आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
खरंतर बायकोने आपल्या खांद्याला खांदा लावून संसाराला मदत करावी, आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हातभार लावावा असे प्रत्येक आधुनिक नवऱ्याला वाटतच असते. कारण वाढत्या महागाईने आज पाच आकडी पगार देखील पुरेनासा झालाय.
त्यामुळे आपल्या जोडीदाराने देखील थोडे थोडके का होईना पण घरात पैसे आणावेत अशी अपेक्षा नवऱ्यांनी बायकांकडून ठेवणे रास्त आहेच. त्यामुळे आजच्या घडीला आपण सगळेच पाहतो की, नवरा आणि बायको दोन्ही नोकरीवर असतात.
सारं काही सुरळीत सुरु असतं, पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवू लागते आणि नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावला जातो.
मग सुरु होते कुरबुर, मग त्यातून होतात भांडण.. कधी कधी ह्या भांडणाचा परिणाम म्हणून काही प्रकरणं थेट घटस्फोटापर्यंत देखील गेल्याचे आढळले आहे. पण सर्वच घरात अशी परिस्थिती नीटसे.
ज्या घरातील नवरा समजूतदार असतो, तो आपल्या बायकोला जास्त पगार असू देत, किंवा ती मोठ्या पोस्टवर असुदेत त्याला आनंदच वाटतो आणि अभिमानाने तो ही गोष्ट सर्वाना सांगत सुटतो.
आजचा आपला लेख देखील याच विषयासंदर्भातला आहे…
मध्यंतरी क्वोरा या सोशल साईटवर एक प्रश्न विचारण्यात आला होता – “बायको आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावत असेल तर नवऱ्यांना काय वाटतं?”
या प्रश्नाबद्दलची प्रत्येकाची उत्तरे अर्थातच वेगवेगळी असणार आहेत. या प्रश्नाला क्वोरा वर काही नवऱ्यांनी देखील उत्तरे दिली होती. त्यापैकी काही मस्त उत्तरे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत, पहा तुम्हाला यातील किती उत्तरे पटतायत..
१) पहिले आपण सर्वात जास्त वाचले गेलेले उत्तर पाहू ते उत्तर आहे नवीन नाईक यांचे… अर्थातच हे उत्तर सर्वात जास्त वाचले गेलेले आहे म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी खास असणार.
नवीन नाईक म्हणतात,
ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे, कारण या घडीला माझी बायको माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. २०१३ मध्ये गोवा ट्रीप वरून आल्यावर माझ्या घरच्यांनी तुला आता लग्न करावेच लागेल असा बॉम्ब माझ्यावर टाकला.
त्यामुळे नाईलाजाने मला माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला जावं लागलं. नंतर मला कळलं की, ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्याच वडीलांच्या मित्राची मुलगी आहे.
…
बघण्याच्या कार्यक्रमावेळी आम्हा दोघांना खाजगीत बोलण्याची संधी दिली गेली. त्या दिवशी तिने मला तिचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे हे सांगितलं नाही, पण तिला याबाबत काहीच समस्या नव्हती की माझा पगार कमी आहे. मी तिला हे देखील म्हटलं की, “मी अजून स्वत:च घर खरेदी केलेलं नाही. तुला हे मान्य आहे का?”
तेव्हा तिने दिलेलं उत्तर माझ्या अजूनही लक्षात आहे. ती म्हणाली, “त्यात काय एवढं? आपण दोघेही कष्ट करू आणि नवीन घर खरेदी करू.” या एका उत्तराने मी थेट तिच्या प्रेमात पडलो आणि आमचं लग्न झालं.
…
तुम्हाला तर माहित आहेच की, आजच्या मुलींची आपल्या भविष्याबाबत खूप स्वप्ने असतात. पण त्यासाठी स्वत: कष्ट करायला त्या तयार नसतात फक्त नवऱ्यानेच कमवावं असं त्यांना वाटत असते. आज ३ वर्षानंतर आम्ही स्वत:चं घर घेतलं आहे.
या काळात तिने भांडणात देखील एकदाही मला तुझ्यापेक्षा जास्त पगार आहे, मी घर चालवते असे म्हटलेलं नाही. त्यामुळेच मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला अशी बायको मिळाली.
२) कपिल यादव या आणखी एका पतीचं उत्तर जाणून घेऊया…
कपिल म्हणतो,
२०१४ मध्ये माझं लग्न झालं. तेव्हा माझी बायको माझ्यापेक्षा जास्त कमवायची, माझ्या कमाईपेक्षा जवळजवळ तिप्पट ती कमवायची . पण मला सरकारी नोकरी लागल्यामुळे आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं, तेव्हा काहीही न बोलता ती आपली नोकरी सोडून माझ्यासोबत शिफ्ट झाली. तेव्हा मी एकटाच कमावणारा होतो.
मी जो काही पगार यायचा तो सर्व तिच्या हातात द्यायचो, ती त्यात बरोबर घर सांभाळायची. सारं काही सुरळीत सुरु असताना माझी नोकरी सुटली, तेव्हाव्ही तिने काही कुरूकुर न करता नवीन नोकरी धरली.
…
मी तब्बल वर्षभर बेरोजगार होतो, पण ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. आता मी बिलकुल नव्या अश्या डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात माझं नशीब आजमावतो आहे. सध्या माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त ७ पट पैसे कमावते आहे.
यातून मला एवढच सांगायचं आहे की, संसारात समजूतदारपणा हवा. एकाने जरी कुरकुर केली तरी त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो आणि मग त्याचं पर्यावसन भांडणात होतं. एकमेकांचा आदर करा.
पैसा काय आज आहे आणि उद्या नाही, पण तुम्हाला जन्मभर एकमेकांच्या सोबत राहायचे आहे.
३) मनोज चरातीमठ याने दिलेलं हे उत्तर खरंच प्रत्येक समजूतदार नवऱ्याच्या मनातलं आहे असं वाटतं.
मनोज म्हणतो,
आपल्या बायकोला आपल्यापेक्षा जास्त पगार आहे ही गोष्ट खरंच अभिमान वाटावी अशी आहे. तुम्ही जास्त पगार घेतला काय नी तुमच्या बायकोने जास्त पगार घेतला काय तो बाहेर थोडी ना खर्च होतोय, त्याचा वापर तुमच्या आणि तुमच्या घरासाठी तर होतोय.
त्यामुळे कोणीही जास्त कमावलं तरी तो पैसा आपल्याकडेच येणार आहे, म्हणून भांडून वा मनात द्वेष धरून उपयोग नाही. आपण एक कुटुंब आहोत असा विचार प्रत्येक नवऱ्याने केला पाहिजे.
माझी बायको माझ्या पेक्षा जास्त पगार घेते हा विचारच मुळात चुकीचा आहे. माझी बायको माझ्या कुटुंबाला जास्त हातभार लावते असा विचार करायला हवा.
मंडळी या विषयावर तुमची मत देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडतील, तर मग बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये तुमचं मन मोकळं करा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.