Site icon InMarathi

तुम्हाला आवडणारी ही सारी लोकप्रिय गाणी चक्क चोरलेली आहेत!

song-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड ही जगातील नावाजलेल्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक इंडस्ट्री आहे. बॉलीवूडला भारतातील आणि जगातील प्रेक्षकववर्गांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

बॉलीवूडमधील स्टार्स जसे आपल्याला पसंत असतात, त्याचप्रमाणे बॉलीवूडमधील गाणी देखील आपल्याला खूप आवडत असतात. अगदी ८०च्या दशकापासून ते आतापर्यंत या गाण्यांना नेहमीच प्रेक्षकांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे.

तुम्हाला देखील बॉलीवूडची बहुतेक गाणी आवडत असतील. काहींना तर या बॉलीवूड गाण्यांचे इतके वेड असते की, त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकल्याशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नाही.

अर्थातच, गाण्यांची हौस सगळ्यांनाच असते, फक्त प्रत्येकाच्या गाण्याच्या आवडी वेगवेगळ्या असतात.

पण तुम्हाला जर समजले की, तुमचे आवडते गाणे हे दुसरीकडून चोरलेले आहे, तर तुम्हाला कसे वाटेल ? आज आपण अश्याच चोरलेल्या गाण्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला मग बघा यामध्ये तुमचे आवडते गाणे देखील आहे का ते…

मुझे नींद न आये…

 

 

१९९० मधील आमीर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या दिल या चित्रपटामधील हे गाणे लोकांना खूप आवडले होते. पण तुम्हाला माहित आहे, हे गाणे इंग्लंड चा प्रसिद्ध देसी बँड – चन्नी सिंग यांच्या बँडमधील चुन्नी उड उड जाये या गाण्यावरून घेतलेले आहे.

 

 

हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम…

 

 

२००७ मध्ये आलेला अक्षय कुमारचा भूलभुलैया हा चित्रपट खूपच मनोरंजक होता. हॉरर कॉमेडीने रचलेल्या या चित्रपटामधील हरे राम हरे राम हे गाणे दक्षिण कोरिया डान्स म्युझिक ग्रुप जीटीएल यांच्या माय लेकॉन या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

ऐ दिल लाया है बहार…

 

 

२००० मध्ये प्रीती झिंटा हिचा ‘क्या कहना’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये जेव्हा प्रिती झिंटा घरी परत येते, तेव्हा हे गाणे आहे. हे गाणे ५० च्या दशकातील नील सेदाका यांच्या ओ कॅरोल या गाण्यामधून घेतले गेले आहे.

 

खल्लास…

 

२०१६ मध्ये आलेला वीरप्पन हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटामधील झरीन खानचं खल्लास हे गाणं इशा कोप्पीकरच्या खल्लास गाण्याशी मिळते जुळते घेतले आहे. पण हे गाणे डिलॉन फ्रान्सिस आणि डिजे स्नेक यांच्या गेट लो या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

प्यार तो होना ही था…

 

 

१९९८ मध्ये आलेला प्यार तो होना ही था हा चित्रपट हॉलीवूड चित्रपट फ्रेंच किसचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि काजोल यांनी काम केले होते. त्यामध्ये रोमांटिक कॉमेडी दाखवण्यात आली होती.

या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या सुरवातीचे संगीत हे ब्रायन अॅडमच्या have you ever really loved a woman या गाण्याच्या संगीताशी तंतोतंत जुळते.

 

 

दिल चीज तुझे दे दी…

 

 

२०१६ मध्ये अक्षय कुमारचा एअरलिफ्ट हा चित्रपट आला होता. कुवेतमधून भारतीय लोकांना सुखरूप सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामध्ये दाखवलेले आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. लोकांना वाटते की, हे गाणे मिल्क आणि हनी यांच्या दीदी या गाण्यावरून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे १९९२ मधील दीदी या गाण्यापासून घेतले आहे, जे नायजेरीन कलाकार छेब खालेद याने बनवले होते.

 

 

दिलने दिल को पुकारा…

 

 

२००० मध्ये ॠतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आला होता. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला आणि राजेश रोशन हे संगीतकार असलेल्या या चित्रपटामध्ये हे गाणे होते.

या गाण्याच्या सुरवातीला एक संगीत आहे, जे द वॉइसेसच्या वेन्जेलीस या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

बुलेया…

 

 

२०१६ मध्ये आलेल्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. अनुष्काचे लग्न झाल्यानंतर जेव्हा रणबीर कपूर मनात दुःख घेऊन परततो आणि त्याची ऐश्वर्याशी भेट होते.

त्यानंतर बुलेया हे गाणे आहे. काही लोकांना वाटते की, हे गाणे पापा रोचच्या लास्ट रेसॉर्टमधून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे आयर्न मेडन याच्या गेंगीस खान या संगीतामधील आहे.

 

 

नशे सी चढ गई…

 

 

२०१६ मध्ये आलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे रिलीज झाल्यावर यूट्यूबवर खूप गाजले होते.

पण चित्रपट एवढा काही प्रेक्षकांना आवडला नाही. ‘नशे सी चढ गई’ हे गाणे एका कार्टूनमधील junjou romantica track १ च्या संगीतामधून घेतले आहे.

 

 

पहली नजर मैं…

 

 

२००८ मध्ये आलेल्या सैफ आली खानच्या ‘रेस’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. त्यावेळी अतिफ अस्लमने गायलेले हे गाणे खूप चर्चेत होते. हे गाणे कोरियन कलाकार किम ह्युंगच्या  sarang hae yo या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

या सर्व प्रकाराला काय म्हणायचं?

तुमच्यापैकी काहीजणांना या कॉपी-कॅट गोष्टी, फसवाफसवी वाचून खूप वाईट वाटले असेल. परंतु या प्रकाराकडे दुसऱ्या बाजूने बघता येईल…

जगामध्ये अनेक प्रकारच्या अत्युच्च कलाकृती, गाणी, संगीत तयार होत आहे आपण सर्व भारतीय रसिकांपर्यंत ह्या कलाकृती पोहोचत आहेत आणि त्या सुंदर गाण्यांचा, त्या सुंदर चालींचा आपल्याला आस्वाद घेता येतोय ते या गाण्यामुळे, अगदी बॉलिवूडमधल्या कॉपीकॅट गाण्यांमुळे शक्य झालं आहे, तर त्यात वाईट मानून घ्यायचं का?

तुम्हीच ठरवा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version