आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाचे प्राण रामभक्त हनुमंताने वाचवल्याची एक रोचक कथा रामायणात आहे. ज्या औषधाने हे प्राण वाचले, त्या औषधी वनस्पतीचं नाव आहे संजीवनी.
कलियुगात लुप्त झालेल्या ह्या सत्ययुगीन औषधीचा छडा लावण्याचा विडा उत्तराखंड सरकारने उचललाय.
रामायणात रावणाचा मुलगा मेघनाद आणि श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण ह्यांच्यातील घनघोर युद्धामध्ये एक भीषण वार अख्ख्या युद्धाचा ओघ बदलू शकत होता. तेवढ्यात मेघनादाचा बाण लक्ष्मणाला बेशुद्धावस्थेत घेऊन गेला. श्रीराम हवालदिल झाले, त्यांचे लक्ष युद्धात राहिले नाही. वैद्यांच्या मते लक्ष्मणाचा जीव फक्त संजीवनी औषधीने वाचणार होता.
श्रीरामांचा कळवळलेला चेहरा आणि वेळेची गरज म्हणून हनुमान ही औषधी शोधण्यासाठी हिमालयात द्रोणागिरीच्या शोधास गेले. पण अक्ख्या पर्वतावर अनेक वनस्पती होत्या! संजीवनी ओळखावी तरी कशी?
बलभीम हनुमंताने पर्वातालाच उपटला आणि हातावर उचलून उड्डाण घेतलं!
ह्या संजीवनी बुटीमुळे मरणशय्येवर असलेल्या लक्ष्मणाचे प्राण वाचले.
त्याच संजीवनी जडीबुटीची आज उत्तराखंड सरकारला आठवण झालीये. आणि ही आठवण नुसतीच आठवण नाहीये तर उत्तराखंड राज्य सरकार ने एक शोधमोहीम हाती घेतली आहे. संजीवनी जडीबुटी शोधण्यासाठी.
हिमालय पर्वतरांगांत अजूनही अश्या काही औषधी वनस्पती आहेत ज्यांच्याबद्दल विज्ञान क्षेत्रात संशोधन झालं नसून त्या अजून सुद्धा विरळ आहेत.
प्राथमिक स्वरूपात ह्या शोधमोहिमेसाठी आम्ही २५ कोटी रुपयांचे बजेट ठेवले असून राज्यसरकार संजीवनी बुटीचा हिमालयात शोध घेणार आहे. ही मोहीम व्यर्थ जाणार नाही असा आमचा पक्का विश्वास आहे.
– सुरेंद्र सिंग नेगी, राज्यमंत्री उत्तराखंड
नव्या दमाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी सरकारमध्ये आयुर्वेदाला मानाचे स्थान मिळाले आहे. जरी असे असले तरी ह्या शोधमोहिमेचा सगळा खर्च उत्तराखंड राज्य सरकार करणार आहे.
सुरेंद्र सिंग नेगी असं सुद्धा म्हणले की संशोधक ऑगस्ट महिन्यापासून काम सुरु करणार असून त्यांचं मुख्य लक्ष, ज्यांचा उल्लेख रामायणात ह्या जडीबुटीसाठी केला आहे – अश्या द्रोणागिरी पर्वतरांगांकडे असणार आहे.
जर ह्या संजीवनीच शोध लागला तर विज्ञानक्षेत्रात खूप मोठी प्रगती होईल.
उत्तराखंड सरकार ने घेतलेल्या ह्या Bold आणि धाडसी निर्णयाचं स्वागत आणि खूप शुभेच्छा!
प्रश्न फक्त इतकाच उरतो – की प्राचीन कथेवर विसंबून असे शोध घेणं संयुक्तिक ठरू शकतं का?
उत्तर…अर्थातच शोधमोहीम संपल्यावर मिळेल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.