Site icon InMarathi

कोरोनाचं सावट सरताच ज्याच्या कणाकणात सौंदर्य नांदतं अशा जगातल्या सर्वात सुंदर गावाला नक्की भेट द्या

Zalipie-Village-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगभरात अशी कित्येक ठिकाणं आहेत ज्यांना या निसर्गाचा अनमोल असा वारसा लाभला आहे. कित्येक अशी गावे आहेत जी आपला नैसर्गिक सुंदरतेने सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतात. निसर्गाचं वरदान सगळ्याच गावांना मिळत नाही. पण ज्यांना ते मिळतं त्यांचं नयनरम्य सौंदर्य पाहण्यासारखं असतं.

पण कधीकाळी एखाद्या भीषण युद्धात होरपळून गेलेलं गाव आज जर अत्यंत आकर्षक आणि सौंदर्याची खाण ठरत असेल तर?

आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगणार आहोत त्या गावाची बात अशीच काहीशी निराळी आहे.

 

mymodernmet.com

 

दुसर्‍या महायुद्धाच्या आगीत होरपळून देखील त्या वेदना विसरणारे हे गाव. दुसऱ्या महायुद्धात या गावाचे अतोनात नुकसान झाले पण या संकटा वर मात करत हे गाव पुन्हा उठून उभे राहिले. येथील जनतेने आपले गांव आपल्या कलाकारीने सुंदर बनविले आहे. हे गाव म्हणजे पोलंडमधील झालिपई”. आता जगातील सर्वात सुंदर गाव म्हटलं तर ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारच.

 

twitter.com

 

पोलंडमधील या छोट्याश्या सुंदर गावात घराघरांवरच नाही तर सर्व स्थिर वस्तूंवर कलाकारी केलेली आढळते. म्हणजे पाण्याच्या टाक्या, पूल, विहीरी, कचरा पेट्या, कुत्र्याची छोटी घरे इत्यादी सर्व फुलापानांच्या डिझाईन्सनी रंगविली गेली आहेत.

यामुळे हे गांव म्हणजे एखाद्या रंगीबिरंगी फुलांच्या बागेप्रमाणे मनोहारी आणि ताजेतवाने वाटते. आता तर ही कलाकारी इथल्या परंपरेचाच एक भाग बनली आहे.

प्रार्थनास्थळ असलेले चर्च सुद्धा आकर्षक रंगसंगतीने नटलेले आढळेल.

 

travelandleisure.com

 

घरांवर फुलकारी करण्याची ही परंपरा १०० हून अधिक वर्षांपासून सुरू असल्याचे समजते. म्हणजे त्याकाळी घरे हवेशीर नसत आणि स्वयंपाक काम हे धूर सोडणार्‍या स्टेाव्हवर केले जात असे. त्यामुळे या धुराने घराच्या भिंती काळ्या होत असे.

हे काळे डाग लपविण्यासाठी फेलिशिया कर्व्हीलोव्हा या महिलेने एक युक्ती केली. तिने त्या काळ्या डागांवर सुंदर अशी रंगीबिरंगी फुले साकारली.

तिची ही कल्पना गावातील अन्य महिलांनाही आवडली. त्यानंतर त्यांनीही आपापली घरे या पद्धतीने फुलापानांच्या उत्तम चित्रांनी सजवायला सुरवात केली. कालांतराने ही पेटींग्ज या गावाची ओळख बनली. तर आज फेलिशियाचे घर म्युझियम म्हणून जतन केले गेले आहे.

तिने गावाचा कायापालट घडवला यासाठी जणू काही ही एक छोटीशी मानवंदना ठरली आहे. 

 

newsatview.com

 

दुसर्‍या महायुद्धात या गावाची चांगलीच होरपळ झाली. त्यांना खूप दुखः सहन करावं लागलं, पण त्या वेदनांचा विसर पडावा म्हणून १९४८ पासून येथे सर्वात सुंदर कलाकारी असलेले घर अशी स्पर्धा सुरू झाली आणि त्यासाठी बक्षीस देखील दिले जाऊ लागले.

 

unusualplaces.org

 

आजकाल स्वयंपाकघरात त्या चुलींमुळे धूर होत नाही त्यामुळे भिंती काळ्या होण्याचाही प्रश्न नाही. तरी देखील आजही या गावातील महिला दरवर्षी आपली घरे सुंदर कलाकारीने रंगवतात आणि अत्यंत सुशोभित करतात.

सुरवातीला त्यासाठी गाईच्या केसांपासून बनविलेले ब्रश वापरले जात असत. आता मात्र आधुनिक ब्रश वापरले जातात.

आजही या गावाने आपली परंपरा मात्र सोडलेली नाही. कला तिचे सौंदर्य आणि त्या सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून आज सुद्धा झालिपई या गावाकडे पाहिले जाते.

माणसाच्या विचारांनी जर प्रत्यक्ष रूप घेतलं तर तो काय काय साकारू शकतो याची अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत.

पण विपरीत परिस्थितीतून आपण स्वतःला सावरू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे झालिपाई गाव…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version