Site icon InMarathi

‘रणजी ट्रॉफी’ या नावामागची तुम्हाला माहित नसलेली कहाणी!

ranji-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात क्रिकेट एवढं प्रेम कदाचितच आणखी कुठल्या खेळाला मिळालं असेल किंवा मिळेल. भारतातील जवळजवळ सर्वच लोक हे क्रिकेट वेडे आहेत. इथे गल्लोगल्ली क्रिकेट खेळली जाते.

क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या मनात वसतो. जसे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात, तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील क्रिकेटचे सामने आणि स्पर्धा घेतल्या जातात.

त्यामधूनच पुढे काही जण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी स्पर्धा होय. रणजी ट्रॉफी स्पर्धा आपण खूपवेळा टीव्हीवर बघितली असेल. कसोटी सामन्यासारखेच रणजी ट्रॉफी स्पर्धेचे सामने असतात. फक्त कसोटी सामने हे ५ दिवसांचे असतात, तर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने हे ४ दिवसांचे असतात.

आपण रणजी ट्रॉफीचे सामने बघतो, पण आपण कधी विचार केला आहे का? की या स्पर्धेला रणजी ट्रॉफी असे का म्हटले जाते. आपल्यातील बहुतेक लोकांना हे माहित नसेल.

चला तर मग जाणून घेऊया स्पर्धेला रणजी ट्रॉफी हेच नाव का पडले आणि कोणामुळे पडले ते.

 

t1.uc.ltmcdn.com

 

बीसीसीआयने रणजीतसिंहजी यांच्या नावावरून या स्पर्धेला रणजी असे नाव दिले, कारण रणजीतसिंहजी यांना रणजी म्हणून देखील ओळखले जात असे.

मग हे कोण होते आणि त्यांनी असे काय केले की, त्यांच्यानंतर या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले.

प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि समीक्षक नेव्हिल कार्ड्स यांनी एकदा रणजीबद्दल म्हटले होते की, “रणजी हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णमध्य आहेत”.

रणजी क्रिकेट खेळण्याच्या आधी क्रिकेट हा खेळ फक्त इंग्लिश लोकांचा खेळ आहे असे मानले जात असे.

पण रणजी क्रिकेट खेळू लागल्यानंतर त्यांनी या खेळामध्ये आपली पकड मजबूत केली. तो त्यांना ‘इंग्लिश सनशाईन’ म्हणाला, कारण रणजी हे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळत असत, भारतासाठी नाही.

भारताला १९३२ मध्ये कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला, रणजी यांच्या मृत्युच्या एका वर्षानंतर.

असे म्हटले जाते की, रणजी हे खूप नाविन्यपूर्ण खेळाडू होते, तसेच ते स्टायलिश आणि अपरंपरागत होते. त्यांचा या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता आणि खेळण्याचा अंदाज देखील काही निराळाच होता.

 

statics.sportskeeda.com

 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रणजीतसिंह यांचे प्रदर्शन वाखाणण्यासारखे होते. तब्बल ३०७ सामने खेळताना त्यांनी ५६ च्या सरासरीने एकूण २४६९२ धावा आपल्या नावावर जमा केल्या. यात थोडीथोडकी नवे तर ७२ शतके आणि १०९ अर्धशतके समाविष्ट आहेत.

इंग्लंडच्या बाजूने खेळून आपली क्रिकेट कारकीर्द सुरु करणारे रणजीतसिंह हे पहिले भारतीय खेळाडू!

त्यावेळी भारतात ब्रिटीशांचे सरकार होते आणि इंग्रजांच्या बाजूने अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी रणजीतसिंह यांची निवड झाली होती. ही निवड त्या काळात चांगलीच वादग्रस्त ठरली.

१८९६ साली त्यांची निवड झाली तेव्हा लॉर्ड हारिस या निर्णयाच्या विरोधात होते. रणजीतसिंह हे मुळचे ब्रिटीश नसून त्यांचा जन्म भारतात झालेला असल्याने त्यांची निवड करण्यात येऊ नये असे त्यांना वाटत होते.

पण या विरोधाला न जुमानता इंग्लंड संघाच्या व्यवस्थापनाने रणजीतसिंह यांना ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळण्यासाठी संघात घेतले.

ऑस्ट्रेलिया विरोधात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात रणजीतसिंह खेळायला आले आणि त्यांनी आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवून दिला.

 

Iloveindia.com

 

या सामन्यात पहिल्या खेळीत त्यांनी ६२ धावा बनवल्या. दुसऱ्या खेलीतही त्यांचे प्रदर्शन उत्कृष्ठ होते. इंग्रज फलंदाज एकावर एक बात होत असताना एका बाजूने त्यांनी फलंदाजीची मदार सांभाळली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात तेव्हा पहिल्यांदाच एका भारतीय खेळाडूने आपली दाखल घ्यायला भाग पाडले!

रणजी यांना मुले नव्हती, पण त्यांनी आपल्या इतर नातवंडांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. दुलीपसिंहजी हे त्यामधीलच एक आहेत. ज्यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत या खेळामध्ये आपले पाय रोवले.

त्यांच्या योगदानामुळे त्यांचे कौतुक म्हणून आज दुलीप ट्रॉफी खेळवली जाते.

त्यांच्या नाबाद २८५ ह्या त्यांच्या कारकीर्दीमधील सर्वात जास्त धावा आहेत. रणजी यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये १३३ बळी देखील घेतले होते. भलेही ते इंग्लंडकडून खेळले असतील, पण ते एक भारतीय होते आणि नेहमी चमकणाऱ्या सूर्यासारखे तेजस्वी होते.

 

p.imgci.com

 

१९०४ साली रणजीतसिंह भारतात परतले. त्यानंतर तीनच वर्षात म्हणजे १९०७ साली ते नवानगरचे महाराज झाले. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने राज्यकारभाराची धुराही समर्थपणे सांभाळली.

१९३४ सालापासून त्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी खेळवण्यात येऊ लागली.

आता क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण झाले आहेत. नवनवीन फलंदाज तयार होत आहेत, परंतु त्या काळामध्ये एवढे चांगले प्रदर्शन करून दाखवणे खूपच कठीण होते.

म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने रणजी ट्रॉफी ही स्पर्धा चालू केली. आपल्या भारतीय संघाला या रणजी ट्रॉफी स्पर्धेने खूप चांगले खेळाडू मिळवून दिलेले आहेत.

एकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version