' खिळवून ठेवणारा थरार अनुभवायचा असल्यास हे हिंदी सिनेमे आवर्जून बघाच! – InMarathi

खिळवून ठेवणारा थरार अनुभवायचा असल्यास हे हिंदी सिनेमे आवर्जून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यामधील बहुतेक लोकांना हॉलीवूडमधील चित्रपटांच्या गोष्टी स्वतः कडे आकर्षित करत असतील. त्यांच्या चित्रपटामधील रोमांचक गोष्टी पाहून आपण भारावून जातो. त्यावेळी आपल्याला बॉलीवूडमधील चित्रपट या चित्रपटांच्या पुढे फिके वाटतात.

मग आपणच आपल्या चित्रपट सृष्टीतील चित्रपटांची या हॉलीवूडमधील चित्रपटांशी तुलना करतो आणि त्यांना नावे ठेवण्यास सुरुवात करतो.

पण आपल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काही असे चित्रपट आहेत, जे खूपच रोमांचक आहेत, परंतु काही कारणास्तव ते आपल्यापर्यंत पोहचू शकले नाहीत किंवा पोहचले तरी देखील आपण ते बघण्याची काही इच्छा दर्शवली नाही.

अश्याच काही चित्रपटांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, जे आपल्याला थरारपणाचा खूप चांगला अनुभव देऊन जातील.

 

१. नो स्मोकिंग

 

no smoking inmarathi

 

ह्यामध्ये एका के नावाच्या माणसाची कथा सांगितली आहे, ज्याला धूम्रपानाचे व्यसन जडलेले असते. हे के नावाच्या पात्राचा रोल जॉन अब्राहमने केला आहे.

यामध्ये एक अशी संस्था दाखवली गेली आहे, जी हे व्यसन असामान्य पद्धतीने सोडवण्याचा दावा करत असते.

ह्या संस्थेचा प्रमुख बाबा बंगाली दाखवला आहे. बाबा बंगालीचा रोल परेश रावल यांनी केला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आयशा टाकिया, अब्बास तेरवला हे देखील आहेत. हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट नक्कीच एकदातरी पाहण्यासारखा आहे.

अनुराग कश्यप हा दिग्दर्शकअशाच हटके फिल्म्ससाठी लोकप्रिय आहे, त्याचे सिनेमे लोकांना पटकन समजत नाहीत, कारण त्यातल्या कथेमध्ये असलेले लेयर्स प्रेक्षकांना गोंधळात पाडतात पण गुंगवून सुद्धा ठेवतात!

 

२. ४०४ : एरर नॉट फाऊंड

 

40

 

ही एक वैद्यकीय संस्थेविषयीची कथा आहे. रॅगिंग, विद्यार्थी, आत्महत्या, मानसिक विकार, मभुळवणी आणि खोली क्रमांक ४०४ यावर सर्व चित्रपट चालतो.

हे सर्व खूपच रोमांचित करणारे आहे. जर तुम्हाला विज्ञान आणि आत्मिक जगाविषयी आपला विश्वास दृढ करायचा असेल, तर हा रोमांचित चित्रपट नक्की पाहावा.

३. कौन

 

kaun inmarathi

 

मनोज वाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर यांचा कौन या चित्रपटामधील अभिनय प्रदर्शन पाहिल्यावर तुम्ही त्यांना सहसा विसरणार नाही.

हा चित्रपट एक मानसिक भयपट रोमांचित आहे. अनुराग कश्यप यांनी लिहिलेला आणि राम गोपाल वर्मा यांनी तयार केलेला हा खूप उत्कृष्ट चित्रपट आहे.

 

४. अगली

 

ugly inmarathi

 

ह्या चित्रपटामध्ये एक एकटी आणि अस्वस्थ गृहिणी दाखवली आहे. तिची दोन लग्न झालेले असतात. तिचा पहिला पती हा व्यसनामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो, तर दुसरा पती हा पोलीस असतो आणि ती आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेत असते.

हा चित्रपट अजून एक मानसिकरीत्या रोमांचित करणारा चित्रपट आहे. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेला हा अजून एक मास्टरपीस आहे.

 

५. ट्रॅप

 

trapped inmarathi

 

या चित्रपटामध्ये राजकुमार राव एका मुंबईच्या निर्जन इमारतीच्या फ्लॅटमध्ये अडकून राहतो.

तो तिथून सुटण्यासाठी काय काय करतो आणि एवढे दिवस तो कसे आणि किती खराब आयुष्य जगतो, ते या चित्रपटामध्ये दाखवले आहे.

खरच, हा चित्रपट खूपच रोमांचित करणारा आहे. या चित्रपटाचा शेवट देखील खूप छान आहे.

 

६. समय

 

samay movie inmarathi

 

समय हा चित्रपट मॉर्गन फ्रीमन आणि ब्रॅड पिट यांचा हॉलीवूड चित्रपट सेवन पासून प्रेरित झालेला आहे. यामध्ये सुस्मिता सेन एक हुशार पोलीस दाखवली आहे. तसेच माल्विका चौहान ही एसीपी दाखवलेली आहे आणि जॅकी श्रॉफ हा अमोद पारेख म्हणून या चित्रपटामध्ये आहे. हा चित्रपट देखील पाहण्यासारखा आहे.

७. ६-५=२

 

6-5=2 inmarathi

 

हा चित्रपट इतर बॉलीवूड चित्रपटांसारखा नाही आहे. ह्या चित्रपटामध्ये सहा मित्रांची कथा दाखवली गेली आहे, यामध्ये हे सहा मित्र म्हैसूरमधील पश्चिम घाटातील एका अज्ञात डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी जातात.

हा म्हैसूरचा डोंगर आणि इतर गोष्टी गडद वळण घेण्यास सुरुवात करतात. हा चित्रपट खूप मनोरंजक आहे.

 

८. लुसिया

 

thriller movies.marathipizza7

 

या सूचीतील सर्वात जास्त रेटिंग असलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट एकदातरी नक्कीच पहिला पाहिजे. या चित्रपटाची कथा एका माणसाची आहे, जो निद्रानाशाचा बळी पडलेला असतो.

त्याला लुसिया हे ड्रग फसवून यावरचे औषध म्हणून दिले जाते. त्यामुळे त्याने बघितलेली स्वप्ने आणि सत्य यांमधील भिंत तुटते आणि त्याची खूप फरफट होते. हा चित्रपट खूपच रोमांचित करणारा आहे.

असे हे रोमांचित करणारे  चित्रपट एकदातरी नक्कीच पहा. ज्यामुळे तुमच्यावर पडलेली हॉलीवूड चित्रपटांची भुरळ काही प्रमाणात कमी होईल. आणि आपल्याइथे सुद्धा असे सिनेमे बनू शकतात यावर विश्वास देखील बसेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?