Site icon InMarathi

जर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही!

shaktiman 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

९०चं दशक म्हणजे सुवर्ण दशक म्हणायला काही हरकत नाही, कारण भारतात तंत्रज्ञानापासून ते उद्योगापर्यंत जो काही अमुलाग्र बदल झाला तो याच दशकात.

९० च्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला ‘मिलेनियल’ म्हणतात. आपल्या जन्म वयानुसार आपण ज्या कालखंडात जन्माला आलो त्यावर हे अवलंबून असतं.

पण ही ९० ची पिढी म्हणजे आता एक ‘कम्युनिटी’च झालीये. 90’s kid या नावाने ती सध्या खूप प्रचलित आहे.

याला कारणही तसेच आहे कारण 90’s च्या  kids ने त्यांच्या लहानपणी जे केले ते आता कुणाला पुन्हा करायला मिळणार नाही.

या पिढीने खूप बदल पाहिले. या जगाला झपाटय़ाने बदलताना पाहिले आणि नुसते पहिलेच नाही तर ते बदल आत्मसात देखील केले.

याच संबंधी Quora या वेबसाईटने एक प्रश्न त्यांच्या साईटवर विचारला, की ९०च्या दशकात भारतात मोठे होणे कसे होते?(What was it like to grow up in India in the 1990s?) आणि या प्रश्नावर हे 90’s kids अक्षरशः तुटून पडले.

प्रत्येकाने आपापले ९०च्या दशकातले अनुभव मांडले. त्यातीलच काही Best 90’s kids memories आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…

१. 90’s kids आताच्या पोरांसारखं काही पोकीमॉन जमा करत नव्हते तर wrestlers, cricketers, and airplanes यासर्वांचे trump cards जमा करायचे.

त्यातच आपला मारिओ, म्हणजे बेस्ट फ्रेंड…

हा विडीओ गेम खेळणे आणि त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं आणि ते हॉट व्हील्सला कसं विसरणार…

 

२. आपल्यासाठी एकच एक धर्म आणि तो म्हणजे ‘क्रिकेट’ आणि आपले Idol हे राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर किंवा सौरव गांगुली यांच्यापैकी एक.

सचिन/गांगुली आउट झाले की टीव्ही बंद करून, आपली बॅट घेऊन खेळायला निघून जायचो.

 


३.
चाचा चौधरी आठवतंय… आणि ती टिंकल कॉमिक… आपले आवडते टाईमपास. तसेच ‘शक्तिमान’ आपला स्वतःचा सुपरहिरो… आजही शक्तिमानचा विषय कुठे निघाला की आपण परत लहान होऊन जातो आणि त्यावर चर्चा करतो.

 


४.
 “जंगल जंगल बात चली है पता चला है! अरे चड्डी पेहेनके फुल खिला है फुल खिला है!…” ‘जंगल बुक’ म्हटल की लगेच त्याच जिंगल आपण गायला लागतो. अजूनही ते जिंगल आपल्याला तोंडपाठ आहे.

त्यातला तो मोगली, बगीरा आणि भालू यांना तर आपण कधीच विसरणार नाही. त्यासोबतच शकालाका बूम बूम, नंदू अपना या सिरिअल्सनी तर आपलं लहानपण अविस्मरणीय केलं.

 

theatrclwyd.com

५. तुम्हाला अलिशा चिनॉयचं ते ‘Made in India’ आठवतं की नाही…

 

६. ९०च्या दशकात summer vacations म्हणजे ‘मामाच्या गावाला जाऊ या’…

७. झी टीव्हीवर ते ‘अंताक्षरी’चे एपिसोड्स वारंवार बघणे. पंकज कपूर यांचं ‘ऑफिस ऑफिस’ आणि ‘हम पांच’… या शोज समोर आजचे कॉमेडी शोज फेल आहेत.

 

८. तेव्हा आपल्याकडे Nike, Reebok, Adidas, Puma यांसारखे ब्रांड्स नसायचे तर आपल्या बाटा आणि लिबर्टीचे स्पोर्ट्स शूज वापरायचो आपण.

 

awn.com

१२. रविवार हा दिवस म्हणजे केस कापण्याचा आणि केस धुण्याचा दिवस ते पण क्लिनिक प्लसने.

त्यानंतर दूरदर्शवर रंगोली बघणे. तसेच तुम्ही रोज न चुकता WWF बघितले असेल आणि त्यातला “Hitman” हा तर सर्वांचाच फेवरेट.

The legends of the hidden temple.. हा शो हिंदीमध्ये बघायचो आणि त्यात पूर्णपणे हरवून जायचो.

 

१३. तुम्हाला आठवत असेल तर ९०च्या दशकातील ते महाभारताच क्रेझ… जेव्हा महाभारत टीव्हीवर यायचं तेव्हा संपूर्ण भारत जणू काही स्तब्ध होऊन जायचा.

 

 

१४. DDLJ, KKHH आणि हम आपके है कौन… हे चित्रपट आपण एवढ्या वेळा बघितले असणार की यातील गाणेच काय तर एकूण एक डायलॉग आपल्याला पाठ असेल.

 

 

तर दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लागणारा बॉर्डर चित्रपट हा आपला फेवरेट असायचा.


१५.
तुम्हाला ‘black and white’ TV कशी होती हेही माहित आहे आणि रंगीत TV ही. एवढचं नाही तर तेव्हा रिमोट शिवाय TV चालवायचो आपण.

 

 

 

जर तुम्ही देखील 90’s kids असाल तर  हे वाचून तुम्हाला तुमचं बालपण नक्की आठवलं असेलं आणि जर तुम्ही नसाल तर तुम्हाला त्याची खंत जाणवत असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version