Site icon InMarathi

भारतातील ‘ह्या’ सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात ‘महिष्मती’ला आल्यासारखे वाटते!

kolkalta-durga-marathipizza

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या सगळीकडे नवरात्रोत्सव एकदम जोरदार सुरु आहे. सगळीकडे देवीची आरास, आरती आणि मनोभावे भक्ती केली जात आहे. त्यातच गरब्याचा आनंद लोक लुटत आहेत. सगळीकडे आनंदाचे प्रसन्न वातावरण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणामध्ये एकत्र येऊन देवीची पूजा अर्चना करतात. ही नवरात्र म्हणजे शरद नवरात्र. देवी दुर्गेचा महिषासुरावरील विजय या दिवसांमध्ये साजरा केला जातो. पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील दुर्गापूजा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. येथील लोक वर्षभर या पुजेची वाट पाहत असतात. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या वेळी लोक रात्रीचे गणपती आणि सजावट पाहण्यासाठी रस्त्यावर उतरतात, त्याचप्रमाणे कोलकात्यामध्ये लोक देवीच्या मंडपाची सजावट आणि देवीच्या मनमोहक मूर्ती पाहण्यासाठी रात्रीचे बाहेर पडतात.

oneindia.com

यावेळी देखील कोलकत्ता महानगरच्या पूजा समितींनी दर्शकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या थीमने आपापल्या मंडपांना सजवले आहे. असेच एक मंडप सध्या खूप चर्चेमध्ये आहे. हे मंडप लेकटाऊन जवळच्या श्रीभूमीमध्ये बनवले आहे. लेकटाऊनचे हे मंडप बहुचर्चित चित्रपट बाहुबली – २ च्या महिष्मती थीमवर बनवले गेले आहे. या मंडपाला देशातील सर्वात महागडे मंडप सांगितले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायदेशीर प्रमाणपत्र देऊन हे घोषित केले की, हे मंडप देशातील सर्वात महागडे मंडप आहे.

indianexpress.com

११० फूट उंच हे मंडप बनवण्यासाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. जवळपास ३ महिने दररोज १५० कामगारांनी काम करून हे मंडप सजवले आहे. या मंडपाची कारीगिरी एवढी सुबक आहे की, खरचं महिष्मती राज्यामध्ये आल्यासारखे वाटते. अजून मंडपाचे दर्शन पूर्णपणे सुरु देखील झाले नाही आहे, तेव्हाच हा मंडप लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हे मंडप आता खूप प्रसिद्ध झाले आहे आणि हे मंडप पाहण्यासाठी खूप दूरवरून लोक येथे येत आहेत. त्यामुळे येथे दररोज या भाविकांची खूप गर्दी पाहण्यास मिळत आहे.

महिष्मती मंडपाला आणि दुर्गेच्या मूर्तीला खूप महागड्या आभूषणांनी आणि रत्नांनी सजवले गेले आहे. सोन्याने मढवलेल्या या महिष्मती मंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन सोंड उचललेले हत्ती आणि ८ सुरक्षा अधिकारी उभे असलेले पहायला मिळतात. महालाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा चमकणारा झुंबर लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो.

dainikbhaskar.com

देवी दुर्गेची मूर्ती सोने – चांदी, हिरे – मोती यांनी सजवलेली आहे. या मंडपाच्या सुरेक्षेसाठी जवळपास ३०० सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सरकारने आणि प्रशासनाने येथे सुरेक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. तरी पण जेव्हा तुम्ही हा सर्वात महागडा मंडप पाहण्यासाठी जाल, तेव्हा नक्की सावधान राहा, कारण अश्या गर्दीच्या ठिकाणी कधीही कोणतीही घटना होण्याची शक्यता असते.

चला तर मग कधी जाताय, या महिष्मतीच्या सर्वात महागड्या राज्याला भेट देण्यासाठी..

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version