' ७८०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २६ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा – InMarathi

७८०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २६ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओयो हे ऑनलाईन हॉटेल्स सर्च करणारे ऍप तुम्हाला माहित असेलच. आपल्यातील बहुतेक लोकांनी या ऍपचा वापर देखील केला असेल.

ऑनलाईन हॉटेल सर्च करून आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या रूम ओयो आपल्याला उपलब्ध करून देते.

त्यामुळे कुठेही फिरायला गेल्यावर तुम्हाला हॉटेल शोधत बसण्याची गरज भासणार नाही. फक्त ओयो करा आणि सुट्टीचा मनमुराद आनंद लुटा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशा सर्वांसाठी सोयीस्कर असणाऱ्या ओयोची कल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या तरुण संस्थापकाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

 

Oyo rooms.marathipizza

 

आयुष्यातील एकविसावं वर्ष तसं तर मौजमजेचं. पण सोबतच या वयात आपण तरुणपणात पाउल टाकतो आणि आपण आपल्या भविष्याबद्दल देखील विचार करायला लागतो.

या वयात घेतलेले बहुतांश निर्णय ठरवत असतात की तुमचे येणारे भविष्य कसे असेल. पण बऱ्याचदा तारुण्याच्या भ्रमामध्ये आपण सर्व गोष्टी विसरून जातो आणि चुकीचे निर्णय घेतो.

अश्याच लहान आणि जीवनाला कलाटणी देणाऱ्या वयात रितेश अग्रवाल या तरुणाने ओयो रूम्स नावाची ३६० कोटी रुपयांची कंपनी स्थापन केली.

===

हे ही वाचा शिक्षण सोडल्यावरच मिळणाऱ्या स्कॉलरशिपच्या जोरावर तयार झाला एवढा मोठा ब्रॅंड!

===

विश्वास बसत नाही ना? पण ही गोष्ट अगदी खरी असून सर्वच तरुणांसाठी आदर्श ठरणारी आहे.

या वयामध्ये रितेश अग्रवालने एवढे यश संपादन केले, जे मोठमोठ्या उद्योगपतींना देखील जमत नाही.

ओयो रूम्सचा मुख्य उद्देश प्रवाश्यांना कमी किंमतीमध्ये, स्वस्त दरामध्ये चांगल्या मुलभूत सुविधेबरोबर देशातील मोठ्या शहरांमधील हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा होता. जो रितेशने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर अगदीच सार्थ करून  दाखवला आहे.

 

Oyo rooms.marathipizza1

रितेश हा तसा सामान्यच मुलगा, पण त्याची स्वप्ने फार मोठी! रितेश अग्रवालने व्यवसाय करण्याचा विचार आधीपासूनच केला होता आणि तो तश्या प्रयत्नामध्ये देखील होता.

त्याचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये उडीसा राज्यातील कटक जिल्ह्याच्या एका व्यावसायिक कुटुंबामध्येच झाला होता. तो बारावीपर्यंत उडीसामध्ये शिकला. त्यानंतर त्याला आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, त्यासाठी तो राजस्थानच्या कोटामध्ये आला.

कोटामध्ये राहून त्याने दोनच गोष्टी केल्या एक म्हणजे अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर प्रवास!

 

Oyo rooms.marathipizza2

 

२०१२ मध्ये त्याने आपल्या पहिल्या स्टार्ट-अपची सुरुवात केली. या कंपनीचे नाव ओरवल स्टे हे होते.

या कंपनीचा उद्देश प्रवाश्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कमी कालावधीसाठी कमी किंमतीवर रूम उपलब्ध करून देणे असा होता.

कंपनी सुरू केल्यानंतर त्याला काही महिन्यानंतर लगेचच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी वेंचर नर्सरी या कंपनीकडून ३० लाखांचा फंड प्राप्त झाला.

आता रितेशकडे आपली कंपनी वाढवण्यासाठी पुरेसा पैसा होता. याचवेळी त्याने आपली स्टार्ट-अप कल्पना थेल फेलोशिप ह्या प्रसिद्ध स्पर्धेमध्ये मांडली.

या स्पर्धेमध्ये त्याच्या बिझनेस आयडीयाला १० वा क्रमांक देण्यात आला आणि ज्यामधून त्याला व्यवसायासाठी ६६ लाख रुपयांची रक्कम मिळाली.

खूपच कमी वेळामध्ये आपल्या स्टार्टअपला मिळालेल्या या यशामुळे तो खूप उत्साहीत झाला आणि त्याने आपल्या स्टार्टअपवर अजून बारकाईने काम करण्यास सुरूवात केली.

पण दुर्दैवाने त्याचे हे बिझनेस मॉडेल यशस्वी ठरले नाही आणि हळूहळू त्याची ही ओरवेल स्टे कंपनी तोट्यामध्ये गेली.

रितेश जेवढी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होता, तेवढीच परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. शेवटी त्याला ही कंपनी तात्पुरती बंद करावी लागली.

===

हे ही वाचा यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!

===

Oyo rooms.marathipizza3

 

रितेशचा स्टार्टअप अयशस्वी झाला होता, तरीही त्याने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा आपल्या बिझनेस आयडीयावर विचार केला.

त्याच्या लक्षात आले की, भारतामध्ये फक्त हॉटेलमध्ये रूम उपलब्ध करून देऊन ग्राहाकाला काही फायदा होणार नाही.

त्याला स्वत:चा अनुभव आठवला. कधी कधी प्रवास करतेवेळी त्याला काही ठिकाणी खूप पैसे देऊन देखील खराब रूम मिळत असत. तर दुसरीकडे काही ठिकाणी कमी पैशांमध्ये देखील आरामदायी आणि स्वच्छ रूम मिळत असत.

या गोष्टींनी त्याच्या विचारला चालना दिली. त्याने पुन्हा एकदा ओरवेल स्टे मध्ये बदल केला आणि प्रवाशांना होणाऱ्या सुविधा लक्षात घेऊन एका नवीन नावाने २०१३ मध्ये कंपनी सुरु केली.

या कंपनीचे नाव ओयो रूम्स हे होते. ओयो रूम्सचा अर्थ होता, तुमची स्वतःची रूम.

ओयो रूम्सचा उद्देश फक्त, लोकांना रूम उपलब्ध करून देणे एवढाच नव्हता. तर त्याचा उद्देश होता की, लोकांना कमी किंमतीमध्ये सर्वोत्तम, चांगल्या आणि आरामदायी रूम मिळवून देणे.

त्यांची कंपनी हॉटेल्सच्या रूमची पडताळणी करून त्यांची गुणवत्ता निश्चित करत असत आणि त्यावरून त्यांना रेटिंग देत असे. जर एखादे हॉटेल ओयोच्या प्रतिनिधींना पसंत पडले तरच, ते हॉटेल ओयोशी जोडले जात असे, नाहीतर नाही.

 

Oyo rooms.marathipizza4

 

आज ओयो रूम्सची हॉटेलची चेन २३००० पेक्षा जास्त हॉटेल्सने सज्ज आहे.  २०१६ साली जपानच्या सॉफ्टबँक कंपनीने रितेशच्या कंपनीमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली होती.

२ जुलै २०१६ मध्ये प्रतिष्ठित मॅगझीन GO (Gentelmen’s Quarterly) ने रितेश अग्रवालला प्रभावशाली भारतीय युवकांच्या यादीमध्ये पहिल्या ५० जणांत स्थान दिले होते.

कालांतराने ओयो रूम्समध्ये नवी गुंतवणूक होत आली आहे. ज्यामुळे ओयोचं व्हॅल्यूएशन आज साडे सात हजार कोटींच्या वर गेलं!

तुम्ही नेहमी कष्ट करत राहिले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. तरच यश तुमच्या पदरी पडेल. अपयश तर येतच राहणार. पण त्यावर जिद्दीने पाय रोवून उभे राहून तुम्ही तुमची क्षमता जागासमोर सिद्ध केली पाहिजे!

===

हे ही वाचा ५० पैसे ते २ लाख : पतीच्या अत्याचारांना झुगारून, शून्यातून विश्व उभारणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?