आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
गुडगाव स्थित रायन इंटरनॅशनल स्कुल हे सध्या वादग्रस्त बनले आहे. राष्ट्रीय माध्यमांत सतत ज्ज्याच शाळेची चारच आहे. प्रद्युम्न ठाकुर नामक सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच शाळेत चाकूने भोसकुन खुन झाला, त्यामुळे ही शाळा एका रात्रीत प्रकाशझोतात आली आणि शाळांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे प्रसारमाध्यमांच्या तर्फे काढण्यात आले.
पण तुम्हाला माहित आहे का ह्या शाळेची पार्श्वभूमी काय? कशी ही शाळा अस्तित्वात आली? ह्या शाळेचा संस्थापन कोण? वगैरे..वगैरे…चला तर ह्या गोष्टी जाणून घेउया.
ऑगस्टीन पिंटो हेरायन इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. कर्नाटकातील मंगळूरु येथे शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेले ऑगस्टीन चेन्नाईतील रॉयल कॉलेज मधून अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. कामाच्या शोधात ते मुंबईत आले. स्प्रिंग प्लास्टिक येथे पहिल्यांदा काम त्यांना मिळाले पण दोनच वर्षात कंपनी बंद पडली.
तदनंतर मित्राच्या मदतीने त्यांना शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. एका मुलाखतीमध्ये मध्ये त्यांनी सांगितले होते की,
तेव्हा आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल खुप वयस्कर होत्या व त्या दारोदारी जाऊन पालकांनी मुलांना शाळेत पापाठवावे म्हणून आव्हान करत होत्या.
तेव्हाच ऑगस्टीन पिंटोंच्या मनात स्वतः ची शाळा असावी असा विचार सुरु झाला. दहा हजार रुपये गुंतवणुक करत त्यांनी फादर अँजेलो प्रायमरी स्कुल सुरु केली. पण कालांतराने ती बंद पडली. ते सेंट फ्रान्सिस स्कुल, मालाड येथे परत शिक्षकीपेशात दाखल झाले.
त्यांचे म्हणणे आहे कि
ईश्वरी प्रेरणा व त्याद्वारे मार्गक्रम करत मी इथवर पोहोचलो आहे. ४० वर्षापूर्वी माझ्यात प्रभूने एक बीज रुजवले व मला दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्याचे माध्यम बनविले.
पुढे त्यांनी पत्नीच्या मदतीने रायन ग्रुपची पहिली शाळा मुंबईत बोरिवलीत १९८३ साली सेंट झेविअर्स हायस्कुल या नावाने उघडली. जी त्यांचीच बंद पडलेली फादर अंजेलो प्रायमरी स्कुल होती. केजी ते बारावी पर्यत दर्जेदार शिक्षण देणारी देशातील एकमेव खाजगी शाळा म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.
यानंतर अल्पावधीतच अंधेरी, चेंबुर, मालाड, गोरेगाव, कांदिवली, नेरुळ, सानपाडा व खारघर इ. ठिकाणी डजनभर शाळा सुरु केल्या. बरं त्यांनी आपल्या ग्रुपचं नाव आपपल्या मुलाच्या नावावरून ठेवलं बरं का! रायन हा त्यांचा मुलगा विदेशातील कारभार बघतो. अमेरिका, अरब अमिरात, मालदीव व थायलंड या देशासमवेत त्यांचा कारभार चालतो असे ऐकिवात आहे.
रायन ग्रुप देशात १८ राज्यात व विदेशात मिळून १३५ शाळा चालवतो असे सांगितले जाते.पण विकिपीडिया नुसार त्यांच्या १८६ शाळा असल्याचे समजते. जवळपास ३ लाख विद्यार्थी या शाळेच्या माध्यमांतून शिक्षण घेतात. तसेच १५००० शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात.
रायन इंटरनॅशनल स्कुल वादात असण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
२०१६ साली दिव्यांश काक्रोरा सहा वर्षाच्या मुलाचा शाळेच्या गच्चीवरिल पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला होता.
२०१५ साली यश सिंग ह्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शर्टाचे बटण खाली वर लावले म्हणुन त्याला अंत्यत हिंसक पद्धतीने मारले होते.
बेहिशोबी पैसे जमविल्या प्रकरणी रायन ग्रुप सेबीच्या रडार वर आहे.
रायन ग्रुपचे अनेक ब्रँडस देखील आहेत. जसे की रायन इंटरनॅशनल स्कुल, रायन ग्लोबल स्कुल, रायन फाउंडेशन , इंडिअन आयडेल युनायटेड नेशन्स व रायन शैलम प्री स्कुल!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.