हिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी – वाचा, “मोपला विद्रोह”!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२० ऑगस्ट १९२१ साली केरळच्या मालाबार येथे मोपला विद्रोहला सुरवात झाली होती, मालाबार येथील मुसलमानांचा हा विद्रोह अगोदर खिलाफत आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि इंग्रजांच्या विरोधात होता. पण लवकरच याला सांप्रदायिक हिंसेच रूप आलं.
मोठ्या प्रमाणावर हिंदू यावेळी मुसलमानांच्या निशाण्यावर आले. या सांप्रदायिक हिंसेत हजारो हिंदूंची हत्या करण्यात आली. तर कित्येक हिंदूंचं धर्म परिवर्तन करून मुसलमान बनविण्यात आलं, एवढच नाही तर हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले.
पण लवकरच ही चळवळ चिरडून टाकण्यात आली. या आंदोलनाचा मुख्य नेता म्हणून ‘अली मुसलियार’ प्रसिद्ध होता.
भारतातील शाळेत शिकविण्यात येणाऱ्या इतिहासातील पुस्तकांत खिलाफत आंदोलनाला भारतीय स्वतंत्रता आंदोलनाशी जोडण्यात आले आहे, परंतु हे आंदोलन राष्ट्र्विरोधीच नाही तर हिंदू विरोधीही होते.
या आंदोलनाला महात्मा गांधी, शौकत आली खान, मौलाना अबुल कलामआजाद यांसारख्या बड्या नेत्यांचा देखील सहयोग होता.
पहिल्या विश्वयुद्धात तुर्की हरले होते त्यावेळी इंग्रजांनी तिथल्या खलिफाला गादीवरून हटविले होते.
खिलाफत आंदोलनाचा उद्देश तुर्कीच्या सुलतानाची गादी परत मिळविणे होता. या आंदोलनाला तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष महात्मा गांधी याचं समर्थन प्राप्त होत.
गांधींनी असहयोग आंदोलनाला खिलाफत आंदोलनाशी जोडण्यास जोर दिला होता. त्यांच्यामते असहयोगला खिलाफत सोबत जोडल्याने भारताचे दोन प्रमुख समुदाय हिंदू आणि मुसलमान औपनिवेशक शासनाचा अंत करतील. पण ते काही खरं झाल नाही.
तर दुसरीकडे इतिहासकारांच्या मते असहयोग आंदोलनाचे कुठलेही राष्ट्रीय उद्दिष्ट नव्हते, तर ते केवळ मुसलमानांच्या खिलाफत आंदोलनाच्या समर्थनार्थ हिंदूंना एकजूट करण्याचा कट होता. याचा विरोध देखील झालेला, पण महात्मा गांधींनी सांगितले की,
जो खिलाफत विरोधी आहे तो कॉंग्रेसचा देखील शत्रू आहे.
याचा एक दुसरा दृष्टीकोन देखील आहे. यानुसार महात्मा गांधी असे मानायचे की, १२ व्या शतकापासून सोबत राहून राहून हिंदू आणि मुसलमान सह-अस्तित्व शिकले आहेत. जेव्हा की हे खिलाफत आंदोलन नाही केवळ इंग्रजांच्या पण हिंदूंच्याही विरोधात होते.
या आंदोलनामुळे भारतात जिथे जिथे मुसलमानांची संख्या जास्त होती तिथे त्यांनी मनमानी करण्यास सुरवात केली. कित्येक हिंदूंची हत्या केल्या केली गेली, हिंदू महिलांवर बलात्कार केले गेले. तर यात केरळमधील मालाबार येथील एरनद आणि वल्लुवानद या ताकुल्यांची परिस्थिती सर्वात भयंकर होती.
येथे २० हजाराच्या जवळपास हिंदूंची हत्या करण्यात आली. तर याहून अधिक हिंदुंच जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यात आलं होत.
१५ फेब्रुवारी, १९२१ साली सरकारने निषेधाज्ञा लागू करत खिलाफत आणि कॉंग्रेसचे नेता हसन, यू. गोपाल मेनन, पी. मोइद्दीन कोया आणि के. माधवन नायर यांना अटक केली. यानंतर हे आंदोलन स्थानिक मोपला नेत्यांच्या हाती गेलं.
मानलं जात की मुसलमानांनी केलेल्या या हिंसेच्या घटनेचा महात्मा गांधींवर गंभीर परिणाम झाला होता.
विनायक दामोदर सावरकर यांनी या घटनेवर ‘मोपला’ नावाच्या उपन्यासची रचना केली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.