आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सेल्युलर तुरुंग अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर इथे आहे. १८५७ सालच्या बंडा नंतर इंग्रजांनी हे तुरुंग बनविण्याचा विचार केला. या तुरुंगाचे निर्माण भारतीय स्वतंत्रता संग्रामातील क्रांतीकारकांना बंदी बनविण्यासाठी करण्यात आले होते. या तुरुंगाला बांधण्याच कार्य १८९६ साली सुरु झालं आणि ते १९०६ साली पूर्ण झालं.
ज्या स्वतंत्रता सेनानीला या तुरुंगात पाठविण्यात येत होतं, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हटले जायचे.
या तुरुंगापासून भारताची जमीन हजारो किलोमीटर दूर होती. तसेच जिथे हे तुरुंग होतं ते पोर्ट ब्लेयर चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले होते. ते क्षेत्र बंगालच्या खाडी अंतर्गत येते. म्हणून त्याला काळं पाणी म्हटलं जायचं.
–
हे ही वाचा – ...तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते!
सेल्युलर तुरुंगात तीन मजल्यांच्या ७ ब्रान्चेस बनविण्यात आल्या होत्या. यात एकूण ६९६ सेल होत्या, प्रत्येक सेलचा आकार ४.५*२.७ मीटर होता. येथे प्रत्येक सेल मध्ये ३ मीटर वर खिडक्या देखील बनविण्यात आल्या होत्या, जेणेकरून कुठलाही कैदी येथून बाहेर निघू शकेल पण तो पळू शकत नव्हता कारण चारही बाजूंनी येथे पाणी होते.
या सेल्युलर तुरुंगाला बनविण्याकरिता जवळपास ५ लक्ष १७ हजार रुपयांचा खर्च झाला होता.
या तुरुंगाची मुख्य इमारत ही लाल विटांनी बनलेली आहे. त्यावेळी या विटा बर्मा म्हणजेच आताच म्यानमार येथून आणण्यात आल्या होत्या. तुरुंगाच्या ७ ब्रान्चेसच्या मधोमध एक टॉवर आहे. या टॉवर वरून सर्व कैदींवर नजर ठेवण्यात येत होती.
या टॉवर वर एक भव्य घंटा लावण्यात आली होता जो की कुठल्याही प्रकारच्या धोक्याची संभावना असल्यास वाजविण्यात यायचा.
सेल्युलर तुरुंग एखाद्या ऑक्टोपस प्रमाणे ७ ब्रान्चेसमध्ये पसरलेलं होतं. ज्यामध्ये ६९६ सेल तयार कण्यात आले होते. येथे एका कैद्याला दुसऱ्या कैद्यापासून वेगळ ठेवण्यात येत होत. तुरुंगात प्रत्येक कैद्यासाठी वेगवेगळी सेल होती.
कैद्यांना वेगळं ठेवण्यामागे इंग्रजांचा मूळ उद्धेश म्हणजे त्यांनी एकत्र राहून स्वतंत्रता आंदोलनाशी निगडीत कुठलीही योजना न बनवणे. आणि एकटेपणाने हताश होऊन इंग्रज सरकार विरुद्ध कुठल्याही प्रकारचा बंड पुकारायच्या मनस्थितीत नसणे हा होता.
या तुरुंगात असलेल्या कैद्यांवर खूप अत्याचार करण्यात यायचे. क्रांतीकारकांकडून कोल्हू ने तेल काढण्याच काम इथे करविण्यात यायचं.
प्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं. जर ते हे नाही करू शकले तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.
–
हे ही वाचा – ही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत
या सेल्युअलर तुरुंगात अनेक क्रांतिकारकांनी शिक्षा भोगली यांच्यात विनायक दामोदर सावरकर, बाबुराव सावरकर, बटुकेश्वर दत्त, सोहन सिंग, मौलाना अहमदुल्ला, मौवली अब्दुल रहीम सदिकपुरी, मौलाना फझल-ए-हक खैराबडी, एस. चंद्र चॅटर्जी, डॉ.दिवान सिंग, योगेंद्र शुक्ला, वमन राव जोशी आणि गोपाल भाई परमानंद इत्यादी नावाजलेल्या क्रांतीकारकांची नावे आहेत.
आता या सेल्युलर तुरुंगाच्या भिंतींवर शहिदांची नावे लिहिली आहेत. इथे एक संग्रहालय देखील आहे जिथे या क्रांतिकारकांवर अत्याचार करण्यात वापरण्यात आलेले शस्त्र ठेवण्यात आले आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर या तुरुंगाच्या २ ब्रान्चेस पाडण्यात आल्या. इतर ३ ब्रान्चेस आणि मुख्य टावरला १९६९ मध्ये राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले.
सेल्युलर तुरुंग आणि तुरूंग संग्रहालय हे राष्ट्रीय सुट्ट्या सोडून वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते. १९६३ साली येथे गोविंद वल्लभ पंत नावाने एक रुग्णालय उघडण्यात आले. सध्या इथे ५०० बेड्स च रुग्णालय असून ४० डॉक्टर येथील रुग्णांची सेवा करत आहेत.
१० मार्च २००६ रोजी सेल्युलर तुरुंगाचे शताब्दी वर्ष समारोह करण्यात आला यावेळी इथे शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
–
हे ही वाचा – “अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ? तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया थरकाप उडवते
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.