' अवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी..! – InMarathi

अवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि रंजक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. तो गोष्ट म्हणजे आहे एक दुर्बीण. आता तुम्ही म्हणाल एका दुर्बिणीबद्दल काय वेगळं जाणून घ्यायचंय, तर मंडळी हि दुर्बीण साधी सुधी नव्हे, ही आहे अवकाशात सोडली गेलेली पहिली दुर्बीण! काय ऐकून चक्रावलात ना..कधी ऐकलंय या दुर्बीणीबद्दल…नाही ना? सगळा मग आज जाणून घेऊया!

अवकाशात सोडल्या गेलेल्या ह्या पहिल्या दुर्बिणीचे नाव आहे – हबल दुर्बीण

 

hubble-telescope-InMarathi

 

एडविन हबल या सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे नाव ह्या दुर्बिणीला देण्यात आले आहे. या दुर्बिणीच्या प्राथमिक अंतर्गोल आरशाचा व्यास २.४ मीटर इतका असून अवकाशातून आलेले प्रकाशकिरण हे या आरशाद्वारे परावर्तित होऊन त्याच्यासमोरील ३३ सेंटिमीटर व्यासाच्या बर्हिगोल आरशावर पडतात व त्या ठिकाणी त्यांचे परावर्तन होऊन प्राथमिक आरशाच्या मध्यभागी असलेल्या ६६ सेंटिमीटर व्यासाच्या छिद्रातून मागे एका बिंदूत एकत्र येतात.

याच ठिकाणी बाह्य वस्तूंची प्रतिमा तयार होते. तेथे प्रतिमेचे विश्लेषण करणारी अत्याधुनिक साधने म्हणजेच वाइड फिल्ड प्लॅनेटरी कॅमेरा, फेट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ हाय रिझोल्युशन स्पेक्ट्रोग्राफ, हाय स्पीड फोटोमीटर फेट ऑब्जेक्ट कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक यंत्रे ठेवण्यात आली आहेत.

या यंत्रामध्ये जमा केलेली माहिती दुर्बिणीवर बसवलेल्या अँटेनामार्फत अमेरिकेतील व्हाइट सँडम येथे प्रक्षेपित केली जाते. तेथून कृत्रिम उपग्रहाद्वारे ही माहिती बाल्टिमोर येथील स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट आणि गोडार्ड स्पेस सेंटर येथे प्रक्षेपित केली जाते.

 

hubble-telescope 1 InMarathi

 

दुर्बिणीला आवश्यक असलेला विद्युत पुरवठा करण्यासाठी तिच्या दोन बाजूंना ११.८ बाय २.३ मीटर आकाराच्या पडद्यावर सोलर सेल्सची शृंखला बसवण्यात आली आहे. हबल अंतरिक्ष दुर्बिणीची एकंदर लांबी १३.१मीटर असून तिचा व्यास ४.३ मीटर आहे.

११६०० किलोग्रॅम वजन असलेली ही अवाढव्य दुर्बीण प्रथमच स्पेस शटलचा उपयोग करून अवकाशात सोडण्यात आली. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी हबल दुर्बिणीला केवळ ९० मिनिटे लागतात.

हबल अंतरिक्ष दुर्बीण पृथ्वीभोवती भ्रमण करीत असल्यामुळे तिच्या आरशाची दिशा सतत बदलत राहणार हे लक्षात घेऊन तिला प्रदीर्घ काळ एकाच लक्ष्याच्या दिशेत रोखून धरण्यासाठी गायरोस्कोप आणि अत्यंत संवेदनशील अशा पाच मार्गदर्शक संवेदकांचा सेन्सर्सचा उपयोग करण्यात आला आहे.

 

hubble-telescope-marathipizza02
astronomy.com

हबल दुर्बिणीची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. विश्वाचे प्रसरण नेमके किती वेगाने होत आहे याचा शोध हबल दुर्बीण घेते आहे. क्वेझार्स नावाच्या चमत्कारिक खगोलीय प्रकाशाकडून येणा-या जवळजवळ १० ते १२ अब्ज प्रकाशवर्षे अंतरापर्यंतच्या अवकाशातील वस्तूंचा वेध हबल दुर्बीण घेत आहे.

याशिवाय विश्वाच्या वयाचा अंदाज, विश्वाचे मोजमाप, क्वेझार्सच्या स्वरूपाचा शोध, परग्रहांचा शोध वगैरे इतर अनेक गोष्टींचा अभ्यास हबल दुर्बिणीद्वारा केला जात आहे.

अंतरिक्षात प्रक्षेपित झाल्यानंतर हबलमध्ये अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यात दुर्बिणीच्या आरशांची यंत्रणा प्रकाशकिरणांचे योग्य प्रकारे एकत्रीकरण करू शकत नव्हती. तिचे सोलर सेल पॅनल ३० सेंटिमीटरमधून वर-खाली होत असे.

त्याचा परिणाम हबल दुर्बीण लक्ष्यापासून विचलित होण्यामध्ये होत असे. याशिवाय एकंदर ६ गायरोस्कोपपैकी २ निकामी व एक अर्धवट कार्य करत असे. रिझोल्युशन स्पेक्वोग्राफ देखील काम करेनासा झाला होता.

 

hubble-telescope 2 InMarathi

 

हबल अंतरिक्ष दुर्बिणीत निर्माण झालेल्या दोषामुळे खर्च केलेले १.५ अब्ज डॉलर्स पाण्यात जाण्याची वेळ आली. जे दोष पृथ्वीवरून सुधारणे शक्य होते ते तंत्रज्ञानाने सुधारले तरीही दुर्बिणीकडून स्पष्ट छायाचित्रे मिळवणे शक्य होणार नाही ही गोष्ट लक्षात आली.

एकच उपाय बाकी होता तो म्हणजे हबल दुर्बिणीला पुन्हा एकदा स्पेस शटलमध्ये आणून तिची दुरुस्ती करणे. १९९३ रोजी हा चित्तथरारक आणि अभूतपूर्व उपाय प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आला.

गेली २६ या दुर्बिणीने आपले काम चोख बजावले असून आजही ती उत्तमपणे कार्यरत आहे. या दुर्बिणीमुळे पृथ्वीवर आदळणा-या अवकाशातील वस्तू आदींची माहिती आधीच मिळालेली आहे. या दुर्बिणीने एका तसेच अनेक धूमकेतू व अनेक लघुग्रहांचा शोध लावलेला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?