' ‘टायगर मंदिर’… अनाथ वाघांचे नंदनवन! – InMarathi

‘टायगर मंदिर’… अनाथ वाघांचे नंदनवन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाघ हा प्राणी भलेही हिंसक असला तरी जगभरात त्याची फॅनफॉलोईंग काही कमी नाही. जगभरातील कित्येक लोक हे वाघ प्रेमी आहेत.

प्राणिसंग्रहालयातही प्रत्येकाची पहिली धाव ही वाघाकडे असते. त्याची ती चाल, त्याची डरकाळी ही जेवढी भयानक वाटते तेवढीच ती आल्याला त्याच्या मोहात पाडते. पण त्यांच्या हिंसक स्वभावामुळे आपण कधीच त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही.

पण जर तुम्हाला वाघ खूप आवडत असतील आणि तुमची अशी इच्छा असेल की तुम्ही वाघांबरोबर खेळावं तर हा लेख तुमच्याचसाठी आहे…

 

tiger temple03-marathipizza
planetrovers.com

 

आज पर्यंत आपण वाघाला जंगलात, प्राणिसंग्रहालयात एव्हाना सर्कसमध्ये देखील बघितले असेल पण काय तुम्ही वाघाचं मंदिर बघितलंय?

नाही ना… चला तर मग आज तुम्हाला या टायगर टेम्पलची माहिती करवून देऊ

 

tiger temple02-marathipizza
jamesmorgan.co.uk

 

थायलँडच्या कंचनबुरी भागात थायलँड-बर्मा सीमेजवळ हे टायगर मंदिर आहे. हे टायगर मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण केंद्र  आहे. हे जगातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

‘वट पा लुंग ता बू’ नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या टायगर मंदिरात तब्ब्ल १४३  बंगाल टायगर्स कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.

 

tiger temple05-marathipizza
EPA

 

हे टायगर मंदिर म्हणजे प्रत्यक्षात बौद्ध भिक्कू मठ आहे हे विशेष. येथे वाघांच्या बरोबर १०० बौद्ध भिक्षूही राहतात.

इतकेच नव्हे तर येथे वाघांची पिल्ले या भिक्षूंबरोबरच खेळता खेळता लहानाची मोठी होतात. हे भिक्षू आणि वाघ यांच्यात आपसात किती प्रेम आहे हे प्रत्यक्षात पाहणे फार आनंदाचे आणि तेवढेच आश्चर्याचेही आहे.

इथे राहणारे वाघ हिंसक होऊ नयेत म्हणून त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते.

 

tiger temple06-marathipizza
spiegel.de

 

१९९४ साली या मंदिराची स्थापन झाली, या मंदिराच्या स्थापनेसोबतच बौद्ध भिक्षूंनी याला वन्य जीव संरक्षण प्रोग्रामला जोडले. सुरवातीला येथे काही छोटे जंगली प्राणी आणि पक्षी होते.

१९९९ साली तेथे पहिले वाघाचे पिल्लू आले, ज्याला इथल्या ग्रामीण जंगलातून आणले गेले होते. या पिलाच्या आईला शिकारींनी मारून टाकलं होत. ते त्यानंतर हे पिल्लू या मठात आणून त्याला वाढविले गेले. पण ते पिल्लू देखील खूप कमी काळ जगू शकलं. यानंतर या मंदिरात वाघांच्या अनाथ पिलांना आणले जाऊ लागले. हळू-हळू येथील वाघांची संख्या एवढी वाढली की याच नावच टायगर टेम्पल पडलं. इथल्या वाघांना इतके चांगले प्रशिक्षण दिलेले आहे की येणारे पर्यटकही त्यांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढू शकतात. आता हे मंदिर थायलँडच प्रमुख टुरिस्ट अट्रॅक्शन बनलं आहे. प्रत्येकवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात आणि या वाघांसोबत खेळतात. पण तरीदेखील आजपर्यंत या वाघांनी कुणालाही नुकसान पोहोचवलं नाही.

tiger-temple04-marathipizza
theconversation.com

 

कांही दिवसांपूर्वी येथील वाघांचा छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यानंतर थायलँड नॅशनल पार्क विभागातील अधिकारी आणि वाईल्ड लाइफ अॅण्ड प्लांट कन्झर्व्हेशन विभागातील अधिकार्‍यांनी येथे असलेल्या सर्व वाघांची तपासणी केली. तेव्हा या सर्व वाघांचे आरोग्य अतिशय उत्तम असल्याचे निष्पन्न झाले.

तर मग वाट कसली बघताय…कोरोनाचं संकट दूर झाल्यावर वाघांच्या या नगराला किमान एकदा तरी भेट द्याच

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?