Site icon InMarathi

जगभरातील वाहतुकीचे हे १० भन्नाट नियम वाचून थक्क व्हाल

car-wash-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

या धावत्या जगाशी आपल्याला संतुलन राखण्यास, मागे पडू न देण्यात मदत करते ती आपली गाडी. वाहन हे आपल्यासाठी एक सोयीचे साधन आहे. आपण जास्त कष्ट न घेता प्रवास करू शकतो.

पण जगातील प्रत्येक देशाने आपल्यासारख्या वाहनचालकांसाठी काही नियम आखून ठेवले आहेत. जे आपल्याला पाळावेच लागतात. जसे आपण आपल्या देशात पाळतो.

भारतातील ट्राफिक रुल्स हे जर तुम्हाला खूप कठीण किंवा अति त्रासदायक वाटत असतील तर हा लेख वाचल्यावर तुमचा हा (गैर)समज नक्कीच दूर होईल.

जगात काही असे देश आहेत ज्यांचे ट्राफिक रुल्स ऐकाल तर तुमचं डोक चक्रावेल… चला पाहूयात मग काय आहेत या देशांचे भन्नाट ट्राफिक रुल्स..

 

१. थायलंड :

 

 

थायलंड म्हणजे पर्यटकांसाठी मेजवानीच. वर्षभर येथे पर्यटकांची रीघ बघायला मिळते. त्यामुळेच थायलंड हा देश पर्यटनासाठी जगात अतिशय लोकप्रिय आहे.

पण येथे वाहनचालकांसाठी असणार्‍या कायद्यात एक कायदा असा आहे की, उघड्या अंगाने तुम्ही येथे वाहन चालवू शकत नाही. म्हणजे पुरूष चालक असेल तरी त्याला विनाशर्ट वाहन चालविण्यास मनाई आहे.

कितीही उकाडा असला तरी हा नियम वाहनचालकांचा पाळावा लागतो अन्यथा दंड आकारला जातो.

 

२. सायप्रस :

 

 

सायप्रस हा देश तिथल्या बिचेस साठी खूप प्रसिद्ध आहे. या देशात वाहन चालविताना चालकाला काहीही खाण्याची परवानगी नाही. जर वाहन चालविताना तुम्ही काही खाताना अथवा पिताना पकडले गेलात तर दंड ठोठावण्यात येतो.

 

३. चीन :

 

 

चीन या देशांत वाहनांची संख्या खूप आहे. तसेच येथे हर प्रकारची वाहने रस्त्यावर फिरताना दिसतात. चीनमधील रस्त्यांवर गर्दीही खूप असते.

त्यामुळे वाहनचालकांना कोणत्याही परिस्थितीत फुटपाथवरून गाडी नेता येत नाही. फुटपाथवर पार्क केलेल्या गाड्या येथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत आणि असे आढळले तर दंड भरावा लागतो.

 

४.जपान :

 

 

जपानमध्ये वाहनचालकांसाठी नियम मुळातच कडक आहेत. मात्र एका नियमानुसार रस्त्यात पाणी साठले असेल व तुमच्या कारमुळे ते उडविले गेले तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि  त्यासाठी शिक्षेची तरतूद देखील आहे.

हे ही वाचा – लाच दिली नाही, तर इथले पोलीस थेट गोळ्या घालतात!

५. रशिया : 

 

 

राशियातील मास्को येथे तुम्ही रस्त्यावर घाणेरडे वाहन आणू शकत नाही, असा नियम आहे. तुमची कार रस्त्यावर येते तेव्हा ती स्वच्छ असायलाच हवी. हा नियम कठोर असून तो मोडल्यास दंड भरावा लागतो. विचार करा जर असा नियम भारतात असता तर…

 

६. स्पेन :

 

 

हा आणखी एक भन्नाट नियम… स्पेनमधील वाहनचालक वाहन चालविताना स्लीपर घालू शकत नाही. एवढंच नाही तर चालक पायात काहीच न घालता म्हणजे अनवाणीही वाहन चालवू शकत नाहीत.

तसेच हाय हिल्स घालूनही येथे वाहन चालविण्यावर बंदी आहे. म्हणजे सर्वांनी बूट घालूनच वाहन चालवावे असा नियम तिथे आहे.

इथे आणखी एक अजब कायदा आहे, तो म्हणजे जर तुम्हाला चष्मा असेल, तर गाडी चालविताना तुमच्या जवळ कारमध्ये एक अतिरिक्त चष्मा ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

 

७. स्वीडन :

 

 

स्वीडनमध्ये तुम्ही भरदिवसा गाडी चालवित असलात तरी देखील गाडीचे हेडलाईट सुरू ठेवणे बंधनकारक आहे. थंडीच्या दिवसांत हेडलाईट बंद करून कुणी दिसले तर त्याला जागेवरच दंड ठोठावला जातो. सरकारने हा नियम अपघात होऊ नयेत यासाठी केला आहे.

 

८. अमेरिका : 

 

 

अमेरिकेतील डेनेव्हर येथे रविवारी काळ्या रंगाची कार अथवा वाहन रस्त्यावर आणता येत नाही. हा नियम मोडल्यास दंड अथवा शिक्षेची तरतूद आहे.

 

९. स्वित्झर्लंड :

 

 

स्वित्झर्लंड या देशात रविवारी कार धुण्यावर बंदी आहे. म्हणजे तुम्ही येथे रविवारी तुमची कार धुवू शकत नाही. असे करताना जर कुणी आढळले तर दंड ठोठावला जातो.

 

१०. फिलिपिन्स :

 

 

फिलिपिन्समधील मनीला येथे जर वाहनाच्या नंबरप्लेटवर शेवटचा आकडा १ किवा २ असेल तर ते वाहन सोमवारी रस्त्यावर आणता येत नाही.

Just Imagine  जर या देशांसारखे कायदे आपल्या देशात असतील तर… काय होईल आपलं ? करा विचार…

 

हे ही वाचा – तब्बल साडेपाच फुटी चालान…५७ हजारांचा दंड, वाचा बुलेट राजाचा अनोखा विक्रम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version