सजीवसृष्टीचा अंत झाल्यास पुढच्या पिढीला कशावर अवलंबून राहावे लागेल?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जर एक दिवस ही पृथ्वी किंवा पृथ्वीवरची सगळी सजीव सृष्टीच नष्ट झाली तर काय होईल?? पुन्हा मानवाच्या उत्पत्ति पासून सुरुवात होईल का आणखीन काही? हे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?
पृथ्वीवर वाढणारी नैसर्गिक संकटे, ग्लोबल वार्मिंगमुळे वाढती समुद्राच्या पाण्याची पातळी, परमाणू युद्धाची आशंका हे सर्व विनाशकारी संकेत एक ना एक दिवस पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा अंत होणार या संभावनेला प्रबळ बनवितात.
जर असं झालं तर नवीन पिढी शेतीपूरक वस्तूंसाठी कशावर अवलंबून राहू नये याचा विचार करून वैज्ञानिकांनी “Doomsday Vault” नावाची एक खाद्य बँक बनवली आहे.
चारी बाजूंनी बर्फाने वेढलेल्या नॉर्वेमध्ये २६ फेब्रुवारी २००८ ला ‘डूम्स डे वॉल्ट’ बनविण्यात आले. या जागेला निवडण्याचं कारण म्हणजे ही जागा उत्तरी ध्रुवाच्या जवळ असल्याने सर्वात जास्त थंड आहे.
ज्या कुठल्या देशाला या बँकेत आपले बियाणे ठेवायचे असतील त्यांना नॉर्वे सरकारसोबत एक करारनामा करावा लागतो. या करारनाम्यानुसार इथे जमा करण्यात आलेल्या बियाणांवर मालकी हक्क बियाणे जमा कारविणाऱ्या देशाचाच राहील, नॉर्वे सरकारचा नाही.
माणसाने पृथ्वीवर १३००० वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरवात केली, लाखों प्रकारच्या बियाणांचा शोध लागला आहे.
पण वैज्ञानिकांकडून आपल्याला याची आठवण करवून दिली जाते की आपल्या पृथ्वीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे जसे की, पूर, भूकंप, त्सुनामी किंवा परमाणू, हायड्रोजन युद्ध यांसारख्या कारणांमुळे मानवी संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
म्हणूनच माणसाने शेतीपूरक वस्तूंना येणाऱ्या पिढीकरिता सुरक्षित ठेवण्यासाठी या ‘डूम्सडे वॉल्ट’ची निर्मिती करण्यात आली.
या ‘डूम्सडे वॉल्ट’ बद्दल काही रोचक माहिती जाणून घेऊ!
१. ‘डूम्सडे वॉल्ट’ नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन आयलँड येथे एका सैडस्टोन माऊंटेनच्या ३९० फूट आत बनविण्यात आले आहे.
२. यासाठी ग्रे काँक्रीट चा ४०० फूट लांब सुरंग या माऊंटेन मध्ये बनविण्यात आली आहे.
३. या तिजोरीचे दरवाजे हे बुलेट प्रूफ आहेत.
४. आतापर्यंत या तिजोरीत ८ लक्ष ६० हजार पेक्षा जास्त प्रकारचे बियाणे ठेवण्यात आले आहे. तर या तिजोरीची क्षमता यापेक्षा जास्त म्हणजेच ४५ लक्ष प्रकारचे बियाणे साठविण्याची आहे.
५. या बियाणांना सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांना मायनस १८ डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते.
६. जे या तिजोरीत वीज नाही पोहोचली तरी येथील बियाणे २०० वर्ष सुरक्षित राहू शकतात. म्हणजेच नवीन पिढीला शेतीत उपयोगी पडू शकतात.
७. या तिजोरीच्या आत प्रकाश किंवा गर्मी पोहोचू नये, जेणेकरून आतील बर्फ वितळून हे बियाणे खराब न व्हावे, म्हणून ‘डूम्सडे वॉल्ट’ च्या छतावर आणि दरवाज्यावर प्रकाश परावर्तित करणारे रिफ्लेक्टिव्ह स्टेनलेस स्टील, काच आणि प्रिज्म लावण्यात आले आहेत.
८. ‘डूम्स डे वॉल्ट’ मध्ये प्रत्येक देशासाठी वेगवेगळं खात आहे. जिथे ते आपापल्या देशाचे बियाणे राखून ठेवू शकतात. जस आपण बँकेत आपल्या खात्यात मौल्यवान वस्तू ठेवतो तसेच हे.
९. या तिजोरीला वर्षातून ३-४ वेळाच उघडण्यात येते, मार्च २०१६ मध्ये हे बियाणे ठेवण्यासाठी उघडण्यात आलं होत. सीरियामध्ये युद्धामुळे शेती नष्ट झाली, तेव्हा या तिजोरीतून डाळ, गहू, जव आणि चण्याच्या बियाणांचे जवळजवळ ३८ हजार सॅम्पल गुप्तरित्या सीरिया, मोरक्को आणि लेबनान येथे पाठविण्यात आले होते.
तिथल्या खराब परिस्थितीमुळे या बियाणांचा पूर्णपणे उपयोग होऊ शकला नाही.
१०. या ‘डूम्स डे वॉल्ट’ ला जीन बँकांच्या दुनियेत ‘ब्लॅक बॉक्स’ व्यवस्था म्हणतात. याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणणे तस बरोबर पण आहे कारण ब्लॅक बॉक्स विमान संकटकाळी सर्व माहिती आपल्याजवळ एकत्रित करून घेते.
असच महत्वपूर्ण काम ‘डूम्स डे वॉल्ट’ करेल. जो मानवी संस्कृती नष्ट झाल्यावर, परत एकदा नवीन पद्धतीने शेती करण्यास मदत करेल.
११. हे मिशन एवढे गुप्त आहे की, येथे खूप कमी लोकांना येथे जाण्याची परवानगी आहे. येथे अमेरिकी संसदचे सिनेटर्स आणि संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल यांनाच येथे जाण्याची परवानगी आहे.
१२. या तिजोरीला बनविण्यासाठी जगभरातील १०० देशांनी आर्थिक मदत केली. यात भारत, अमेरिका, उत्तर कोरिया, स्वीडन या देशांचाही समावेश आहे.
१३. बिल गेट्स फाऊंडेशन आणि इतर देशांव्यतिरिक्त नॉर्वे सरकारने ‘डूम्स डे वॉल्ट’ बनविण्याकरिता ६० कोटी रुपये दिले होते.
१४. जीन बँकांच्या दुनियेत या पद्धतीच्या लॉकरला ‘ब्लॅक बॉक्स व्यवस्था’ म्हणतात.
येणाऱ्या काळात जर पृथ्वीवर संकट आलं तर ही तिजोरी खरंच नवीन पिढीसाठी जगण्याची नव्याने सुरुवात करणारी ठरो हीच आशा!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.