Site icon InMarathi

कुस्तीपटूंचे कान, ‘फुलकोबी कान’ असण्यामागे नेमके कारण काय? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात. उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी.

कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध असा आहे.

प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुद्ध खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुस्ती हे नाव प्राप्त झाले.

फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्ध्यावर शक्तीने वा युक्तीने मात करून त्याला नामोहरम करणे हा कुस्ती या शब्दाचा अर्थ आहे.

 

खूपच प्राचीन इतिहास काढून पहिला तर कुस्तीचा उल्लेख फार पूर्वीपासून आहे.  भारतात वैदिक वाङ्‌मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथांत मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किष्किंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुद्ध (कुस्ती) होऊन सुग्रीवाने वालीचा पाडाव केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाभारतातील वर्णनानुसार कृष्ण, बलराम व भीम हे मल्लविद्येत प्रवीण होते, हे त्यांनी केलेल्या मल्लयुद्धांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुद्धात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुद्धात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधालाही ठार मारले.

 

हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ऒलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.

या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे. कुस्ती हा महाराष्ट्रातील सर्वात गाजलेला खेळ आहे. जुन्या काळापासून हा खेळ येथे खेळला जातो. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खेळ खूप खेळला जातो.

 

या खेळासाठी खूप मेहनत आणि बळाची गरज असते. त्यामुळे हा खेळ खेळणारा मनुष्य नेहमीच शक्तिशाली असणे गरजेचे असते. आताच्या काळामध्ये हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला जातो. ऑलपिंकमध्ये आपण आपल्या भारतीय खेळाडूंना पाहिलेच असेल.

एवढ्या मोठ्या स्तरावर हा खेळ खेळला जात असल्यामुळे आज हा खेळ जगप्रसिद्ध झाला आहे. तुम्ही कधी आपले भारतीय कुस्तीपटू किंवा इतर देशातील कुस्तीपटू यांना खेळताना पहिले असेल, तर तुम्हाला लक्षात आले असेल की, त्यांचे कान आपल्यापेक्षा काहीसे वेगळे असतात.

या कुस्तीपटूंचे म्हणजेच पैलवानांचे कान गोल आणि झुबकेदार असतात. पण त्यांचे कान असे का असतात ? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये कधीतरी नक्कीच आला असेल. चला तर मग जाणून घेऊया, त्यांच्या अश्या कानामागे नेमके रहस्य काय आहे…

 

allindiaroundup.com

कानांच्या या प्रकाराला ‘फुलकोबी कान’ असे म्हटले जाते.

व्यवसायिक कुस्तीपटू आणि रब्बी खेळाडू ज्यांचा जास्त वेळ मॅटवर घालवतात. या खेळाच्या आक्रमक प्रकृतीमुळे कुस्तीपटूंचे कान याठिकाणी कवडीमोल ठरतात.

या खेळामध्ये कुस्तीपटू एकमेकांचे कान खूपवेळा धरतात आणि त्यावर आपली पकड बनवण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांमध्ये त्यांचे कान ओढले जातात. असे पुन: पुन्हा झाल्यामुळे कालांतराने त्यांच्या कानांच्या बाह्य भागामध्ये रक्ताच्या गुठळ्या विकसित होतात.

एकदा का असे झाले की पुन्हा त्यांचे कान परत पाहिल्यासारखे होणे खूप कठीण असते.

गुठळ्या झालेले रक्त हे कूर्मकोनाच्या खाली असलेल्या पेरीकॉन्ड्रिअमपासून वेगळे होते. यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. पेरीकॉन्ड्रिअम हे आपल्या कानाला पोषक पदार्थ पुरवतात. पण यामुळे ते मरण पावते आणि त्याच्या परिणामस्वरूप त्वचेवर तंतुमय ऊतकांची निर्मिती होते. असे झाल्यामुळे कानाचे विघटन होते.

याच अंतर्गत रक्तस्त्रावांना हेमॅटोमा अरीस, पेरीकॉन्ड्रिअल हेमॅटोमा किंवा ट्रॉमायोटिक ऑरिक्युलर हेमॅटोमा असे म्हणतात.

 

i.pinimg.com

कुस्तीपटूंना काय खबरदारी घ्यावी लागते ?

असे होण्यापासून टाळण्यासाठी कुस्तीपटू आणि इतर लढाऊ अॅथलीट ‘स्क्रोम कॅप’ नावाने ओळखली जाणारी टोपी घालून कुस्ती करतात.

बऱ्याच वेळा उपचार न करता कान आहेत तसेच सोडल्यास आणि स्थिती न बदलल्यास रक्ताचा नियमितपणे निचरा होत राहतो, पण त्यामुळे आपल्या कानांवर त्याचा कोणत्याही खराब परिणाम होत नाही. थोडक्यात काय तर कुस्तीपटूंचे कान असे झुबकेदार गोल झाल्यानंतर ते परत पाहिल्यासारखे करता येत नाहीत आणि ते पूर्वीसारखे होत देखील नाहीत.

 

ste.india.com

मग आता तुम्हाला समजलेच असेल की, त्या कुस्तीपटूंचे कान हे आपल्यापेक्षा वेगळे का असतात आणि ते का होतात. म्हणून कुस्तीपटूंना आपल्या कानांना नेहमी जपावे लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version