आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हा आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलेला प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे आपण सर्वजण आजही त्या उत्तराच्या शोधात आहोत.
चित्रपटांमध्ये पाहताना किंवा काहीजणांनी प्रत्यक्षही अनुभव घेतला असेल की, एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं म्हटलं की पोलीस गाड्या घेऊन निघतात, पण त्या गाडीवरचा सायरन मात्र सतत वाजत असतो.
–
- गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगारांचीच मदत घेणाऱ्या ह्या राज्याच्या पोलिसांचा पॅटर्नच निराळा!
- जाणून घ्या ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार, फायदे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा?
–
त्यामुळे आपल्या भोळ्या भाबड्या मनात हा प्रश्न साहजिकच उभा राहतो की, सायरन वाजवत गेल्याने गुन्हेगार सावध होत नसेल का? तो पळण्याचा प्रयत्न करत नसेल का? त्याउलट जर हळूच जाऊन त्याची धरपकड करणे सोप्पे नाही का?
तर मंडळी तुमची शंका रास्त आहे आणि पोलिसांना देखील या गोष्टीची कल्पना असते, मात्र तरीही ते सायरन बंद न करताच गुन्हेगाराला पकडायला जातात. चला तर पाहूया यामागे काय लॉजिक असते.
तर मंडळी याचे मुख्य कारण हे आहे की, बऱ्याच वेळा होते काय की पोलिसांना गुन्हेगाराची खबर मिळेपर्यंत गुन्हेगार तेथून निसटलेला असतो.
त्यामुळे सायरनचा आवाज त्या भागातील नागरिकांना अलर्ट करतो आणि पोलिसांना देखील गर्दीतून मार्ग काढत लवकरात लवकर गुन्ह्याच्या ठिकाणी पोचण्यास मदत करतो.
–
यूट्यूब व्हिडिओ शेअर करा
तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाताना पोलिसांना अनेकदा सिग्नल तोडावे लागतात, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करावे लागते.
अश्यावेळेस जर सायरन सुरु असेल तर नागरिकांच्या देखील लक्षात येते की, काहीतरी इमर्जन्सी असल्याने पोलीस घाई करत आहेत आणि ते स्वत: पोलिसांच्या गाडीला वाट करून देतात.याचमुळे त्यांच्या वाटेला कोणी मज्जाव करत नाही. ॲम्ब्युलन्सचं कसं, अगदी तसचं आहे हे!
अजून एक कारण हे सांगितलं जातं की, सर्वच गुन्हेगार हे काही सराईत नसतात, जे सराईत नसतात ते गुन्हेगार मनाने कमकुवत असतात. त्यामुळे पोलीस सायरनचा आवाज त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात महत्त्वाचा ठरतो.
अश्या वेळेस सराईत नसलेले गुन्हेगार पळण्यापेक्षा जवळच कुठेतरी आडोसा घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:हून पोलिसांच्या जाळ्यात अडकतात.
–
- लाच दिली नाही, तर इथले पोलीस थेट गोळ्या घालतात!
- पोलिस असूनही सिस्टिमविरुद्ध कटकारस्थान करणारा पंजाबचा क्रूर ऑफिसर
खुद्द पोलीस खात्यामार्फत देखील सांगण्यात येते की, सर्वच गुन्हेगारांना पकडायला जाताना सायरन चालू ठेवला जात नाही.
बऱ्याचदा गुन्हेगार कोण आहे, तो कितीवेळा पोबारा करण्यात यशस्वी झाला आहे, याबद्दल त्याची पार्श्वभूमी पाहून योजना आखली जाते आणि अतिशय शांतपणे, गुन्हेगाराला चाहूल लागू न देता अलगद त्याला जाळ्यात अडकवून जेरबंद केले जाते.
काय मिळालं ना या गहन प्रश्नामागचं लॉजिकल उत्तर! चला तर मग आपल्या मित्रमंडळींसोबतही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांनाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यात मदत करा!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.