“ब्रह्म” देवाचं एकच मंदिर असण्यामागे कारणीभूत आहे ‘सावित्रीचा शाप’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण बऱ्याचदा गमंतीमध्ये बोलून जातो की ‘आता ब्रम्हदेव जरी खाली आला तरी मी अमुक अमुक गोष्ट करणार नाही!’ पण हा ब्रम्हदेव जर खरच खाली आला तर कसली पंचाईत होईल ही असं म्हणणाऱ्या लोकांची!
हिंदुंमध्ये तीन देवांना प्राधान्य देण्यात येते ते म्हणजे- ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा या सृष्टीचे रचनाकार आहेत, विष्णू पालनहार आणि महेश संहारक आहे. आपल्या देशात विष्णू आणि महादेवाची तर अनेक मंदिरं आहेत.
पण या सृष्टीचा रचेता म्हणजेच ब्रह्म देव याचं केवळ आणि केवळ एकचं मंदिर आहे. आता असे का..? तर ब्राह्मजींची पत्नी म्हणजेच सावित्री हिने दिलेल्या श्रापामुळे ब्रह्मदेवाची पूजा कुठेच केली जात नाही.
मग त्यांच भारतात एक मंदिर का आहे. तर चला जाणून घेऊया की या संपूर्ण सृष्टीचा रचेता ब्रह्म देव यांना त्यांच्याच पत्नीने का श्राप दिला आणि त्याचं एकच मंदिर का आहे हे!
हिंदू धर्मग्रंथ पद्म पुराणानुसार एकेकाळी पृथ्वीवर वाज्र्नाश नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता.
त्याच्या वाढत्या अत्याचारामुळे क्राधित होऊन ब्राम्हजीने त्याचा वध केला. पण त्याचा वध करताना ब्र्म्हजींच्या हातून एका ठिकाणी कमळाच फुल पडल, ज्यामुळे या ठिकाणी सरोवर तयार झाले. याच घटनेनंतर या जागेच नाव पुष्कर पडलं.
या घटनेनंतर ब्रह्माने या सृष्टीच्या भल्यासाठी येथे एक यज्ञ करण्याचं ठरवलं. ब्रह्माजी यज्ञ करण्यासाठी पुष्कर येथे पोहोचले पण काही कारणांमुळे त्यांची पत्नी देवी सावित्री वेळेवर पोहोचू शकल्या नाही.
यज्ञाची वेळ निघत चालली होती. पण यज्ञपूर्तीसाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असण गरजेचं होत, त्यामुळे सावित्री देवी न पोहचल्याने ब्रह्माजीने तिथल्याच गुर्जर समाजाच्या एका कान्येसोबत विवाह केला.
जिचं नाव होत ‘गायत्री’.. विवाह करून त्यांनी हे यज्ञ सुरु केलं. तेवढयातच तिथे देवी सावित्री पोहोचली, आपल्या पती शेजारी दुसऱ्या स्त्रीला पाहून त्या अतिशय क्रोधीत झाल्या.
–
- या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!
- दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन
–
तेव्हा त्यांनी रागात ब्रह्माजींना शाप दिला की, देव असून देखील कधीच त्यांची पूजा केली जाणार नाही, कधीच त्यांना कोणी पूजणार नाही. सावित्रीच्या या रुपाला बघून सर्व देवता घाबरले.
त्यांनी सावित्रीला विनंती केली त्यांनी आपला श्राप परत घ्यावा, पण त्यांनी तो नाही घेतला. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांनी सांगितले की, या पृथ्वीवर केवळ पुष्कर येथेच तुमची पूजा होईल. जर कोणी दुसर तुमची पूजा करेल अथवा मंदिर बनवेल तर त्याचा नाश होईल.
तसेच भगवान विष्णू देखील या कार्यात सहभागी होते म्हणून देवी सरस्वतीनेही विष्णूला श्राप दिला की, त्यांना पत्नी विरह सहन करावा लागेल. म्हणूनच विष्णूजींना मानव रुपात राम अवतार घ्यावा लागला आणि १४ वर्षांच्या वनवासा दरम्यान सीतेपासून दूर रहाव लागलं.
अशी आख्यायिका आहे. आजही तेथील सरोवराची पूजा केली जाते पण ब्रह्माची पूजा होत नाही, भाविक केवळ दुरूनच त्यांचे दर्शन घेतात. एवढचं काय तर येथील पुजारी-पंडित देखील ब्रह्म देवाची प्रतिमा आपल्या घरात ठेवत नाहीत.
ब्रह्माजीच पुष्कर येथील मंदिर कधी बनवल्या गेलं आणि ते कोणी बनवलं यासंबंधी इतिहासात कुठेही कसलाही उल्लेख नाही.
पण असं सांगितल्या जात की, जवळपास एक हजार दोनशे वर्षांपूर्वी अरण्व वंशाचे एक शासक होते, त्यांना एकदा एक स्वप्न आलं की, या ठिकाणी एक मंदिर आहे ज्याला देखभालीची गरज आहे.
तेव्हा या राजाने या मंदिराच्या जुने बांधकामाची पुनर्रचना केली.
पुष्कर येथे सावित्रीच देखील मंदिर आहे. पण ब्रह्म देवाच्या मंदिरा जवळ नसून त्या मंदिराच्या मागे दूर एका डोंगरावर आहे. येथे जाण्यसाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात.
–
- शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते
- प्रत्येक मंदिरासमोर, आवारात कासव असण्यामागचं कारण काय? जाणून घ्या!
–
ब्रह्म देवाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पुष्कर येथे यज्ञ केले होते. त्यामुळे दर वर्षी येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला येथे मेळा असतो.
मेळादरम्यान ब्राह्मजींच्या या एकुलत्या एक मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचतात.
या दिवसांत ब्रह्माजींची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो असे मानतात. इथे भरणारा र्तिक मेळा हा आहे तर एक अध्यात्मिक मेळावा पण बदलत्या वेळेबेरोबर या मेळाव्याचे स्वरूपही बदलत चालले आहे.
असं म्हणतात की जेव्हा या मेळाव्याचे अध्यात्मिक स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल तेव्हा पुष्कर जगाच्या नकाशावरून मिटून जाईल, ती वेळ जगाच्या विनाशाची असेल.
येथे अशीही मान्यता आहे की, या ५ दिवसांच्या कार्तिक मेळाव्यादरम्यान येथे ३३ कोटी शक्ती उपस्थित असतात. या शक्ती त्या ब्रह्माच्या उपासनेसाठी येतात ज्यांच्यामुळे ही सृष्टी आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.