Site icon InMarathi

“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…!

film-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विषय म्हणाल तर गंभीर पण आणि विनोदी पण. चित्रपटांच्या टायटलपुढे येणाऱ्या टॅगलाईन्स. या टॅगलाईनने चित्रपट कशासंदर्भात आहे याबद्दल एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट करणं अपेक्षितअसतं.

उदाहरणार्थ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ‘ ची टॅगलाईन होती ‘Come, fall in love ‘.

 

wikimedia.org

 

‘एलियन’ ची टॅगलाईन होती ‘In space no one can hear your scream .’

 

i.pinimg.com

पण काही फिल्म्सच्या टॅगलाईन इतक्या विचित्र असतात त्या वाचून बेकार हसू येतं.

एक संजय दत्त, चंद्रचूड सिंग आणि महिमा चौधरीचा ‘दाग ‘ नावाचा चित्रपट होता. त्याच्यापुढे दिग्दर्शकाने द फायर अशी टॅगलाईन जोडून टाकली होती.

दाग आणि द फायर या दोन दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शब्दांमुळे हा एकूणच हे विनोदी प्रकार झाला. बहुतेकजण त्या पिक्चरचा उल्लेख ‘दाग द फायर’ असाच एका दमात करतात.

 

i.ytimg.com

सलमानच्या ‘क्यूँ की’ ची टॅगलाईन अशीच विचित्र होती – ‘क्यूँ की -इट्स फेट.

 

i.jeded.com

सध्या सर्वकालीन trashy चित्रपटाच्या स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या ‘जानी दुश्मन’ ची टॅगलाईन होती – जानी दुश्मन – एक अनोखी प्रेमकहानी.

 

amazon.com

आता ज्यांनी हा पिक्चर बघितला आहे आणि ज्यांना यातली अनोखी प्रेमकहानी काय आहे हे माहित आहे त्यांना तुफान हसू येईल.

अशाच काही विचित्र टॅगलाईन म्हणजे –

‘आन – मेन ऍट वर्क ‘

 

filmykeeday.com

 

‘EMI – लिया है तो चुकाना पडेगा’

 

amazon.com

‘ तेरे संग – A Kidult story ‘

 

wikimedia.org

कधी कधी या टॅगलाईन मध्ये दिग्दर्शकाचा आपल्या चित्रपटाबद्दलचा आत्मविश्वास दिसतो.

उदाहरणार्थ…रमेश सिप्पीच्या ‘शोले ‘ ची टॅगलाईन होती…

“The greatest story ever told”

 

windows.net

काही टॅगलाईन चित्रपटाच्या विषयाला खूप सुंदर न्याय देतात.

उदाहरणार्थ ‘लक्ष्य’ ची टॅगलाईन होती –

“It took him 24 years and 18000 feet to find himself”

 

movietheology.files.wordpress.com

‘स्वदेस’ ची टॅगलाईन होती – We The People.

भारतीय संविधानातल्या “We the people of India” या सुप्रसिद्ध शब्दांमधले पहिले तीन शब्द आशुतोषने चित्रपटाच्या टायटलला सपोर्ट करण्यासाठी खुबीने वापरले.

 

amazon.com

काही टॅगलाईन्स चित्रपटांच्या पोस्टरला खूप चांगल्या पद्धतीने कॉप्लिमेंट देतात. ‘लगे रहे मुन्नाभाई ‘ च्या पोस्टरवर बाईकवर बसलेल्या मुन्ना आणि सर्किटच्या बॅकग्राउंडला ढगाने गांधीजींच्या चेहऱ्याची आऊटलाईन दाखवून टॅगलाईन दिली होती –

They are back.. …and they are not alone!

 

amazon.com

‘कहानी ‘ च्या पोस्टरवर प्रेग्नन्ट विद्याची छबी होती आणि पोस्टरवर टॅगलाईन होती – ‘Mother’ of story

 

pinkvilla.com

किंवा नुकत्याच आलेल्या ‘दंगल ‘ ची टॅगलाईन होती –

म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

 

glamsham.com

‘न्यूटन ‘ ची टॅगलाईन आहे – ‘सिधा इन्सान उलटी दुनिया’

 

i1.wp.com

पण हॉलिवूडचे लोक याबाबतीत पण सरस आहेत आपल्यापेक्षा. ‘सोशल नेटवर्क ‘,’एलियन वर्सेस प्रिडीटर ‘, ‘आय एम लेजंड’ यांच्या टॅगलाईन गुगलून बघा. एकूणच टॅगलाईन हा इंटरेस्टिंग विषय आहे. अजून भरपूर लिहिण्याइतका.

ता.क . – गुंडा – लोहा किंवा तत्सम कांती शहा फिल्मच्या टॅगलाईन हा पी एच डी चा विषय आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version