' वाचन असो वा डिजिटल व्यवहार: हे ९ क्रोम एक्सटेन्शन्स असल्याशिवाय इंटरनेटचा परिपूर्ण फायदा अशक्य आहे – InMarathi

वाचन असो वा डिजिटल व्यवहार: हे ९ क्रोम एक्सटेन्शन्स असल्याशिवाय इंटरनेटचा परिपूर्ण फायदा अशक्य आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गुगल क्रोम हे तर आपल्या रोजच्याच वापरातलं. म्हणजे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की १०० मधले ८५ लोक गुगल क्रोमच्या सहाय्याने इंटरनेट वापरतात.

अर्थात गुगल क्रोम ब्राउझर आहे देखील तसंच!

म्हणजे इतर कोणत्याही ब्राउझर पेक्षा त्याची कार्य करण्याची पद्धत अतिशय प्रभावशाली आहे. त्यातच गुगल सारख्या नावाजलेल्या टेक कंपनीचं स्वत:च ते संशोधन असल्याने आपण देखील डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवू शकतो.

मंडळी आपल्यापैकी बरेच जण गुगल क्रोमचा केवळ सर्फिंग साठी उपयोग करत असतील, पण ते त्यापेक्षाही पलीकडलं आहे.

 

google-extensions-marathipizzza00

 

गुगल क्रोम विविध फीचर्सने युक्त आहे आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचं फिचर आहे गुगल क्रोम एक्सटेन्शन!

हे एक्सटेन्शन करतं काय – तर तुमचा ब्राउझिंग एक्सपिरीयन्स सुधारतं. अजूनही लक्षात नाही आलं? काळजी नको…आज आम्ही तुम्हाला गुगल क्रोमच्या सर्वोत्तम बेस्ट १० एक्सटेन्शन बद्द्दल माहिती देणार आहोत.

ही खालील माहिती वाचली की आपोआपच तुमाच्या लक्षात येईल गुगल क्रोम एक्सटेन्शनचं महत्त्व!

१) HTTPS एव्हरीव्हेअर

 

google-extensions-marathipizzza11
void.gr

 

तुम्हाला माहितच असेल की HTTPS हे ठराविक वेबसाईट विश्वसनीय आहे हे दर्शवते. कधी तूनही बँकिंग व्यवहार ऑनलाईन केले असतील तर HTTPS चे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल.

अश्यावेळी हे HTTPS प्लगइन महत्त्वाच ठरतं.

हे प्लगइन नॉन-सिक्यूअर HTTPS साईट्स सिक्युअर करत, म्हणजे तुमच्या ऑनलाईन प्रायव्हसिला धोका उत्पन्न होत नाहीत. तुमच्यासोबत होणारा संभाव्य फ्रोड टाळला जाऊ शकतो. म्हणूनच हे एक्सटेन्शन प्रत्येकाकडे असावं असा सल्ला दिला जातो.

 

२) ब्लर

 

google-extensions-marathipizzza02
lh3.googleusercontent.com

इंटरनेट वर वावरताना आपली सेक्युरिटी जपणे अतिशय गरजेचे असते. त्यातल्या त्यात आपला महत्वाचा डेटा वा आर्थिक बाबी असतील तर त्यासंदर्भात तर अधिकच जागृत राहावे लागते.

तुम्ही देखील गुगल क्रोम वापरत असाल आणि तुम्हाला तुमच्या सेक्युरिटीची चिंता लागून राहिली असेल तर तुम्ही प्रसिद्ध ब्लर एक्सटेन्शन इन्स्टोल केलंच पाहिजे.

 

३) रीडॅबिलीटी

 

google-extensions-marathipizzza03
theworldbeast.com

आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुगल क्रोम वर सर्फिंग करता करता निरनिराळे आर्टिकल्स वाचायला आवडत असतील..तर मंडळी हे एक्सटेन्शन खास तुमच्यासाठीच आहे.

हे एक्सटेन्शन कोणतेही आर्टिकल तुमच्यासमोर अगदी सोयीस्कर आणि प्रभावी पद्धतीने उघडते, ज्यामुळे तुम्हाला सामान्य आर्टिकल वाचताना जो त्रास होतो तो त्रास होत नाही.

मुख्य म्हणजे ह्यात तुम्हाला रीड नाऊ आणि रीड लेटर चा देखील पर्याय मिळतो. प्रत्येक डिजिटल वाचका जवळ हे गुगल क्रोम एक्सटेन्शन असायलाच हवं.

 

४) गुगल डिक्शनरी

 

google-extensions-marathipizzza04
lh3.googleusercontent.com

हे अजून एक उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन! इंटरनेट वापरताना बऱ्याचदा इंग्रजीतले काही शब्द आपल्या लक्षात येत नाहीत.

अश्या वेळेस हे एक्सटेन्शन तुमची मदत करतं आणि हे वापरायला पण अगदी सोप्प आहे म्हणजे एकदा का तुम्ही हे एक्सटेन्शन इन्स्टोल केलं, की तुम्हाला फक्त न कळणाऱ्या शब्दावर डबल क्लिक करायचं आहे, झालं!

त्या शब्दाचा अर्थ न अर्थ पॉप अप मध्ये तुमच्यासमोर उलगडला जाईल.

आहे की नाही भन्नाट!

 

५) गुगल इनपुट टूल्स

 

google-extensions-marathipizzza06
cloud.addictivetips.com

 

इंग्रजी व्यतिरिक्त अन्य  भाषांमध्ये टाईप करण्यासाठी मार्ग शोधणाऱ्यांनी ह्या एक्सटेन्शनचा आधार घेतलाच पाहिजे. कोणत्याही प्रकारचं डेक्सटॉप इन्स्टोलेशन केल्याशिवाय सर्व महत्त्वाच्या भाषा तुमच्यासमोर उलगडल्या जातात. मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या त्या भाषेसाठी वेगळी टाईपिंग शिकायचीही गरज नाही.

भाषा सिलेक्ट करून इंग्रजी मध्ये त्या त्या शब्दाची स्पेलिंग टाकत सुटायचं आणि तो शब्द त्या भाषेत लिहिला जाईल.

 

६) पुश बुलेट

 

google-extensions-marathipizzza07
youtube.com

ह्या एक्सटेन्शनबद्दल फारसं लोकांना माहित नाही. पण हे एक बेस्ट एक्सटेन्शन म्हणून पुढे येतंय. कारण हे एक्सटेन्शन तुमचा अँड्रोईड स्मार्टफोन तुमच्या डेक्सटॉपच्या गुगल क्रोम स्क्रीन वर आणतं! काय आश्चर्य वाटलं? पण हे खरं आहे.

ह्या एक्सटेन्शनच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अँड्रोईड स्मार्टफोनमधील बरेचस फंक्शन तुमच्या डेक्सटॉपवर वापरू शकता. ह्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे हे पुश बुलेट एक्सटेन्शन तुमच्या गुगल क्रोम ब्राउझर मध्ये आणि अँड्रोईड स्मार्टफोन मध्येही इन्स्टोल करायचे आहे.

 

७) स्टे फोकस्ड

 

google-extensions-marathipizzza08
i0.wp.com

 

नावाप्रमानेच हे एक्सटेन्शन गुगल क्रोम वर काम करत असताना तुमचा कामावरचा फोकस ढळू न देण्याकडे लक्ष देतं.

बऱ्याचदा होतं काय की आपण काम करायला बसतो पण फेसबुक, वॉट्सअप, युट्युब आणि अश्या अनेक मनोरंजक साईट्सवरच आपला अर्ध्या अधिक वेळा वाया जातो आणि नंतर वेळ टाळून गेली की लक्षात येतं, आपण आपलं काम केलेलच नाही.

जर तुमची देखील ही समस्या असेल तर हे एक्सटेन्शन नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. हे एक्सटेन्शन तुम्हाला एक लिमिट देत, त्या लिमिटप्रमाणे तुम्ही तेवढ्याच वेळासाठी गुगल क्रोम वापरू शकता आणि ती लिमिट क्रॉस झाली की हे एक्सटेन्शन तुमच्या लक्षात आणून देतं की तुमचं काम बाकी आहे, ते पहिले पूर्ण करा. आहे की नाही मस्त !

 

८) मोमेंटम

 

google-extensions-marathipizzza09
youtube.com

हे काहीसं क्रियेटीव्ह एक्सटेन्शन आहे. जर तुम्ही तुमच्या क्रोमच्या रोजच्या न्यू टॅब पेजला पाहून कंटाळला असाल तर तुम्ही हे मोमेंटम एक्सटेन्शन वापरून तुमचे न्यू टॅब पेज तुमच्या मनासारखे बनवू शकता. एखादी सुपर बॅकग्राउंड इमेज, सोबत एक मोटिव्हेशनल क्वोट असेल तर क्या बात…नक्की ट्राय करून पहा.

 

९) म्युजीक्समॅच

 

google-extensions-marathipizzza10
youtube.com

 

हे एक अतिशय प्रभावी एक्सटेन्शन असुन प्रत्येक युट्युब लव्हर कडे असायलाच हवं. जेव्हा तुम्ही युट्युबच्या व्हिडियो पाहत असता तेव्हा त्या गाण्याचे लिरिक्स अर्थात शब्द हे एक्सटेन्शन तुमच्या समोर उलगडतं.

गाणं कोणतंही असो त्याचे अगदी अचूक शब्द हे एक्सटेन्शन तुम्हाला सांगणार!

तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सटेन्शन हा काय प्रकार असतो आणि कश्या प्रकारे तो आपल्याला मदत करतो.

मग आता ह्यापैकी तुमच्या उपयोगाची एक्सटेन्शन नक्की वापरा आणि ह्याव्यतिरिक्त अशी काही एक्सटेन्शन असतील जी उपयोगी आहेत तुम्हाला माहित आहेत, तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?