' जगातील सर्वात विद्वान पंतप्रधानाबद्दल सहसा कोणालाही माहित नसलेल्या गोष्टी! – InMarathi

जगातील सर्वात विद्वान पंतप्रधानाबद्दल सहसा कोणालाही माहित नसलेल्या गोष्टी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मनमोहन सिंग…ह्या व्यक्तीबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. काहींसाठी ही व्यक्ती म्हणजे चेष्टेचा विषय आहे जे आपल्याच देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल, कारण जर ही व्यक्ती एखाद्या पाश्चिमात्य देशात असती तर तेथील लोक मनमोहन सिंग यांना डोक्यावर घेऊन नाचले असते, त्यांनी त्यांचा कधीही अनादर केला नसता. भारतात आजही एक अपयशी राजकारणी आणि अपयशी पंतप्रधान म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी जगात मात्र एक प्रतिष्ठीत विद्वान म्हणून त्यांना मान दिला जातो हे दुर्लक्षित करून चालणार नाही. बऱ्याच जणांना वाटत असले की मनमोहन सिंग यांच्याबद्दल जाणून घेण्यासारखे काय विशेष असणार आहे? तर मंडळी आज तुमचा हाच गैरसमज आम्ही दूर करणार आहोत. चला जाणून घेऊया भारताच्या ह्या माजी पंतप्रधानांबद्दल आजही गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी!

 

१) मनमोहन सिंगांचा जन्म फाळणीपूर्व भारतातला होय

manmohan--singh-marathipizza01
outlookindia.com

२६ सप्टेंबर १९३२ रोजी गुरमुख सिंग आणि अमरीत कौर यांच्या पोटी पंजाबच्या गाह ठिकाणी शीख कुटुंबात मनमोहन सिंगांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्या आईचे देहांत झाले, त्यानंतर त्यांच्या आजी आजोबांनी त्यांचे संगोपन केले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसरला येऊन पोचले. १९५८ रोजी गुरशरण कौर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन कन्या रत्न आहेत.

 

२) भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान होणारा पहिला शीख व्यक्ती

manmohan--singh-marathipizza02
livemint.com

२००४ ते २०१४ असा तब्बल १० वर्षांचा भारतीय पंतप्रधान म्हणून त्यानी कार्यकाळ सांभाळला, देशाचे ते पहिले शीख पंतप्रधान ठरले.

 

३) त्यांची सर्व हिंदी भाषणे उर्दूमध्ये असतात

manmohan--singh-marathipizza03
s3.india.com

ही गोष्ट ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसेल, पण हे खरे आहे की मनमोहन सिंग हिंदी वाचू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या सोयीसाठी त्यांची बहुतेक हिंदीतील भाषणे उर्दूमध्ये लिहिलेली असायची, कारण त्यांचे उर्दूवर जास्त प्रभुत्व होते. म्हणूनच जेव्हा त्यांचं पहिलं भाषण जे टीव्हीवर झळकणार होतं, ते हिंदीमध्ये होते, त्याची प्रॅक्टीस करण्यासाठी त्यांना ३ दिवसांचा कालावधी लागला.

 

४) कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही

manmohan--singh-marathipizza04
intoday.in

१९९१ साली पंतप्रधान नरसिंहा राव यांनी अचानक नवीन अर्थमंत्री म्हणून पदभार मनमोहन सिंग यांच्या हाती सोपवला, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण तेव्हा त्यांची कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती.

 

५) जगातील सर्वात विद्वान पंतप्रधान

manmohan--singh-marathipizza05
blogspot.com

ही गोष्ट बऱ्याच जणांना ठावूक नाही की आपल्या भारताला एक असा पंतप्रधान लाभला होता जो आजवरच्या जागतिक इतिहासातील सगळ्यात विद्वान पंतप्रधान आहे. विश्वास बसत नसले तर त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी स्वत:च तपासून पहा

 

६) त्यांना मिळालेले पुरस्कार थक्क करणारे आहेत

manmohan--singh-marathipizza06
firstpost.com

ते भारतातील दुसरे असे व्यक्ती आहे ज्यांनी जगातील बहुतेक प्रतिष्ठीत पुरस्कार पटकावले आहेत. पद्मविभूषण (१९८७), भारतीय विज्ञान कॉंग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार (१९९५), आशिया मनी अवॉर्ड- फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर (१९९३ आणि १९९९४), युरो मनी अवॉर्ड- फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर (१९९३), अॅडम स्मिथ प्राईझ ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज (१९५६), राईटझ प्राईझ फॉर डीस्टींग्यूश्ड पर्फोर्मन्स अॅट सेंट जॉन कॉलेज ऑफ इन कॅम्ब्रिज (१९९५) हे झाले काही महत्त्वाचे पुरस्कार, असे अजून अनेक पुरस्कार मनमोहन सिंगांच्या नावावर आहेत.

 

७) एकमेव पंतप्रधान ज्यांची पुनर्निवड झाली

manmohan--singh-marathipizza07
media2.intoday.in

पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर मनमोहन सिंग पहिले असे पंतप्रधन आहेत ज्यांनी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची पुन्हा निवड करण्यात आली.

 

८) सकाळी उठल्या उठल्या बीबीसी न्यूज ऐकायची त्यांना सवय आहे

manmohan--singh-marathipizza08
southdreamz.com

एका मुलाखतीत त्यांनी आपली ही सवय उघड केली होती, त्यांना सकाळी उठल्या उठल्या बीबीसी न्यूज ऐकायची आवड आहे, त्याशिवाय त्यांचा दिवसच सुरु होत नाही. त्यांच्या ह्याच सवयीमुळे २००४ साली जेव्हा त्सुनामी आली होती तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांकडून एक पंतप्रधान म्हणून त्यांना सूचना मिळण्याऐवजी त्सूनामीची बातमी त्यांना आधीच बीबीसी न्यूज वरून कळली होती.

 

९) साध्या आणि सात्विक जेवणाची आवड

manmohan--singh-marathipizza09
.intoday.in

एका देशाचा पंतप्रधान म्हणून कोणीही व्यक्ती त्याला हवं ते खायला मागवू शकतो, अगदी महागतील महागड्या डिशेस सुद्धा, पण मनमोहन सिंग यांना मात्र साध्या आणि सात्विक जेवणाची आवड होती. असे म्हणतात की सकाळी नाश्त्याला त्यांना त्यांची पत्नी चहा आणि मारी बिस्कीटे द्यायची.

 

१०) पंतप्रधान पदा व्यतिरिक्त इतरही पदे भूषवली

manmohan--singh-marathipizza10
livemint.com

१९७६ मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम पाहिले होते. १९७६-१९८० या काळात रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आली होती. सोबतच याचं काळात ते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणूनही ते पद भूषवत होते. १९८०-१९८२ ह्या काळात ते प्लानिंग कमिशनचे सदस्य होते. ह्या सोबतच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, साउथ कमिशनचे जनरल सेक्रेटरी, स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये स्थित असलेल्या थिंक टँकचे स्वतंत्र अर्थतज्ञ, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनचे चेअरमन आणि प्लानिंग कमिशन ऑफ इंडियाचे डेप्युटी चेअरमन म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती आणि ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय कार्यक्षम रित्या हाताळल्या हे विशेष!

असे थोर व्यक्तिमत्त्व आपल्या भारताला लाभले हे आपले सौभाग्य!!!!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?