आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
साडी म्हणजे स्त्रियांचा जीव की प्राण. साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते, असे म्हणतात. साडी हे वस्त्र कधीही कोणीही घालू शकते. साडी हा एक असा पोशाख आहे, जो आपल्या व्यक्तिमतत्वाला साजेसा आहे. अनेक स्त्रियांना साडी योग्यरित्या नेसण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. साडी हा प्रकार भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्याप्रकारे वापरला जातो, म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये त्या-त्या राज्याच्या पद्धतीप्रमाणे साडी नेसली जाते.
महाराष्ट्रीयन, गुजराती, बंगाली अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसलेल्या स्त्रिया आपल्याला भारतामध्ये पाहण्यास मिळतात.
पण साडी नेसण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच असतो का? आता तुम्ही विचार कराल की, मी असा विचित्र प्रश्न का केला आणि पुरुष थोडीच साडी घालणार आहेत…?!
पण आज आम्ही तुम्हाला एका अशा पुरुषाबद्दल सांगणार आहोत, ज्याला ‘साडी मॅन’ म्हणून ओळखले जाते.
हा साडी मॅन म्हणतो की,
नर परिधान पुनर्विकासावर आणि ऐतिहासिक परंपरेवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने मी साडी परिधान करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हे वस्त्र लवचिकतेला आणि कोणत्याही लिंगाशी संबोधित करत नव्हते. त्यामुळे मी साडीला नाजूक वस्त्र मानत नाही.
या साडी मॅनचे नाव हिमांशू वर्मा आहे. जशी इतर मुले लहानपणी कधी कधी आपल्या आईच्या साडीने आणि अलंकारांनी खेळतात, त्याचप्रमाणे हिमांशू देखील खेळत असे. हळूहळू त्याला साडी हे वस्त्र परिधान करणे आवडू लागले, गेल्या बारा वर्षांपासून हिमांशू साडी नेसत आहे. वस्त्र कारागीर म्हणून काही काळ काम केल्यामुळे त्याची साडी घालण्याची रुची अजूनच वाढत गेली.
२०१४ पासून हिमांशूने साडी महोत्सवाचे आयोजन करत आहे. हा साडी महोत्सव ‘द रेड अर्थ’ या गारमेंट कंपनीच्या देखरेखीखाली पार पाडला जातो. या महोत्सवामध्ये पारंपारिक आणि समकालीन या दोन्ही साड्यांच्या प्रकारांवर समान लक्ष दिले जाते.
जेव्हा हिमांशूने साडी घालण्यास सुरुवात केली, तेव्हा पहिल्यांदा तो आकर्षक साड्या नेसायचा तसेच साड्यांच्या पदरासोबत नवनवीन प्रयोग करायला देखील त्याला आवडायचे.
हिमांशू म्हणतो की,
जेव्हा मी साडी नेसण्यास सुरुवात केली तेव्हा मी विविध प्रकारच्या स्टायलिश साड्या नेसायचो. तेव्हा झगमगीत आणि उठावदार साड्या नेसायला आवडायचे. पण जेव्हापासून माझे वय वाढत चालले आहे आणि केस पांढरे झाले आहेत, तेव्हापासून मी हाताने तयार केलेल्या आणि सध्या सौम्य असणाऱ्या साड्या नेसत आहे.
हिमांशूच्या मते साडी हे वस्त्र विशिष्ट लिंगासाठी बनलेले नाही. त्याचे म्हणणे आहे की, भारताच्या खूप भागांमध्ये साडीला धोतराचाच एक प्रकार मानला जातो. साडी हे वस्त्र कुणीही परिधान करू शकते.
कितीतरी वेळा हिमांशूवर लोकांनी त्याच्या या वागण्यावरून टिका केली. त्या टिकाकारांसाठी एका मुलाखतीमध्ये हिमांशू याने सांगितले की, तो लहानपणी एक बंडखोर मुलगा होता. त्याने लैंगिक समानतेमधील अंतर भरून काढण्यासाठी हे वस्त्र म्हणजेच साडी घालण्याचा निर्णय घेतला होता.
ज्या लोकांना साडी अनावश्यक वाटते किंवा साडी घालणे अशक्य आहे. अशा लोकांसाठी त्याला सहानुभूती वाटते, कारण त्याला वाटते की, वेगवेगळे प्रयोग अधूनमधून केल्यास जीवन मनोरंजक होते. त्याच्या या साडी घालण्याच्या सवयीमुळे त्याला लोक साडी मॅन म्हणू लागले. पण हिमांशूला त्याबद्दल काहीही वाटत नाही, कारण प्रत्यक्षात हे शीर्षक त्याने स्वयंसिद्ध केले आहे, असे तो म्हणतो.
असा हा साडी मॅन आपल्या सर्वांपेक्षा वेगळा वागत असला, तरी त्याने साडी या वस्त्राचे महत्त्व सर्वांना पटवून दिले आहे. अश्या क्रांतीकारी कृतीच्या निर्णयासाठी आपल्याला त्याचे कौतुक वाटले पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.