आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
पुण्याच्या Engineering कॉलेज चं नाव बऱ्याच कारणाने चर्चेत असतं. नुकत्याच स्वयम् उपग्रहाब्द्द्ल तुम्ही आमच्या CoEP चा स्वयम् ह्या article मध्ये वाचलं असेलंच. आता COEP ने आणखी एक यश मिळवलंय.
आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणण्याच्या दृष्टीने CoEP ने विद्यार्थ्यांना 3D Printer च्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती आणि बनवण्याची पद्धत शिकवली आहे. ज्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी हे printer निम्म्या किमतीत बनवण्याची किमया दाखवली आहे.
एवढंच नव्हे तर कॉलेज च्या Production Department च्या विद्यार्थ्यांनी फक्त ३५ लाख रुपयांत Metal Printer बनवलाय – ज्याची बाजारात किंमत आहे ३ कोटींपेक्षा जास्त आहे – म्हणजेच तब्बल आठपट जास्त आहे.
CoEP चे Director, भरतकुमार अहुजा म्हणतात –
Design च्या कामासाठी वेगवेगळ्या उद्योगात आजकाल 3D Printers मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. म्हणूनच बाजारभावापेक्षा कमी किमतीत हे 3D Printer उपलब्ध व्हावं ह्यासाठी आम्ही काम करत होतो. ह्याचं यश म्हणून बाजारात $500 ते $800 किंमत असलेलं हे Printer आम्ही $250 मध्ये तयार करु शकलो. आमचं लक्ष्य आहे ही किंमत $150 पर्यंत खाली आणणे. आमचे प्राध्यापक सध्या Printer मधला circuit board स्वतः करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच एक वस्तू आम्ही import केली आहे. ह्याने (म्हणजे, जर सर्किट बोर्ड इथेच बनवता आला तर त्याने -) किंमत अजून कमी होईल.
3D Printer तयार करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली ती 2015 च्या जानेवारी महिन्यात – जेव्हा कॉलेज ची एक टीम कोलराडो ला 3D Printer बघण्यासाठी गेली होती.
Printer ची किंमत बघून टीम ने स्वतः तयार करण्याबद्दल विचार केला. इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या printer च्या design चा अभ्यास करून सहा महिन्यात कॉलेज च्या टीम ने Geometric limited च्या सहाय्याने प्रयोगाला सुरुवात केली.
आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी २ कार्यशाळा घेतल्या गेल्या असून त्यात त्यांना 3D Printing आणि assembly of Fuse Deposition Method (FDM) printers शिकवण्यात आलं आहे.
आरती मुळे ह्यांच्या टीम मध्ये Lab Manager संदेश पाटील ह्यांच्यासोबत कार्तिक बक्षी, रविकिरण शिंदे आणि शरदचंद्र बनसोडे ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहेत. सध्या ही टीम 3D Printer च्या Baseplate Calibration वर काम करत आहेत.
स्वस्तात बनवलेलं हे प्रिंटर औद्योगिक गरज भागवू शकणार नाही पण विद्यार्थ्यांसाठी हे printer महत्वाचं आहे.
उपलब्ध design मध्ये गरजेनुसार बदल करून laser sintering technique चा वापर करून विद्यार्थ्यांनी Metal Printer बनवलंय. लेझर आम्हाला Import करावं लागल्याने त्याची किंमत जास्त होती. Industry मध्ये मॉडेल मटेरियल म्हणून Metal पावडर वापरतात तर आम्ही brass plus polymer पावडर वापरली. आता विद्यार्थ्यांनी तयार products नं घेता ते 3D Printer चा वापर करून तयार करावे ज्याने किंमत कमी होईल आणि सुरक्षित पण असेल.
आरती मुळे, Production Department
पुण्याच्या कॉलेजची पोरं भारियेत राव!
नवीन पाऊले उचलत पुढे जाणाऱ्या CoEP च्या विद्यार्थ्यांनो…अभिनंदन!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.