Site icon InMarathi

‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही!

beverly-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पाणी हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. कधीही आणि कोणत्याही वेळी आपल्याला पाण्याची गरज भासू शकते. आपण आपल्या घरामध्ये पाण्याचा कसाही वापर करत असलो, तरी जेव्हा तहान लागते आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेव्हा आपल्याला त्या पाण्याची खरी किंमत कळते. आपण घरातून बाहेर जातेवेळी नेहमी पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवतो आणि कधी जर विसरलोच तर दुकानामधून एक बिसलरीची बॉटल घेऊन आपली तहान भागवतो. बिसलरी घेण्यासाठी आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर आपल्याला दुकानदाराने त्या बिसलरीची किंमत थोडी जास्त सांगितली, तर आपण बिसलरी घेऊ की नको याचा विचार करत राहतो पण शेवटी घेतोच, कारण तहान लागल्यावर पैशापेक्षा तहान भागवणे महत्त्वाचे असते. आता जरा विचार करा की, या बिसलरची किंमत जास्तीत जास्त किती असेल ? तुम्ही म्हणाल किती असणार आहे, असून-असून जास्तीत जास्त २०० ते ३०० असेल, अशी महागडी बिसलेरी देखील श्रीमंत व्यक्तीच वापरत असणार. तुमचा हा अंदाज काहीसा बरोबर आहे, पण आज आम्ही तुम्हाला अश्या पाण्याच्या बॉटलबद्दल सांगणार आहोत, जिची किंमत हजारात नाही तर लाखामध्ये आहे. बसला ना आश्चर्याचा धक्का, चला तर मग जाणून घेऊया या सर्वात जास्त किंमत असलेल्या पाण्याच्या बॉटलबद्दल..

thestreet.com

ह्या पाण्याच्या बॉटलचे उत्पादन करणारी कंपनी ही बॉटल थेट Beverly Hills मधून तुमच्यापर्यंत पोहचवते, ज्याच्या बदल्यात तुम्हाला या पाण्यासाठी जवळपास ६५ लाख रुपये मोजावे लागतात. ६५ लाखामध्ये मिळणाऱ्या या पाण्याच्या बॉटलला लक्झरी कलेक्शनचे रूप देण्यात आलेले आहे. या बॉटलचे झाकण हे सोन्याने बनवण्यात आलेले आहे, ज्याच्यावर १४ कॅरेटचे ६०० पांढरे आणि २५० काळे डायमंड लावलेले असतात. प्रत्येक बॉटलसाठी एक वेगळा बॉक्स बनवला जातो. पाण्याच्या या बॉटलला Beverly Hills 90H20 हे नाव देण्यात आले आहे. आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी कंपनीने Beverly Hills 90H20 चे एका वर्षाचे कलेक्शन देखील ठेवले आहे.

आपल्या ग्लोबल मार्केटला बघून, ही कंपनी या प्रोडक्टला भारतामध्ये देखील लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या Beverly Hills मध्ये आहे. या बॉटलमध्ये जे पाणी असते ते ऊंच पर्वतांच्या शिखरावरून निघणाऱ्या शुद्ध झऱ्याचे असते हे विशेष!

cdninstagram.com

या Beverly Hills Drink या कंपनीचे को-फाऊंडर आणि प्रेसिडेंट जॉन ग्लक याचे म्हणणे आहे की,

Beverly Hills 90H20 च्या पाण्याची चव एकदम वेगळी आणि हलकी असेल. जे लोक या पाण्याच्या डायमंड कलेक्शनला खरेदी करू शकत नाही, अश्या लोकांनी निराश होण्याची गरज नाहीहे. कंपनीने याच ब्रँडला दोन वेगवेगळ्या कॅटगरीमध्ये लाँच केले आहे, ज्यामध्ये चार सब प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये १ लीटर बॉटलच्या बरोबरच ५०० ML चा पॅक देखील उपलब्ध आहे.

कंपनीचे हे प्रोडक्ट्स आलिशान हॉटेल्समध्ये, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणि त्याचबरोबर नाईट क्लबमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. या सीरीजमधील सर्वात छोट्या पॅकेटची किंमत ८०० रुपये असेल.

या ब्रँडने आपले पहिले इंटरनॅशनल डिस्ट्रीब्यूशन अॅग्रीमेंट केले आहे. या करारामध्ये भारत, अरब यांच्याबरोबरच इतर १८ देश देखील समाविष्ट आहेत. मध्य आशियाच्या अरबच्या शाही कुटुबीयांनी या ब्रँडला चांगलीच पसंती दिली आहे. भारतामध्ये Beverly Hills 90H20 हे २०१८ च्या मध्यामध्ये लाँच होईल अशी आशा आहे.

dribbble.com

काय म्हणता मग मंडळी? खरेदी करणार का ही पाण्याची बॉटल???

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version