' सौंदर्य हेच स्त्रीचं सामर्थ्य नसतं! या ९ स्त्रिया दाखवताहेत वेगळंच कर्तृत्व! – InMarathi

सौंदर्य हेच स्त्रीचं सामर्थ्य नसतं! या ९ स्त्रिया दाखवताहेत वेगळंच कर्तृत्व!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या रक्षणासाठी पोलीस खाते हे २४ तास तैनात असते. कुठेही कोणताही गुन्हा झाला की, पहिल्यांदा पोलिसांना बोलावले जाते आणि ते स्वतः च्या पद्धतीने त्या गोष्टीचा छडा लावतात.

पोलिसांचे काम हे देशामध्ये सुरक्षा आणि सुव्यवस्था बनवून ठेवणे हे असते आणि ते त्यांचे काम चोखपणे पार पडतात.

 

indian-police-marathipizza

 

आपल्याला या पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या शौर्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या शौर्याची प्रचीती आपल्याला २६/११ च्या हल्ल्यामध्ये आलीआहेच. त्यावेळी जेवढे धाडस पोलीस खात्यातील पुरुष कर्मचाऱ्यांनी दाखवले, तेवढेच धाडस स्त्री कर्मचाऱ्यांनी देखील दाखवले.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने चालत आहे, असेच काहीसे या पोलीस खात्यामध्ये देखील आपल्याला दिसून येते.

या खात्यामध्ये अश्या कितीतरी स्त्रियांचा समावेश आहे, ज्यांनी मोठमोठी कार्य शत्रूला न जुमानता स्वबळावर पार पडली आहेत. आज आपण अश्याच काहीशा धाडसी स्त्री पोलिसांची माहिती जाणून घेणार आहोत…

 

१. संजुक्ता पराशर

 

Sanjukta InMarathi

 

संजुक्ता या आसाममधून २००६ च्या बॅचमध्ये आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांची यूपीएससीची रकिंग ८५ होती. त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कोणतीही नोकरी मिळाली असती, पण त्यांनी आपले स्वतःच्या मनाचे ऐकले आणि त्यांनी आयपीएस निवडले.

आसाममधील बोडो अतिरेक्यांच्या दहशताला त्यांनी आळा घातला. त्यांनी १६ अतिरेक्यांना कंठस्नान घातले आणि फक्त १५ महिन्यांमध्ये ६४ दहशतवाद्यांना अटक केली. या धाडसामुळे त्या नावारूपाला आल्या.

२. मीरा बोरवणकर

 

meera borwankar InMarathi

 

मीरा बोरवणकर या १९८१ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी झाल्या. महाविद्यालयामध्ये असताना त्या किरण बेदी यांना पाहून प्रेरित झाल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.

बॉलीवूडचा “मर्दानी” हा चित्रपट मीरा यांच्याच आयुष्यावर आधारित आहे.

जळगावचं सेक्स स्कॅंडल, अबू सालेम प्रत्यर्पण केस, इक्बाल मिर्ची प्रत्यर्पण केस यांसारख्या मोठमोठ्या केस त्यांनी योग्य रीतीने सोडवल्या आहेत. १९९७ साली त्यांना राष्ट्रपती पदक दिले गेले आहे. कधीही कोणाची वायफळ बडबड ऐकून न घेण्याबद्दल त्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

३. रुवेदा सालम

 

ruveda-salam InMarathi

 

रुवेदा ह्या जम्मू – काश्मीरमधून २०१५ च्या बॅचमध्ये आयपीएस अधिकारी झाल्या. आयपीएस अधिकारी बनण्याअगोदर त्यांनी काश्मीरमधून एमबीबीएसची पदवी मिळवली.

दहशतवाद प्रणीत काश्मीर खोऱ्यातील त्या पहिल्या आयपीएस अधिकारी बनल्या.

त्यांच्या वडिलांना त्यांना भारतीय पोलीस दलामध्ये काम करताना पहायचे होते. सध्या तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये त्यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

४. अपराजिता राय

aparajita-rai-InMarathi

 

अपराजिता राय ह्या सिक्कीममधून पहिल्या गोरखा अधिकारी बनल्या. राय यांची सध्या पश्चिम बंगालच्या हुगळी येथे बदली झाली आहे. त्या २०१२ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या होत्या.

त्यांनी बेस्ट लेडी आउटबाउंड प्रोबेशनरचा पुरस्कार पटकावला आहे. फील्ड कॉम्बॅटसाठी त्यांना उमेशचंद्र ट्रॉफी मिळाली आहे.

५. मरीन जोसेफ

 

merin-Joseph InMarathi

 

मरीन या २०१२ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यूपीएससीची पहिल्याच पास केली. लोकांना मदत करण्यासाठी त्या फोनच्या माध्यमातून २४ तास उपलब्ध असतात.

लोकांना मदत करणे हेच त्यांचे पहिले ध्येय आहे. त्यांच्यासारख्या इतर स्त्रियांना देखील पोलीस दलामध्ये सामील व्हायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस दलामध्ये सामील झाल्यास तुम्ही समाजात एक सक्षमपणे ठाम उभ्या राहाल.

त्यांना माहित आहे की, या कामामध्ये जीवाला धोका आहे, पण तरीदेखील हे काम करण्यामध्ये त्यांना समाधान मिळते.

६. सोनिया नारंग

 

Sonia-Narang Inmarathi

सोनिया नारंग या २००२ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या आणि त्या सध्या बंगळुरूमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा स्वभाव आणि त्यांच्या कामातील एकाग्रता यांमुळे त्या ओळखल्या जातात.

कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे त्यांचे मानाने आहे.

२००६ मध्ये त्यांनी एकदा हिंसक निदर्शनाच्या दरम्यान कर्नाटकाच्या एका आमदाराला कानाखाली मारली होती…!

झालं असं की रेनुकाचार्य यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी जमावाला आटोक्यामध्ये आणण्यासाठी सोनिया यांनी लाठीचार्जची ऑर्डर दिली. तरीदेखील भाजपचे आमदार रेनुकाचार्य तिथून हटण्यास तयार नव्हते.

तेव्हा सोनिया यांना संताप आला आणि त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यांनी रेनुकाचार्य यांच्या कानाखाली वाजवली आणि त्यांना तुरुंगात बंद केले.

७. संगीता कालिया

 

संगीता ह्या हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यामधून आयपीएस अधिकारी झाल्या. त्या २००९च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या. त्यांचे वडील देखील पोलीस दलामध्ये काम करत होते.

२०१५ मध्ये एका बैठकीत संगीता यांनी आरोग्य मंत्री अनिल वीज यांचा आदेश ऐकला नाही, त्यामुळे अनिल वीज यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. पण तरीदेखील त्या तिथून गेल्या नाहीत. कॅबिनेट मंत्री अनिल विज यांसोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

त्यांनतर त्या फतेहबादमध्ये एसपी पदावर नियुक्त झाल्या. नियुक्ती झाल्यानंतर तातडीने त्यांनी कामास सुरवात केली. दहा महिन्यातच त्यांच्या नेतृत्वाखालील फतेहबाद पोलिसांनी अनेक केसेस सोडवल्या.

८. सौम्या संभूशिवन

 

सौम्या संभूशिवन ह्या २००९ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या. सौम्या यांनी आपल्या समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे निर्भय पोलीस अधिकारी म्हणून ख्याती मिळवली आहे.

फारच थोड्या कालावधीमध्ये सौम्या यांनी एक पोलीस अधिकारी या नात्याने हिमाचलमध्ये ड्रगवर आळा घालून ड्रगचा धोका कमी केला. यासाठी देखील त्याची खूप प्रशंसा केली जाते.

९. किरण बेदी

 

किरण बेदी ह्या १९७२ मध्ये पोलीस दलामध्ये रुजू झाल्या. त्या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या, त्यातच त्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

पुढे त्यांना त्यांच्या कारकीर्दीमध्ये “क्रेन बेदी” ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. कारण  डीसीपी (वाहतूक) या नात्याने त्यांनी एक क्रेन शहरातील अयोग्यरीत्या पार्क केलेली वाहने उचलण्यासाठी मागवली. त्या वाहनांमध्ये दिल्लीतील खासदार आणि आमदार यांच्या वाहनांचा देखील समावेश होता. या कामामुळे किरण बेदी यांचे खूप नाव झाले.

अश्या या पोलीस दलामध्ये असलेल्या रणरागिणींनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. तसेच इतर स्त्रियांसमोर ही आदर्श निर्माण करून, त्यांना प्रेरित करून एक या क्षेत्रात येण्यासाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित केलं आहे.

चला मग मुलींनो वाट कसली पाहताय, तुम्ही देखील यांच्यासारखे पोलीस दलामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा…!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?