाचित्रांची प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री झाली हे विशेष…! आणि विक्कीच्या पंखानी नव्याने भरारी घेतली.
आजवर अनेक पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या या छायाचित्रकराचा सर्वात मोठा सन्मान तेव्हा झाला जेव्हा त्याच्या नावाचा फोर्ब्स एशिया २०१६च्या सर्वोत्तम ३० कलाकारांमध्ये समावेश करण्यात आला.
विक्की रॉयने लेन्स आणि कॅमेरासह रेखाटलेल्या अद्भुत छायाचित्रांचा नजराणा vickyroy.in ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
या प्रतिभावंत कलाकाराच्या माथी सर्जनशीलतेचा हात सदैव राहो हीच सदिच्छा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.