Site icon InMarathi

रोहिंग्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या “या” घटना “रोहिंग्या” समस्येचं विचित्र रूप समोर आणतात

hindu-rohingya-puja-rabiya-featured-marathipizza

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

म्यानमार मधून हुसकावून लावलेले गेलेले रोहिंग्ये सध्या मोठ्या संख्येने बांग्लादेशात रहात आहेत. जगभर ह्या समस्येचं काय करता येईल ह्यावर चर्वितचर्वण सुरु होते!

साहजिकच, रोहिंग्यांबद्दल सहानुभूतीची लाट होती. जी मानवतेच्या दृष्टिकोनातून योग्यच आहे. परंतु रोहिंग्यांमधील इस्लामी कट्टरवादी लोकांचा प्रादुर्भाव अनेकांना काळजीत टाकत आहे.

ह्याच कारणाने भारतातसुद्धा रोहिंग्यांना आश्रय द्यावा की देऊ नये ह्यावर प्रचंड वाद  झाले!

 

cnn.com

 

ह्या पार्श्वभूमीवर एक अंगावर काटा आणणारं सत्य इंडिया टुडे च्या एक्सक्लुजिव्ह रिपोर्टमधून उजेडात आलं होतं.

रोहिंगे मुस्लीम बांगलादेशमधील रिलीफ कॅम्पस मध्ये वास्तव्यास आपल्याच रोहिंग्या समाजातील हिंदू महिलांना लक्ष्य करत असल्याचे उघड झाले आणि  जीवाच्या भीतीने म्यानमार मधून पलायन करत बांगलादेश मध्ये रोहिंग्यानी आसरा घेतला होता!

पण अल्पसंख्यांक हिंदू रोहिंग्याना आपल्याच समाजाच्या बहुसंख्य मुस्लीम रोहिंग्यांकडून त्रास दिला गेला!

मुस्लिम रोहिंगे हिंदू महिलांना कपाळावरच कुंकू पुसण्याची, हातातल्या बांगड्या फोडण्याची – मंगळसूत्र काढून फेकून देण्याची जबरदस्ती करत असत.

या संदर्भात पूजा नावाच्या एका हिंदू रोहिंग्या महिलेची आपबिती पुढे आली आहे. ती आता सध्या राबिया ह्या नावाने वावरत आहे, म्हणजेच तिचं बळजबरीने धर्मपरिवर्तन केलं गेलंय.

 

indiatodya.intoday.in

 

तिच्या म्हणण्याप्रमाणे कित्येक दिवस हा प्रकार सुरूच होता. म्यानमार मधील दंगलीमध्ये तिने आपला पती गमावला.

आपला जीव वाचवावा म्हणून ती देखील इतर रोहिंग्यांबरोबर देश सोडून पळाली. पण इथे आपल्याच समाजबांधवांकडून मिळणारा त्रास अधिक असल्याचे तिचे म्हणणे ठरले!

तिचं असं देखील म्हणणं आहे की तिच्या पतीची हत्या म्यानमारी सैनिकांनी नाही तर काही बुरखाधारी माणसांनी केली, जे हिंदू धर्माविषयी गलिच्छ भाषेत बोलत होते.

 

the conversation

 

अजून एक थिओमन नावाची हिंदू महिला आहे, ती आपली करुण कहाणी सांगताना म्हणते –

“माझ्या पतीची आणि संपूर्ण कुटुंबाची माझ्या डोळ्यादेखत हत्या केली गेली, त्यानंतर ते मला आणि माझ्या सारख्या इतर अनेक हिंदू महिलांना घेऊन जंगलामध्ये गेले.

त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही नमाज पठाण करा, इस्लाम मध्ये या आणि आम्ही तुम्हाला मुक्त करू. आमच्या धर्मात पवित्र मानले जाणारे कुंकू त्यांनी जबरदस्तीने पुसले आणि आमच्या बांगड्या देखील फोडल्या.

त्यांनी मला एकच पर्याय दिला तो म्हणजे इस्लाम धर्म स्वीकार अन्यथा तुला तुझ्या जीवाला मुकावं लागेल. जीवाच्या भीतीने मी त्यांचे म्हणणे ऐकले. पुढे ३ आठवडे मी एका इस्लामी महिले प्रमाणे बुरखा परिधान करून वावरत होते.”

 

hindupost

 

पूजा ची राबिया झाली. रिका ची सादिया. अठ्ठावीस वर्षीय रिका तिच्यावर गुरदरलेला प्रसंग वर्णन करते –

“शुक्रवारच्या दिवशी (२५ ऑगस्ट) त्यांनी आमच्या कॅम्पमधील सर्व हिंदू घरांवर आक्रमण केलं. सर्व प्रथम सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले गेले, नंतर पुरुषांना बांधून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले.

माझा नवरा सोनार होता…त्यांनी माझ्याकडील सर्व दागिने काढून घेतले. जवळच्याच टेकडीवर सर्व हिंदूंना घेऊन  जाऊन, एका रांगेत सर्वांना मारून टाकलं गेलं.

फक्त ८ स्त्रियांना जीवनात सोडलं गेलं – ज्या तरुण आणि सुंदर होत्या. आम्हाला सांगितलं गेलं की “तुम्हाला इस्लाम स्वीकारून आमच्याशी लग्न करावं लागेल.”

आमच्याकडे त्यांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता… आमच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकण्यासाठी आम्हाला उपाशीसुद्धा ठेवलं गेलं. नंतर आम्हाला ह्या कॅम्पमध्ये आणलं गेलं.”

 

hindu human rights

 

इंडिया टाइम्सच्या रिपोर्ट  नुसार, ही केवळ एका हिंदू महिलेची नाही तर बांगलादेशच्या कोटूपोलांग भागात आसरा घेतलेल्या शेकडो हिंदू रोहिंग्या महिलांची परिस्थिती होती.

कहर म्हणजे बांगलाद्देश सरकारला याबद्द्दल काहीच माहिती नव्हतं.

“आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही, जर असे काही घडत असले तर आम्ही नक्कीच कडक कारवाई करू” अशी सारवासारव बांगलादेशचे अधिकारी करत होते.

विजय राम पाल या हिंदू रोहिंगा पुरुषाने देखील हिंदू महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या डोळ्या देखील ८ हिंदू रोहिंग्या महिलांना दुसऱ्या कॅम्प मध्ये जबरदस्तीने नेण्यात आले आणि तेथे त्यांना इस्लाम कबुल करण्यास भाग पाडले.

जवळपास ५ लाख रोहिंगे म्यानमार मधून बांगलाद्देश मध्ये घुसले असून जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेतला!

 

human rights watch

 

बांग्लादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसनुल हक इनू यांना या संदर्भात विचारणा केली असताना त्यांनी उत्तर दिले की,

“असं घडणं अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही रोहिंगे मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू आणि बौद्ध यांचे वेगवेगळे कॅम्प्स तयार केले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे, तरीही असे प्रकार होत असतील तर त्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येतील.”

ह्या भागातील अनेक पुरूष स्वतः स्त्रियांच्या शोधार्थ गेले असता त्यांनीही अत्याचाराची माहिती दिली आहे.

===

संपूर्ण रिपोर्ट  इथे वाचू शकता : Exclusive: Forced to remove sindoor, read namaz: Horror engulfs Hindu Rohingya women in camps

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version