Site icon InMarathi

मुलांनी स्वत:च्या हिंमतीवर पैसा कमवावा – बील गेट्सचं प्रेरणादायी मृत्यूपत्र प्रत्येकाने वाचायलाच हवं!

Bill Gates im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस पैसा का कमावतो? हा प्रश्न विचारल्यावर आपलं सरळ सरळ उत्तर असेल स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी! जीवन आनंदाने जगता यावं, दोन सुखाचे क्षण आपल्याही मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवावे यासाठी माणसाची आयुष्यभर धडपड चाललेली असते.

आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल असावे याच हेतूने आपण पैसा साठवतो.

प्रत्येकजण आपआपल्या सोयीनुसार स्वत:ची संपत्ती निर्माण करतो. कोणी बँकेत सेविंग्ज करतो, कोणी इन्व्हेस्टमेंट करतो, कोणी प्रोपर्टी विकत घेतो. एकंदर काय तर आपल्याला सुखाने जगायचयं सुखाने मरायचयं!

 

airbnb community

 

बील गेट्स हे  नाव कोणाला माहीत नाही?? आज ज्या स्क्रीनवर म्हणजेच ज्या मोबाइल वर किंवा ज्या कॉम्प्युटर वर तुम्ही आज हा लेख वाचताय ते  म्हणजे केवळ एका माणसाच्या मेहनतीमुळे आणि तो म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून बील गेट्स!

जगातल्या सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून पैकी एक बील गेट्स आपल्याला परिचित आहेत ते त्यांच्या सर्वात मोठ्या कंपनीमुळे जीच नाव आहे मायक्रोसॉफ्ट! आज बील गेट्स हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि साऱ्या जगात तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात!

आज मायक्रोसॉफ्ट चे नाव दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे ते केवळ या कॉम्प्युटर युगाचा जनक मानल्या जाणाऱ्या बील गेट्स यांच्यामुळेच!

इतर काही फेमस लोकांप्रमाणेच बील सुद्धा कॉलेज ड्रॉप आऊट आहेत!

 

Egypt independent

 

लहान वयातच त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कॉम्प्युटर याच्याशी संबंधित पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिला. जसे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना समजले तसे त्यांनी संपूर्ण शाळेच्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शेड्यूल करण्याचे लहानग्या बीलकडे सोपवले!

बील गेट्स सांगतात की जर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी उभी राहिली नसती किंवा म्हणावी तितकी लोकप्रिय झाली नसती तर ते खचून गेले नसते. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी तिथे रिसर्चर म्हणून काम केले असते!

 

larazonsanluis

 

असं म्हणतात की त्याची सर्व संपत्ती जर पैश्यामध्ये बदलली तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत अवकाशात रस्ता बांधता येईल.

रोज लाखो खर्ची केले तरी त्याची संपत्ती काही संपणारी नाही, कारण त्यात दर दिवसाला करोडोच्या संपत्तीची भर पडत असते. तुम्हाला काय वाटतं, त्याने काय विचार केला असेल आपल्या एवढ्या संपत्तीबद्दल?

एका मुलाखतीमध्ये हाच प्रश्न बिल गेट्सला विचारण्यात आला आणि त्याने उत्तर दिले :

मला माझी संपत्ती दान करायची आहे. मी माझ्या मुलांसाठी एक लहानशी रक्कम बाजूला करून ठेवलेली आहे.  त्या व्यतिरिक्त त्यांच्या नावावर एक रुपयाही नाही. मला वाटतं की त्यांनी स्वत:च्या हिमंतीवर मोठ व्हावं आणि माझा मान वाढवावा.

सॉफ्टवेअर दुनियेमधला या बादशाह ने त्याच्या मुलांसाठी त्याच्या संपूर्ण संपत्ति पैकी फक्त १० बिलियन डॉलर्स इतकीच रक्कम राखीव ठेवली आहे, त्याहून अधिक रक्कम त्यांना देणे त्यांना योग्य वाटत नाही!

आणि मुख्य म्हणजे बिल गेट्सच्या तिन्ही मुलांना वडीलांच्या या निर्णयाचा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक असून देखील बिल गेट्स आणि त्यांच्या कुटुंबियांना एका पैश्याचाही गर्व नाही हे विशेष!

 

superbhub

 

बिल गेट्स काही जन्मत: श्रीमंत नव्हता, तर त्याच्या मेहनतीने आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमुळे तो श्रीमंत झाला. आपली वाढती संपत्ती पडून आहे हे बिल गेट्सला आवडत नसे.

म्हणून त्याने हाच पैसा समाजकार्यात गुंतवण्याच्या उद्देशाने २००० साली  Bill and Melinda Gates Foundation ची स्थापना केली. ६० वर्षीय बिल गेट्सने आपल्या संपत्तीपैकी बराचसा हिस्सा या फौंडेशनच्या माध्यमातून दान केला आहे.

मे २०१३ मध्ये बिल गेट्सने फौंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांच्या मदतीसाठी तब्बल २८ बिलियन डॉलर दान केले होते.

 

christian science monitor

 

बिल गेट्सच्या या दानशूर वृत्तीने इतर श्रीमंत हस्तींना देखील प्रेरित केलं आणि ते देखील या समाजकार्यात आपला सक्रीय सहभाग दर्शवत आहेत.

 

onecoastmagazine.com

 

इतके पैसे कमवून सुद्धा आणि जगातली सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात असून सुद्धा बील गेट्स हे आजही त्यांचे कष्ट ओळखून आहेत आणि म्हणूनच त्यांचे पाय अजून जमिनीवर आहेत!

पैसा नुसता कमवून माणूस मोठा होत नसतो तर गरजू व्यक्तीला तो पैसा योग्य वेळेला पुरला पाहिजे तर त्या पैशाचे खरे महत्व असते, आणि माणूस कितीही श्रीमंत असो आपल्याकडची वस्तु किंवा पैसा समोरच्या गरजूला देण्याची दानत लागते!

अश्या या दानशूर बिल गेट्सची संपत्ती कधीतरी संपेल, पण त्याने केलेलं कार्य त्याचे नाव या जगात त्या शेवटपर्यंत राखेल हे मात्र नक्की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version